Maharashtra government announces list of special flights for tourists stranded in Jammu and Kashmir
मुंबई : जम्मू – काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करण्यात आला आहे. पहलगाममध्ये झालेल्या या दहशदवादी हल्ल्यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे भारताने आक्रमक भूमिका घेत पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. पर्यटकांना लक्ष्य करुन आणि त्यांना धर्म विचारुन त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी राज्य सरकारकडून विशेष विमानाची सोय करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे अडकले आहेत. त्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी अडकलेल्या पर्यटकांच्या भेटी घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विमानसेवा उपलब्ध करुन दिली आहे. याबाबत सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांनी माहिती दिली आहे. तसेच खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील अडकलेल्या प्रवाशांना आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अडकलेल्या पर्यटकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राज्यात परत आणण्यात येणाऱ्या प्रवाशांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये 100 प्रवासी हे विमानाने परत आणण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
पहलगाम दहशदवादी हलल्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान 83 पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने 100, असे महाराष्ट्रातील एकूण 183 पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती या पोस्टमधून देण्यात आली आहे.
काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष… pic.twitter.com/WqRdPkWs2L— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2025
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनात शिंदे हे जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी दहशदवादी हल्ला झाल्यानंतर श्रीनगर दौरा केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील पर्यटकांची भेट घेतली आहे. यामध्ये त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील काही पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडले होते. या सर्वांना सुखरूप परत आणणे हे एक आव्हान होते. तेथील पर्यटकांशी बोलल्यावर ते भीतीच्या सावटाखाली असल्याचे मला समजले. त्यांना धीर देऊन पुन्हा राज्यात आणण्यासाठी मी स्वतः जम्मू काश्मीरला जाऊन त्याना भेटलो. काल रात्री उशिरा विशेष विमानाने यातील 75 पर्यटकांना राज्यात परत आणण्यात आले. शिवसेनेतील माझ्या सहकाऱ्यांनी या पर्यटकांना मुंबई विमानतळावर भेटून त्याना दिलासा दिला.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील काही पर्यटक हे जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडले होते. या सर्वांना सुखरूप परत आणणे हे एक आव्हान होते. तेथील पर्यटकांशी बोलल्यावर ते भीतीच्या सावटाखाली असल्याचे मला समजले. त्यांना धीर देऊन पुन्हा राज्यात आणण्यासाठी मी… pic.twitter.com/TORGWSSmNS
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 24, 2025