नागपूर : सध्या राज्यात तापमानात वाढ (Increase in Temperature) झाली आहे. मान्सून सात दिवस उशीरा केरळमध्ये दाखल नागरिकांना दुपारी उन्हाचा (Sun Heat) चटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सध्या नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या घोषित झाली नसली तरी विदर्भ (Vidarbh) आणि कोकणात (Kokan) नकळत उष्णतेच्या लाटेसारखी जवळपास स्थिती आहे.
15 जूनपर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर कदाचित वातावरणात काहीसा फरक जाणवू शकतो. कारण 16 जूनच्या आसपास मान्सून कदाचित गोव्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.
एक जून या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून चार दिवस उशिराने म्हणजे चार जूनला येणं अपेक्षित होतं. त्यातही कमी अधिक चार दिवसांचा फरक जमेस धरून तो केरळात एक जून ते आठ जून या आठ दिवसादरम्यान कधीही दाखल होऊ शकतो, असेच भाकीत भारतीय हवामान खात्याकडून यावर्षी आगमनासंबंधी वर्तवले गेले होते.
त्याप्रमाणे मान्सून गुरुवारी (दि.8) केरळमध्ये दाखल झाला आहे. हा दाखल झालेला नैऋत्य मान्सून आगमनाच्या अटी पूर्ण करून दाखल झाला आहे. जवळपास कव्हर करून देशाच्या भूभागावर दाखल झाला आहे. त्याची उच्चतम सीमा केरळातील कनूर आणि तामिळनाडूतील कोडाईकनल तसेच आदिरामपट्टीनाम शहरातून जाते.
सूर्यकिरणांच्या जमिनीवर ओतल्या जाणाऱ्या सध्याच्या उष्णतेमुळे दुपारच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शिवाय त्या किरणांना अडथळा करणाऱ्या ढगांचा अभाव यामुळं अधिक उष्णता म्हणून अति आर्द्रतेत कमालीची वाढ झाली.