
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट! 1500 रुपये मिळणार की नाव कट होणार? जाणून घ्या नियम
योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आणि e-KYC प्रक्रियेनंतर पात्र महिलांची संख्या सुमारे 1.66 कोटींवर आली आहे. यापूर्वी महिला व बालविकास विभागाने सुमारे 66 लाख लाभार्थ्यांची नावे विविध कारणांमुळे यादीतून वगळल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पुढील हप्ता मिळण्यासाठी पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून १,५०० रुपये जमा होणार
लाभार्थी महिलांनी अनिवार्य e-KYC पूर्ण न करणे हे हप्ता थांबण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक ठरू शकते. त्याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास संबंधित महिला योजनेसाठी अपात्र ठरू शकते. कुटुंबात आयकरदाता किंवा सरकारी नोकरी करणारा सदस्य असल्यासही पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. पडताळणीदरम्यान पुरुष लाभार्थ्यांची नावे आढळल्यास तीदेखील यादीतून वगळण्यात आली आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. तिचे वय 21 ते 65 वर्षांदरम्यान असावे. त्याचप्रमाणे तिचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेत असणे आवश्यक आहे. चारचाकी वाहनासंदर्भातील पात्रतेच्या अटीदेखील लागू होतात.
सरकारकडून e-KYCच्या माध्यमातून लाभार्थ्यांची ओळख आणि पात्रता तपासली जाते. यामुळे डुप्लिकेट नावे, अपात्र लाभार्थी तसेच योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या व्यक्ती शोधणे शक्य होते. योजनेची रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जात असल्याने e-KYC, आधार-बँक खाते लिंकिंग आणि पेमेंट स्टेटस नियमितपणे तपासणे आवश्यक आहे.
त्यामुळे सप्टेंबरचा हप्ता जमा होण्यापूर्वी लाभार्थी महिलांनी आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण आहे का, आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का आणि योजनेच्या पात्रता निकषांची पूर्तता होत आहे का, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.