Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Municipal Election 2026: मुंबई उच्च न्यायालयाचा मनसेला दणका; मतदानाच्या २४ तास आधी फेटाळली ‘ती’ याचिका

राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ४४, तर शिंदेंच्या शिवसेनेचे १९ उमेदवार निवडून आले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 14, 2026 | 04:11 PM
Municipal Elections, Municipal Election Result 2026, Maharashtra Navnirman Sena,

Municipal Elections, Municipal Election Result 2026, Maharashtra Navnirman Sena,

Follow Us
Close
Follow Us:
  • उमेदवार बिनविरोध निवडीवर मनसेकडूनच उच्च न्यायालयात याचिका
  • उच्च न्यायालयाने मनसेची याचिका फेटाळली
  • महापालिका निवडणुकीत ६७ उमेदवार बिनविरोध
Maharashtra Municipal Election 2026: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकांसाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मुंबई उच्च न्यायालयात मोठा दणका दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच काही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडीविरोधात मनसे नेत अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra  Navnirman Sena)  नेते अविनाश जाधव यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत अनेक उमेदवारांनी पैसा आणि सत्तेच्या प्रभावामुळे निवडणूक न लढवता ती बिनविरोध जिंकल्याचा आरोप करण्यात आला होता. पण उच्च न्यायालयाने ही याचिका सुनावणीयोग्य नसल्याचे सांगत फेटाळून लावली. (Municipal Election Result 2026)

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? ठाकरे बंधूंना भाजप सोबत घेणार? फडणवीस स्पष्टच म्हणाले…

६७ उमेदवार बिनविरोध

मनसेने दाखल केलेल्या याचिकेत, महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत सुमारे ६७ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यापैकी बहुतेक उमेदवार सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उच्च न्यायालयाला या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची किंवा संपूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण करण्याची विनंती केली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत या उमेदवारांना विजयी घोषित करू नये अशी विनंतीही त्यांनी केली. निवडणुकीच्या अगदी आधी मनसेला कायदेशीर दिलासा देण्यास नकार देत न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

Maharashtra Politics: शरद पवारांना मोठा धक्का! माजी आमदार रमेश कदम यांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी

दरम्यान, आज सकाळी या याचिकांचा उल्लेख करण्यात आला तेव्हा ही याचिका आधीपासून प्रलंबिल असलेल्या याचिकांसाखीच असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले होते. पण सुनावणी सुरू झाल्यावर ऑनलाईन उपस्थित ज्येषठ वकील असी समरोदे यांनी ही याचिका इतर प्रलंबित प्रकरणांसारखी नसून थेट निवडणुकीशी संबंधित असल्याचे सांगितले याचिका कर्त्यांच्या या परस्पर विरोधी वक्तव्यांमुळे मुख्य न्यायाधीश एस. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड चांगलेच संपातपल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Municipal Election 2026)

चुकीची माहिती दिल्याबद्दल न्यायालयाचा जाब

खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना जाब विचारत, सकाळी इतर याचिकांसारखीच असल्याचे चुकीचे विधान का केले, असा सवाल उपस्थित केला. दोन्ही याचिकांमध्ये कोणतेही साधर्म्य नसताना अशी चुकीची माहिती देण्यामागे कोणती घाई किंवा भीती होती, असा थेट प्रश्न न्यायालयाने केला. चुकीची माहिती दिल्याबद्दल सुरुवातीला दंड ठोठावण्याचे संकेतही देण्यात आले. मात्र, दीर्घ युक्तिवादानंतर न्यायालयाने दंड न आकारण्याचा निर्णय घेतला. तरीही बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत न्यायालयाने अविनाश जाधव यांची याचिका फेटाळून लावली.

२९ महापालिकांत ६६ उमेदवार बिनविरोध; भाजप आघाडीवर

राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे सर्वाधिक ४४, तर शिंदेंच्या शिवसेनेचे १९ उमेदवार निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. या प्रक्रियेवर मनसेने कायदेशीर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आल्याने बिनविरोध निवड झालेल्या जागांचा मार्ग मोकळा झाला असून मनसेसाठी हा मोठा कायदेशीर पराभव मानला जात आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुका: मुंबई उच्च न्यायालयाने ६७ बिनविरोध उमेदवारांविरुद्ध मनसेची याचिका फेटाळली. निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

 

Web Title: Maharashtra municipal election 2026 maharashtra municipal election 2026 the mumbai high court rejected mnss petition regarding unopposed candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Maharashtra Navnirman Sena
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.