मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो-सोशल मीडिया)
राज्यात 29 महानगरपालिकांसाठी उद्या होणार मतदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केले भाष्य
राज्यात जाहीर झालयार जिल्हा परिषद निवडणुका
CM Devendra Fadnavis on Thackeray Brothers: राज्यात उद्या 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे. उद्या मतदान तर परवा निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान मुंबई, पुणे , नाशिक अशा काही महत्वाच्या महानगरपालिकांची निवडणूक चुरशीची असणार आहे. मुंबईत भाजप शिवसेना विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढत आहे. दरम्यान गरज पडल्यास ठाकरे बंधूंना सोबत घेणार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असणार आहे. निकाल आला की हे महाराष्ट्र राज्य पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी असल्याचे आपल्याला दिसून येईल. महानगरपालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे. राज्यातील जतना आमच्या बाजूने आहे असा मला विश्वास आहे. आम्ही यांच्या प्रचारात विकासाचा मुद्दाच जास्त उचलून धरला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी मित्रपक्षांचे महापौर असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेत निवडणुकीचा निकाल आल्यावर गरज भासल्यास ठाकरे बंधूंना सोबत घेणार का असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आयाला. त्यावर बोलताना त्यांनी आता कोणत्याही युतीची शक्यता नाही. आम्ही बहुमताने सतेत येऊ. त्यांना सोबत घेण्याची गरज अजिबात नाही.
“ही निवडणूक गल्लीबोळात ‘दादा’ तयार…”; पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?
पुण्यनगरीतून CM फडणवीसांचा पवारांवर निशाणा?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सभेत म्हणाले, “महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट आहे. शिवाजीनगर मतदारसंघात या प्रचाराची सांगता करायची असे मी ठरवले. ही निवडणूक पुण्यात राहणाऱ्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात गेली काही वर्षे आधुनिक पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय.”
“नक्कल करून काकाच्या पक्षाची…”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीचा समाचार
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही लोकांना असे वाटते की महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक. ही निवडणूक तशी नाही. शहराचे भावी नेतृत्व तयार करणारी निवडणूक आहे. मागच्या काळात 35 हजार कोटीपेक्षा जास्तीचे विकासकामे सुरू केली. प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी, सांडपाण्याचा निचरा असा अनेक गोष्टींचे ठोस आराखडा तयार केलेल्या आहे. वाढीव बांधकामावावरील तिप्पट कर रद्द केला. नागरिकांना दिलासा दिला. तुम्ही जे शिवाजीनगर भागातील 12 नगरसेवक निवडून देणार आहात. ते नगरसेवक आणि आमदार शिरोळे यांच्या पाठीशी राज्याच्या मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे.”






