Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Municipal Corporation Election 2026: निवडणुकांच्या प्रचारतोफा 5 वाजता थंडावणार; फडणवीस-शिंदे-पवारांची प्रतिष्ठा पणाला

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवारांपैकी ८७९ महिला आणि ८२१ पुरुष आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 13, 2026 | 03:07 PM
Maharashtra municipal elections, BMC election, Nagpur Municipal Corporation,

Maharashtra municipal elections, BMC election, Nagpur Municipal Corporation,

Follow Us
Close
Follow Us:
  •  २९ महानगरपालिकांसाठी सुरू असलेला निवडणूक प्रचार आज संध्याकाळी ५ वाजता संपणार
  • राज्यातील बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला
  • २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार निवडणूक लढवत
Maharashtra Municipal Corporation Election Campaign News: आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी सुरू असलेला निवडणूक प्रचार आज, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता संपणार आहे. निवडणूक नियमांनुसार, मतदानापूर्वी ४८ तास आधी “शांतता काळ” सुरू होईल. या काळात कोणत्याही प्रकारचा प्रचार, रॅली, मोर्चांना बंदी असते. राज लाऊडस्पीकर आणि रॅलींना बंदी असते. आज संध्याकाळी ५ नंतर, फक्त घरोघरी प्रचाराला परवानगी असेल. (Municipal Election 2026)

दरम्यान, या सर्व जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होतील. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडले. मतदानानंतर शुक्रवार, १६ जानेवारीला मतमोजणी किंवा निवडणूक निकालांची घोषणा होई. त्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होईल. आता, १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाल्यावर कोण विजयी होणार आणि कोणाचे गड कोसळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Municipal Election 2026: १५ जानेवारीला मतदान; वेळ, मतदान प्रक्रिया आणि महत्त्वाच्या सर्व माहिती,

मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

प्रचार संपत आला असला तरी राज्यातील बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधील एकनाथ शिंदे, ठाण्यातील एकनाथ शिंदे आणि पुणे-पिंपरी चिंचवडमधील अजित पवार हे त्यांचे राजकीय गड राखण्यात यशस्वी होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे १६ जानेवारी या राजकीय प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, महाराष्ट्रातील तीन प्रमुख नेते – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार – आपापल्या बालकिल्ल्यांवर आपली सत्ता राखण्यात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

देवेंद्र फडणवीस (नागपूर): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मूळ गावी नागपूरमध्ये एका भव्य रोड शोद्वारे जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. नागपूर हा भाजपसाठी एक अजिंक्य किल्ला आहे आणि तो टिकवणे ही फडणवीसांसाठी प्रतिष्ठेची बाब आहे.

एकनाथ शिंदे (ठाणे):  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या राजकीय गड, ठाण्यात तळ ठोकून आहेत. शिवसेना फुटल्यानंतरची ही पहिलीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहे. त्यामुळे  ठाण्यातील जनता अजूनही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे शिंदे यांना हे सिद्ध करावे लागेल.

अजित पवार (पुणे आणि पिंपरी चिंचवड): उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार करत आहेत. ही दोन्ही शहरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (राष्ट्रवादी) शक्ती केंद्रे मानली जातात.

Municipal Election 2026: 15 जानेवारीला सार्वजिनिक सुट्टी जाहीर; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील

बीएमसी निवडणूक: सर्वात मोठी लढाई

यावेळी, देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) २२७ जागांसाठी १,७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण उमेदवारांपैकी ८७९ महिला आणि ८२१ पुरुष आहेत. येथे लढाई चौकोनी आहे, ज्यामध्ये महायुती (भाजप + शिंदे सेना), महाविकास आघाडी (यूबीटी + राष्ट्रवादी, शरद पवार + काँग्रेस), मनसे आणि अपक्ष उमेदवार आमनेसामने आहेत. (BMC Election 2026)

जागा आरक्षणाबाबत, एकूण २२७ पैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. या राखीव जागांमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) महिलांचा समावेश आहे. उर्वरित ११३ जागा सामान्य प्रवर्गासाठी राखीव आहेत. मुंबईत बहुमत मिळवण्यासाठी आणि महापौर निवडण्यासाठी, कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला किमान ११४ जागांचा जादूचा आकडा गाठावा लागेल.

स्पर्धेत प्रमुख राजकीय पक्ष आणि युती
मुंबईत अनेक प्रमुख पक्ष आणि युती सत्तेसाठी स्पर्धा करत आहेत. सूत्रांनुसार, मुख्य स्पर्धा खालील पक्षांमध्ये आहे:

महायुती आघाडी: भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बहुतेक जागांवर युती म्हणून लढत आहेत.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC): काँग्रेस यावेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे.

शरद पवार गट (NCP): हा गट देखील स्वतंत्रपणे लढत आहे.

उद्धव ठाकरे गट (शिवसेना UBT): उद्धव सेना देखील स्वतःचे उमेदवार उभे करून सक्रियपणे प्रचार करत आहे.

इतर पक्ष: वंचित बहुजन आघाडी (VBA) ने सुमारे २०० जागा लढवण्याची योजना जाहीर केली आहे, तर राज ठाकरे यांची मनसे काही मतदारसंघांमध्ये उद्धव सेनेसोबत युती करून किंवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. याव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत.

 

Web Title: Maharashtra municipal election 2026 the election campaign ends at 5 pm today devendra fadnavis ajit pawar eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections News

संबंधित बातम्या

मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर नेऊ नका…! काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचे भाजपच्या दिलीप कांबळेंना खडेबोल
1

मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर नेऊ नका…! काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचे भाजपच्या दिलीप कांबळेंना खडेबोल

PMC Election: प्रभागातील व्यापारी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले; अविनाश बागवे यांचे बहुआयामी कार्य
2

PMC Election: प्रभागातील व्यापारी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले; अविनाश बागवे यांचे बहुआयामी कार्य

PMC Elections 2026 : प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय! उमेदवारांवर अमोल बालवडकर यांचा पूर्ण विश्वास
3

PMC Elections 2026 : प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय! उमेदवारांवर अमोल बालवडकर यांचा पूर्ण विश्वास

Mira Bhayander Election : मतदानासाठी मीरा भाईंदर मनपा सज्ज; प्रवास आणि खाद्यपदार्थांवर विशेष सवलत
4

Mira Bhayander Election : मतदानासाठी मीरा भाईंदर मनपा सज्ज; प्रवास आणि खाद्यपदार्थांवर विशेष सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.