Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातील कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून विदर्भात वादळी पाऊस, तर मराठवाड्यात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 22, 2026 | 12:55 PM
अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

अरे देवा! राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण-घाटमाथ्यासह 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

Follow Us
Follow Us:
  • बंगालच्या उपसागरातील प्रणाली सक्रिय
  • महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • पुण्यात पावसाची परिस्थिती काय?
Maharashtra Rain Alert News Marathi : राज्यात सध्या पावसाची स्थिती असमान असून काही भागांत मुसळधार पाऊस सुरू असताना अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जुलै महिना संपत आला असला तरी राज्यातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, बुधवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर काही जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाडमधील मुसळधार पावसाने पूल गेला वाहून, रस्ता बंद

सध्या बंगालच्या उपसागरात आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्यांची प्रणाली सक्रिय आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरापासून दक्षिण गुजरातपर्यंत कमी दाबाचा लांब पट्टा (ट्रफ) तयार झाला आहे. याच प्रणालीमुळे गुजरातच्या काही भागांसह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारपर्यंत कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मात्र पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग शुक्रवार आणि शनिवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तरीही नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहावे तसेच अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग

पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अनेक भागांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार कुरवंडे येथे सर्वाधिक ९६.५ मिमी पाऊस झाला. कुरवंडेनंतर गिरीवन येथे ६७.० मिमी, तर भोर येथे ५३.५ मिमी पावसाची नोंद झाली. या भागांमध्ये दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळल्याने ओढे-नाले वाहू लागले आणि वातावरणात गारवा निर्माण झाला.

पुणे शहरातही अनेक भागांत चांगला पाऊस झाला. पाषाण येथे ४९.८ मिमी, एनडीए परिसरात ४९.० मिमी, चिंचवडमध्ये ४८.५ मिमी आणि शिवाजीनगर येथे ३७.५ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय दापोडीमध्ये ३६.० मिमी, तळेगावमध्ये २८.० मिमी, तर कोरेगाव पार्कमध्ये २५.५ मिमी पाऊस झाला. सततच्या पावसामुळे शहरातील काही सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

देशातील 23 राज्यात पाऊस, महाराष्ट्रासह 3 राज्यात रेड अलर्ट तर 10 राज्यात ऑरेंट अलर्ट

Web Title: Maharashtra rain alert red orange alert heavy rain konkan ghat regions imd forecast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 12:55 PM

Topics:  

  • Monsoon Update
  • Mumbai
  • Pune

संबंधित बातम्या

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद
1

Mumbai Crime: पंचर काढताना चोराने मारला डल्ला; 111 लाख 55 हजार रुपये केले लंपास; अवघ्या २४ तासात आरोपी जेरबंद

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
2

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
3

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
4

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.