जिल्ह्यात पावसाची संततधार कायम
Maharashtra Rain Update News In Marathi : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रिपरिप दिसत आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण केलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम सुरूच आहे आणि काही ठिकाणी धरणं भरून वाहू लागली आहेत. परिणामी या मुसळधार पावसामुळे भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. सकाळी १० वाजले तरी अंधाराचे वातावरण पाहायला मिळत आहे. कामाचा दिवस असल्याने शाळकरी मुले, नोकरदार, सरकारी कर्मचारी शाळा व कार्यालय गाठण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र, पावसामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नवी मुंबईत शहरातही पावसाची हजेरी लागली आहे. खारघर, बेलापूर, वाशी, नेरुळ, कोपरखैरणे या इतर भागात पाऊस पडल्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत समाधानकारक पाऊस पडला आहे. नांदेड शहराअंतर्गत येणारे विष्णुपुरी धरण सध्या ८४ टक्के भरले आहे. गेल्या दोन दिवसांत २४ टक्के पाणीसाठा असलेल्या या धरणात झपाट्याने वाढ झाली असून, आता शहराचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
अक्कलकोट तालुक्याला पाणीपुरवठा करणारा कुर्नूर जलाशय ९५% भरला आहे. या धरणाची क्षमता ८२२ दशलक्ष घनफूट असून सध्या ७८१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपरिषद आणि ५२ गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. बोरी आणि हरणा नद्यांचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळी झालेल्या पावसाने कल्याण-डोंबिवली परिसरात रिमझिम पाऊस पडला आहे. जोर नसला तरी सतत चालणाऱ्या या पावसामुळे वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला आहे.
पावसामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे-नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर महामार्गावर चार किलोमीटर अंतरावर वाहनांची वर्दळ आहे. पोलीस सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु स्थलांतरित आणि कामगारांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला पाणलोट क्षेत्रात २३.९८ टीएमसी म्हणजेच ९२.९८% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६९.५२% पाणीसाठा होता. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्यामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर किंवा धरणांत साठा प्रभावित झाले आहेत.
खडकवासला – १.०६ टीएमसी
पानशेत – ८.९२ टीएमसी
वरसगाव – ११.१५ टीएमसी
टेमघर – २.८५ टीएमसी
रेड अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
ऑरेंज अलर्ट: मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, वर्धा, नागपूर.
यलो अलर्ट : पालघर, नाशिक घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, अमरावती, हिंगोली, नांदेड.