Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Road Safety Charter : महाराष्ट्रात रस्ते अपघातांचा वाढता धोका; २०३० पर्यंत मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट

Maharashtra Road Safety Charter : महाराष्ट्रातील वाढत्या रस्ते अपघाती मृत्यूंना आळा घालण्यासाठी रोड सेफ्टी नेटवर्क आणि परिसर संस्थेने राज्य सरकारला पाच कलमी रस्ते सुरक्षा सनद सादर केली आहे. २०३० पर्यंत अपघाती मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 20, 2026 | 10:02 PM
Five-Point Plan to Reduce Road Accident Deaths by 50% by 2030 ( २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी पाच कलमी योजना )

Five-Point Plan to Reduce Road Accident Deaths by 50% by 2030 ( २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी पाच कलमी योजना )

Follow Us
Follow Us:
  • पादचारी आणि सायकलस्वारांची सुरक्षा  
  • महाराष्ट्रात २०२४ मध्ये १५,७१५ जणांचे रस्ते अपघातांत मृत्यू 
  • महामार्गांवर दर १०० किलोमीटरच्या आत ट्रॉमा सेंटर उपलब्ध  
Maharashtra Road Safety Charter : महाराष्ट्रातील वाढत्या अपघाती मृत्यूंना आळा घालण्यासाठी रोड सेफ्टी नेटवर्क (RSN) आणि परिसर यांच्या वतीने राज्य सरकारला पाच कलमी रस्ते सुरक्षा सनद सादर करण्यात आली आहे.  मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात आयोजित रस्ते वाहतूक अपघातातील बळींच्या स्मरणार्थ जागतिक दिन २०२६ च्या कार्यक्रमात परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ही सनद स्वीकारली. राज्यात येत्या  २०३० पर्यंत रस्ते अपघाती मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट असून, ११ जिल्ह्यांची शून्य मृत्यू जिल्हे म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती यावेळेस देण्यात आली.

पादचारी आणि सायकलस्वारांची सुरक्षा

या सनदेत वेग नियंत्रण, पादचारी आणि सायकलस्वारांची सुरक्षा, हेल्मेट कायद्याची कठोर अंमलबजावणी, सुरक्षित रस्त्यांची रचना आणि राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा अशा पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरी भागांत वेग व्यवस्थापन मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच महाराष्ट्र बिगर-यांत्रिक वाहतूक नियम २०२६ अंतिम करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्या प्रवाशांसाठीही हेल्मेट सक्तीची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे.

रस्ते आणि चौकांची निर्मिती तसेच देखभाल भारतीय रस्ते काँग्रेसच्या (IRC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावी. याशिवाय २०३० पर्यंत अपघाती मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी कालबद्ध राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा तयार करून प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करावी, असेही सनदेत नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात २०२४ मध्ये १५,७१५ जणांचे रस्ते अपघातांत मृत्यू

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२४ मध्ये १५,७१५ जणांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला. २०१४ मध्ये ही संख्या १२,८०३ होती. म्हणजेच दशकभरात अपघाती मृत्यूंमध्ये सुमारे २३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये राज्यात ३६,११८ अपघात झाले असून, ३०,५३५ जण जखमी झाले होते.

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

महामार्गांवर दर १०० किलोमीटरच्या आत ट्रॉमा सेंटर उपलब्ध

परिवहन आयुक्त नार्वेकर यांनी गेल्या वर्षी ५,५०० वाहनांवर कारवाई आणि १२,१०० वाहनचालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती दिली. अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असून, महामार्गांवर दर १०० किलोमीटरच्या आत ट्रॉमा सेंटर उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले गेले.

कार्यक्रमात अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या गुड समॅरिटन्सचा सन्मान करण्यात आला. परिसरचे कार्यक्रम संचालक रणजित गाडगीळ यांनी रस्ते सुरक्षेसाठी शासन, प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त केले.

Buldhana: दुष्काळात गावाच्या विकासासाठी सरपंचांना प्रशासकीय अन् आर्थिक अधिकार द्या; आमदार श्वेता महालेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Web Title: Maharashtra road safety charter reduce accident deaths by 50 percent 2030 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • Government of Maharashtra
  • Maharshtra news
  • Mumbai accident
  • Road Safety

संबंधित बातम्या

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारवाढीचा मार्ग मोकळा, किती वाढणार मासिक वेतन?
1

Bank Employees Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारवाढीचा मार्ग मोकळा, किती वाढणार मासिक वेतन?

Maharashtra POCSO Cases 2024 : महाराष्ट्रात पॉक्सोचे ९,४३२ गुन्हे; बाल सुरक्षेसाठी विद्या बालन मैदानात
2

Maharashtra POCSO Cases 2024 : महाराष्ट्रात पॉक्सोचे ९,४३२ गुन्हे; बाल सुरक्षेसाठी विद्या बालन मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.