यवतमाळमध्ये पावसाची दमदार बॅटिंग; तब्बल 8 तास धुवांधार पाऊस, पिकांना मोठा फटका
राज्यता आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही भागात हवामान विभागाने रेड अलर्ट,ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट जरी केले आहे. आज ‘विफा’ चक्रीवादळाचे अवशेष असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या किनारा आणि बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर कोकणात आणि मुंबईत आज जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मोखाडा-त्र्यंबकेश्वर घाटात तरसाचा मृत्यू; रस्ते रुंदीकरणावरून वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पुढील २४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा
कोकण किनारपट्टीवर पुढील २४ तास अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. तर रायगड, रत्नागिरीत आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विजांसह पाऊस (यलो अलर्ट)
बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर.
Konkan Rain Alert: सावधान! पुढील काही तास कोकणाला रेड अलर्ट; अति ते अति मुसळधार पाऊस कोसळणार