Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंधुदुर्ग आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान, कणकवली गणपती साना येथे आदिवासी वस्तीत केली सफाई

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करून "सत्य व अहिंसेच्या" मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 02, 2023 | 02:49 PM
सिंधुदुर्ग आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान, कणकवली गणपती साना येथे आदिवासी वस्तीत केली सफाई
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : आम आदमी पार्टी तर्फे महा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत कणकवली गणपती साना येथे आदिवासी कातकरी वस्तीत साफसफाई करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, लीगल सेल जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप वंजारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करून “सत्य व अहिंसेच्या” मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मानवी आयुष्यात शारीरिक आरोग्य आणि निरोगी वातावरणासाठी “स्वच्छता” सर्वात महत्वाची आहे, असे महात्मा गांधी यांचे स्पष्ट मत होते. म्हणून त्यांनी “स्वच्छता” हा गांधीवादी जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग बनवला. सर्वांसाठी “संपूर्ण स्वच्छता” हे राष्ट्रपित्यांचे स्वप्न होते. याच विचारांच्या दिशेने जात आज ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

२ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आम आदमी पार्टी तर्फे राज्यभर “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात कणकवली गणपती साना येथे कातकरी वस्तीत स्वच्छता करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी सकाळी १० वाजता कणकवली गणपती साना येथे कातकरी वस्तीत जमले आणि “स्वच्छता अभियान” राबविले.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले, जिल्ह्यात कातकरी बांधवांच्या अनेक समस्या आहेत, त्या मार्गी लावण्यासाठी आगामी काळात आम आदमी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी नियोजनबद्ध रित्या काम केले जाईल याबाबतचा संकल्प आज पासून आम्ही करत असल्याचेही यावेळी म्हणाले.

यावेळी सुनील पवार, संदेश परब, बंटी पवार, आकाश पवार, महेश निकम, विष्णू पवार आदी उपस्थित होते. यावेळी आदिवासी कातकरी वस्तीत सुनील पवार यांच्या झोपडीत बसून स्थानिक प्रश्न समजून घेण्यात आले. या अभियानात पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Mahatma gandhi jayanti sindhudurg aam aadmi party cleanliness campaign kankavali ganpati sana tribal settlement district president vivek tamhankar maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 02:49 PM

Topics:  

  • Aam Aadmi Party
  • kankavali
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Mahatma Gandhi Jayanti

संबंधित बातम्या

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
1

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
2

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात
3

भूमी अभिलेख विभागामध्ये मोठी भरती जाहीर! Land Surveyor पदांना येईल भरण्यात

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा
4

UDISE नोंदणीची धक्कादायक आकडेवारी! महाराष्ट्रातील तब्बल 394 शाळांचे वर्ग रिकामे, विद्यार्थ्यांची वानवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.