Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचे राजू शेट्टींनी सांगितले कारण; म्हणाले…

आत्तापर्यंत शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून संघटनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आलो आहे. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीप्रमाणे आमचा वापर करून घेतला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 06, 2022 | 02:48 PM
महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचे राजू शेट्टींनी सांगितले कारण; म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:
शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आत्तापर्यंत शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून संघटनेच्या माध्यमांतून शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम करत आलो आहे. मात्र, प्रत्येक राजकीय पक्षाने सोयीप्रमाणे आमचा वापर करून घेतला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक हातकणंगले तालुक्यातील  विशाल मंगल कार्यालय, चोकाक येथे पार पडली. केंद्र व राज्य सरकारचे शेतीविषयक धोरणातील फायदे व तोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यातील आंदोलनाची पुढील दिशा, स्वाभिमानी पक्षाची राजकीय भूमिका यासह विविध विषयावर दोन सत्राचे चर्चा सत्र पार पडले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, या सरकारकडूनही शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांचीही पक्षातून हकालपट्टी केल्याचेही ते म्हणाले.
ऊस एफआरपी दोन टप्प्यात, शेतीला दिवसा वीजपुरवठा, पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यासह अनेक मुद्दयांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरु आहे. सत्तेत राहूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळत नसल्यांची खंत कार्यकर्त्याकडून व्यक्त होत होती.
…म्हणून आम्ही दलबदलू ठरत नाही
आम्ही भाजपच्याही मागे लागलो नव्हतो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला सोबत येण्याची विनंती केली होती. तर २०१९ ला महाविकास आघाडीसोबत येण्यासाठी आम्हाला शरद पवारांनी विनंती केली होती. यामुळे आम्ही दलबदलू ठरत नाही. या दोघांनीही आम्हाला फसवलं आहे. आज आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत. त्यांचे आमचे सगळे सबंध संपले आहेत. हे मी आज राज्य कार्यकारिणी समोर जाहीर करतो आणि हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mahavikas aghadi government also misled the farmers says raju shetti nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2022 | 02:47 PM

Topics:  

  • kolhapur
  • mahavikas aghadi government
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या
1

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी
2

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.