
महाविकास आघाडीचं ठरलं, प्रचाराचा नारळ गांधी मैदानावर फुटणार; 'या' तारखेला होणार सभा
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील, माजी आमदार लक्ष्मण माने, लाडकी लेक अभियानाच्या वर्षा देशपांडे, नरेंद्र पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा सुषमाराजे घोरपडे, रजनीताई पवार, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, पार्थ पोळके, तेजस शिंदे, समिंद्रा जाधव, अर्चना देशमुख, निलेश जगदाळे, समीर घाडगे, अतुल शिंदे, मंगेश ढाणे, शिवसेनेचे उपप्रमुख विश्वनाथ धनवाडे, रासपचे रमाकांत साठे, श्रमिक मुक्ती संघटनेचे शरद जांभळे, शेकापचे समीर देसाई, सीपीआयचे कॉ शामराव चिंचणे, सीपीआयएमचे माणिक अवघडे, शहर सुधार समितीचे असलम तडसरकर, आम आदमीचे निवृत्ती शिंदे, विवेक कुराडे, आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
सदर बैठकीत गांधी मैदानावर होणारी सभा ही सातारा शहराचा कारभारी बदलण्यासाठी महत्वाची अशी एल्गार सभा मोठ्या ताकदीने करण्याचा निश्चय सर्व महाविकास आघाडीसह घटक पक्षांतील नेत्यांनी केला आहे. या सभेचे मुख्य आकर्षण छत्रपती संभाजीराजे मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे खासदार अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना उबाठाचे उपनेते नितीन भानुगडे पाटील, नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील, भटके विमुक्त जाती संघटनेचे नेते माजी आमदार लक्ष्मण माने, शेकापचे जयंत पाटील, लाडकी लेक अभियानाच्या पुरस्कर्त्या वर्षाताई देशपांडे, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ भारत पाटणकर यांच्यासह घटक पक्षातील सर्व मान्यवर नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२५ रोजी गाधी मैदानावर होणाऱ्या सभेत महाविकास आघाडीच्या विजयाचे रणशिंग तुतारीच्या माध्यमातून फुंकले जाणार आहे. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या कार्यकर्त्यासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे.