Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rain News: बारामतीत पावसाचा कहर; महावितरणचे तब्बल ९२४ खांब जमीनदोस्त

वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या 1912, 18002333435 व 18002123435 या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर विजेशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात.

  • By तेजस भागवत
Updated On: May 28, 2025 | 04:02 PM
Rain News: बारामतीत पावसाचा कहर; महावितरणचे तब्बल ९२४ खांब जमीनदोस्त
Follow Us
Close
Follow Us:

बारामती: मागील आठवड्यात विशेषत: २५ व २६ मे रोजी महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांना व त्यांतर्गत १० उच्चदाब वाहिन्यांना मान्सून पूर्व पावसाचा सर्वाधिक फटका बसला. लघुदाबाचे ६५७ तर उच्चदाबाचे २६७ असे ९२४ खांब जमीनदोस्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर बहुतांश उपकेंद्रांचा वीजपुरवठा काही तासांतच पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले असून, अद्याप फक्त २११३ बिगरशेती ग्राहकांचा वीजपुरवठा बंद आहे. तो पूर्ववत करण्यासाठी वीज यंत्रणा अहोरात्र झटत आहे. मुख्यालय व परिमंडलातील ‘वॉर रुम’ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

महावितरण बारामती मंडलात पुण्यातील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर या सहा तालुक्यांचा समावेश आहे. पूर्व मौसमी पावसाने धुमाकूळ घालत ६ उपकेंद्रांना तडाखा दिला. यामध्ये बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी तर केडगाव विभागातील देऊळगाव व मलठण उपकेंद्रांचा समावेश आहे.

या सर्व उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे, फांद्या कोसळल्या. त्यामुळे तारा तुटून पडल्या. मात्र यंत्रणा सतर्क असल्याने कुठेही वीज अपघात घडला नाही. सुरक्षेची पूर्ण काळजी घेत वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांचे मार्गदर्शनाखाली बारामती मंडलाचे अधीक्षक अभियंता दिपक लहामगे वीजपुरवठा युद्धपातळीवर सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘वॉर रुम’ व नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहेत. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी लागणारे साहित्य, विजेचे खांब, रोहित्र व ऑईलचा मुबलक पुरवठा सर्व विभागांना करण्यात आलेला आहे. तसेच सर्व वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी व मोबाईलवर उपलब्ध राहण्याचे आदेशही महावितरणने दिले आहेत.

वीजपुरवठा व विजेसंबंधिची तक्रार कोठे करावी? 

वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या 1912, 18002333435 व 18002123435 या तीन पैकी एका टोल फ्री क्रमांकावर विजेशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात. हे क्रमांक संकेतस्थळावर व वीजबिलावर प्रकाशित केले आहेत. तक्रार नोंदविताना ग्राहकांनी त्यांचा 12 अंकी ग्राहक क्रमांक नोंदविल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया जात नाही. महावितरणकडे नोंदविलेल्या क्रमांकावरुन 022-50897100 या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास किंवा नोंदणीकृत मोबाईलवरुन “NOPOWER<ग्राहक क्रमांक>” हा संदेश टाईप करुन 9930399303 या क्रमांकावर पाठवल्यास वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते व नोंदणी संदेश ग्राहकाला मिळतो. मोबाईल ॲप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावरही सर्व वीज सेवा घरबसल्या उपलब्ध आहेत.

Web Title: Mahavitaran 924 poles were damaged in baramati duo to heavy rain maharashtra weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • Rain News

संबंधित बातम्या

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली
1

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या
2

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका
3

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन
4

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.