Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti Internal Conflict: महायुतीत वादाची ठिणगी! चंद्रकांत रघुवंशींच्या टिकेमुळे भाजप-शिंदे गट आमनेसामने

Mahayuti Internal Conflict: महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याऐवजी तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या पक्षसंघटनेला बळ देण्यासाठी स्वबळावर ताकद आजमावण्याच्या पवित्र्यात आहेत. यामुळे जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढती ऐवजी तिरंगी किंवा चौकोनी संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 07, 2026 | 05:05 PM
Mahayuti Politics, Nandurbar News, Chandrakant Raghuvanshi, Zilla Parishad Election

Mahayuti Politics, Nandurbar News, Chandrakant Raghuvanshi, Zilla Parishad Election

Follow Us
Follow Us:
  • चंद्रकांत रघुवंशींचा घणाघात
  • कागदपत्रांतील त्रुटींमुळे अर्ज रद्द
  • जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळाची तयारी
Mahayuti Internal Conflict: गेल्या काही महिन्यांपासून महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत वाद सुरु असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात विधानपरिषदेच्या पाच पैकी केवळ दोन जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले. तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवारांचा विजय झाला. पण या पराभवाचे खापर भाजपने शिंदे गटावर फोडले होते. हा वाद शांत होत नाही तोच भाजप आणि शिंदे गटात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीच भाजप आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. नंदूरबारमध्ये (Nandurbar) स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. ‘एक लाख १० हजार मतदारांमध्ये भाजपला एकही पात्र उमेदवार सापडला नाही,अशी टिका चंद्रकांत रघुवंशी यांनी केल्याने भाजप चांगलीच भडकली आहे.

NCP Politics: रुग्णालयातील भेटीगाठींचा राजकीय सस्पेन्स! वेळ घेऊनही सुनेत्रा पवारांची भेट का टळली?

नेमका काय आहे वाद?

नंदुरबारमध्ये एका स्वीकृत नगरसेवकाने राजीनामा दिल्यानतंर नव्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु होती. पण कागदपत्रातील त्रुटींमुळे भाजपने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज प्रांतिधिकाऱ्यांनी बा ठरवला. यावरून आमदार रघुवंशी यांनी भाजपवरच निशाणा साधला. नंदूरबार शहरात तब्बल 1 लाख 10 हजार मतदार असताना, भाजपला स्वीकृत नगरसेवकपदासाठी एकही लायक आणि पात्र माणूस मिळू नये, याची मला लाज वाटते. योग्य उमेदवार शोधण्यासाठी इतरांचे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होते. असा खोचक टोला रघुवंशी यांनी लगावला. रघुवंशी यांच्या याच टिकेवरून महायुतीत वाद उफाळून आला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत राजकीय फूट

नंदूरबार जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या (Zilla Parishad Election) पार्श्वभूमीवर महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष म्हणजेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. या निवडणुकीपूर्वीच महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्यामुळे खान्देशातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले असून, निवडणुकीपूर्वीच राजकीय संघर्षाला तीव्र सुरुवात झाली आहे.

Chandrapur News: ११ वर्षे सेवा, तरी दिवाळीत वेतन नाहीच; चंद्रपूर मनपातील कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा निर्णय

महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याऐवजी तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या पक्षसंघटनेला बळ देण्यासाठी स्वबळावर ताकद आजमावण्याच्या पवित्र्यात आहेत. यामुळे जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढती ऐवजी तिरंगी किंवा चौकोनी संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे.

जिल्ह्यात मागील काळात पक्षाच्या माध्यमातून आणि शासनाच्या सहकार्याने झालेल्या विकासकामांच्या जोरावर आपण स्वबळावर बहुमत मिळवू असा ठाम विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आपल्या पारंपारिक मतदारसंघांवर पकड मजबूत करण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: नंदुरबारमध्ये भाजप आणि  शिंदे गटात नेमका कोणता वाद निर्माण झाला आहे?

    Ans: नंदुरबारमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीदरम्यान कागदपत्रांतील त्रुटींमुळे भाजपचा अर्ज प्राधिकाऱ्यांनी बाद ठरवला, ज्यावरून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर उपरोधिक टीका केली.

  • Que: आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर कोणती टीका केली आहे?

    Ans: "१ लाख १० हजार मतदार असताना भाजपला स्वीकृत नगरसेवक पदासाठी एकही पात्र माणूस मिळू नये, याची लाज वाटते," अशी टीका रघुवंशी यांनी केली.

  • Que: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची नंदुरबारमध्ये काय भूमिका आहे?

    Ans: आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.

Web Title: Mahayuti internal conflict nandurbar chandrakant raghuvanshi slams bjp as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Mahayuti Politics
  • Nandurbar News

संबंधित बातम्या

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे
1

Mahayuti Internal Politics: मुख्यमंत्री फडणवीसांचा दादा भुसेंना झटका; शालेय शिक्षण विभागातील निर्णय थेट सनदी अधिकाऱ्यांकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.