नंदुरबारमधील रस्त्यांची अवस्था पाहून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर रस्त्यांची खराब अवस्था दिसल्याचे सांगत त्यांनी संबंधित विभागाला जाब विचारण्याचा इशारा दिला.
Toranmal Tourism : नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण 'तोरणमाळ'चा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विकास करून त्याला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवले जाईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी…
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
वेळेवर लॉकअप न होऊ देणे, प्रशासनाविरुद्ध अर्ज करण्यास प्रवृत्त करणे, जेवण किया ई-मुलाखतीसारख्या कारणांवरून वातावरण तापवणे, अशा घटना वाढत असल्याची माहिती आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा-धडगावसारख्या दुर्गम भागात आजही बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने प्रसूती केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाकडून कोट्यवधी निधी खर्च असूनही आरोग्य योजना तिथपर्यंत पोहोचत नाहीत.
अपघातात जखमी झालेल्यांना भाविकांना तातडीने उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की, अनेकजण जागीच मृत्युमुखी पडले तर जखमी भाविक दुखापतींनी विव्हळताना दिसून आले.
नंदुरबार आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र…
नंदुरबार हिल्यातील तळोदा तालुक्यातील ढवळीविहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात नदीवर पूल नसल्यामुळे मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून नेण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई आयटी आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना औषध साठा पोचवण्यात येणार आहे. यासाठी ड्रोनची मदत मिळणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
शहादा-प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील करजई टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात शहादा येथील रहिवासी असलेले हरजीत सिंग राजपाल (वय ६०) यांचा मृत्यू झाला.