Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव शेरीत टिंगरे-मुळीकांच्या राजकीय वैमनस्याचा फटका महायुतीला बसणार? वरिष्ठांसमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान

वडगांव शेरी मतदारसंघात मनसेचा मतदार आहे. ताे निर्णायक भुमिका घेऊ शकताे. मनसेकडून या मतदारसंघात उमेदवार उभा केला गेला नाही. यामुळे मनसेचे कार्यकर्ते काेणाच्या बाजुने काैल देणार हे महत्वाचे ठरणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 01, 2024 | 01:57 PM
वडगाव शेरीत टिंगरे-मुळीकांच्या राजकीय वैमनस्याचा फटका महायुतीला बसणार? वरिष्ठांसमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान

वडगाव शेरीत टिंगरे-मुळीकांच्या राजकीय वैमनस्याचा फटका महायुतीला बसणार? वरिष्ठांसमोर नाराजी दूर करण्याचे आव्हान

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघात दाेन राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्येच लढत रंगणार आहे. यामध्ये महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्यासमाेर भाजपची नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बापू पठारे यांना भाजपचे पदाधिकारी साथ देतील का? हा कळीची मुद्दा ठरणार आहे. शहराच्या उत्तर पुर्व भागात असलेल्या या मतदारसंघाचे भाैगाेलिक क्षेत्रही माेठे आहे. २००९ साली झालेल्या निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे अजय भाेसले हे लढले हाेते. तेव्हा भाेसले यांचा बापू पठारे यांनी पराभव केला हाेता. २०१४ साली जगदीश मुळीक यांनी भाजपच्या लाटेत हा मतदारसंघ जिंकला हाेता. यानंतर या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. या भागातील काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ साली झालेल्या महापािलका निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली हाेती. २०१४ साली विद्यमान आमदार  टिंगरे हे शिवसेनेकडून लढले हाेते. तेव्हा टिंगरे यांनी मुळीक यांना चांगली लढत दिली हाेती. २०१९ साली टिंगरे हे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून रिंगणात उतरले. त्यांनी हा मतदारसंघ भाजपकडून काबीज केला. या निवडणुकीत विद्यमान आमदार मुळीक हे पराभूत झाले हाेते.

गेल्या अडीच वर्षात राज्यातील राजकीय परीस्थिती बदलली. त्याचप्रमाणे वडगाव शेरी मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीतील अंतर्गत पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. भाजपला हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात हवा हाेता. परंतु, ताे अखेरपर्यंत मिळू शकला नाही. माजी आमदार मुळीक यांना पक्षाकडून ए.बी. फाॅर्मही दिला गेला हाेता. परंतु उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाेन करून मुळीक यांची समजुत काढली. त्यामुळे या मतदारसंघात आता  दुरंगी सामना हाेणार आहे. या मतदारसंघात आजपर्यंत तीन निवडणुका झाल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन आमदार निवडुन आला आहे. मतदारांनी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली नाही, असे चित्र येथे आहे. परंतु यावेळी एक विद्यमान आणि एक माजी आमदार समाेरासमाेरआहेत.

भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या पदरी निराशा

लोकसभा निवडणुकीत वडगावशेरीतून मुरलीधर मोहोळ यांना मताधिक्य मिळवून देण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे या मतदार संघातून निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आग्रही हाेते. त्यांच्या पदरी निराशा आली आहे. ही नाराजी दुर करण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे असणार आहे. टिंगरे आणि मुळीक यांच्यातील राजकीय वैमनस्य गेल्या तीन वर्षात दिसुन आले. सातत्याने एकमेकांवर टिका , आरोप त्यांच्याकडून केले गेले. आता एकत्रित मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

हेही वाचा: Maharashtra Election 2024: वडगाव शेरीत भाजपच्या जगदीश मुळीकांचा यू-टर्न; देवा भाऊंचा एक फोन आणि…

 मनसेचा उमेदवार नाही, आरपीआय नाराज

वडगांव शेरी मतदारसंघात मनसेचा मतदार आहे. ताे निर्णायक भुमिका घेऊ शकताे. मनसेकडून या मतदारसंघात उमेदवार उभा केला गेला नाही. यामुळे मनसेचे कार्यकर्ते काेणाच्या बाजुने काैल देणार हे महत्वाचे ठरणार आहे. महायुतीच्या जागा वाटपात आरपीआय (आठवले गट) कडून हा मतदारसंघ मागितला गेला. परंतु, त्यांना मिळाला नाही, यामुळे आरपीआयचे स्थानिक कार्यकर्ते नाराज असून माजी उपमहापाैर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.  मतदारसंघात बसपा, राष्ट्रीय समाज पक्ष आदी राजकीय पक्षांचे उमेदवार असून त्यांना किती मते मिळणार यावर निकाल अवलंबुन आहे.

पाेर्शे कार अपघाताचा राजकीय वापर ?

पाेर्शे कार अपघाताचा विषय या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उचलला जाण्याचे सुताेवाच यापुर्वीच मिळाले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी विद्यमान आमदार टिंगरे यांच्यावर जाेरदार टिका केली आहे.

Web Title: Mahayuti ncp sunil tingre candidate of vadgaon sheri for maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 01:57 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly Elction 2024
  • Sunil Tingre

संबंधित बातम्या

TMC खासदाराने संसदेत ओढली ई-सिगरेट? भाजपने Video शेअर करत विचारला जाब
1

TMC खासदाराने संसदेत ओढली ई-सिगरेट? भाजपने Video शेअर करत विचारला जाब

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष
2

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं
3

जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं

BJP Politics: भाजपने खेळला मोठा डाव! ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी
4

BJP Politics: भाजपने खेळला मोठा डाव! ‘या’ नेत्यावर सोपवली अध्यक्षपदाची जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.