Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

भाजप बहुमताचा आकडा गाठेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपकडून नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावे महापौर पदासाठी पुढे येत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 05, 2026 | 11:12 AM
Bhiwandi Mayoral Election:

Bhiwandi Mayoral Election:

Follow Us
Follow Us:
  • भिवंडीच्या महापालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच
  • काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून चार पावले दूर
  • समाजवादी पक्षाकडून महापौर पदाची मागणी- पक्षाचे सर्व नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
Bhiwandi Mayoral Election: भिवंडीच्या महापालिकेच्या सत्तास्थापनेचा पेच दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. निकालाला तीन आठवडे उलटून गेले तरी महापौरपदाचा निर्णय अद्याप गुलदस्त्यातच आहे. सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून चार पावले दूर आहे, तर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेनाही आकड्यांच्या खेळात अडकली आहे.

त्याचवेळी निर्णायक ठरणारा समाजवादी पक्षाकडून महापौर पदाची मागणी करण्यात आली असून पक्षाचे सर्व नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाबळेश्वरपासून अज्ञात स्थळांपर्यंत सुरू असलेल्या या सत्तानाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कोणाच्या हातात जाणार, आणि महापौरपदाचा तिढा कधी सुटणार, याकडे भिवंडीकरांचे लक्ष लाागले आहे.

BMC Mayoral Election: मुंबई उपमहापौरपदासाठी मोठी फिल्डिंग:शिंदे गटाकडून दोन महिला नेत्या मैदानात

नगरसेवक फुटण्याच्या भीतीने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आपले नगरसेवक महाबळेश्वर परिसरात ठेवल्याची चर्चा आहे, तर समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक देखील अज्ञात स्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेस 30, भाजप 22, शिवसेना (शिंदे गट) 12, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 12, समाजवादी पक्ष 6, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3 आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल असून बहुमताचा आकडा 46 आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षविरोधी भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचा खुला प्रचार केला. काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादीचे 12 असे एकूण 42 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर महापौर पदासाठी काँग्रेस, समाजवादी आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची स्थापना केली. काँग्रेसचा महापौर बसवण्यासाठी तारीक मोमीन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर

मात्र समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक अचानक गायब झाले असून, “समाजवादी पक्षाचा महापौर बसवला तर आम्ही सोबत येऊ, अन्यथा आमच्याकडे इतर पर्याय खुले आहेत,” अशी भूमिका समाजवादी नगरसेवकांनी घेतल्याचे समजते. या निवडणुकीत भाजपने 22 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. महापौर पदासाठी भाजपने जोरदार तयारी दाखवली असून भाजपचे 22 आणि शिवसेनेचे 12 असे एकूण 34 नगरसेवक आहेत. इतर मित्रपक्ष संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

भाजप बहुमताचा आकडा गाठेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपकडून नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावे महापौर पदासाठी पुढे येत आहेत. भिवंडी शहराच्या विकासासाठी सत्तेत असलेल्या सरकारचाच महापौर असावा, भिवंडी महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल, असा विश्वास भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

भाजप गटनेते संतोष शेट्टी काय म्हणाले ?

भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 30 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली. मात्र महापौर पदासाठी काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 असे एकत्र करत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची स्थापना करण्यात आली. सेक्युलर महापौर व्हावा, यासाठी काँग्रेसने दावा केला असून तारीक मोमीन यांचे नाव चर्चेत आले. मात्र समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक गायब झाल्याने काँग्रेसला बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज आहे.

 

रशीद ताहीर मोमीन (काँग्रेस, भिवंडी शहराध्यक्ष)

भिवंडी शहर काँग्रेस अध्यक्ष आणि भिवंडी सेक्युलर फ्रंटचे अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी सांगितले की, “अजून वेळ गेलेली नाही, महापौर पदाची निवडणूक होणे बाकी आहे. आमच्या संपर्कात 48 नगरसेवक आहेत. भाजपला चिंता करण्याची गरज आहे, आम्हाला नाही. महापौर काँग्रेसचाच होणार.”

 

 

 

 

Web Title: The suspense over the bhiwandi mayoral post continues the samajwadi party is not reachable

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Nationalist Congress Party
  • Samajwadi Party

संबंधित बातम्या

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?
1

राजकारणात मोठी खळबळ! उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच विमानातून नागपूरला; योगायोग की नवे राजकीय संकेत?

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
2

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
3

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन
4

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.