
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटनासाठी आलेले हे तीन पर्यटक गुहागरच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरले होते. आनंद लुटत असतानाच समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या. लाटांचा वेग आणि पाण्याचा ओघ इतका प्रचंड होता की, तीनही पर्यटक किनाऱ्यापासून दूर ओढले गेले आणि बुडू लागले स्थानिकांचे धाडस, पण एकाचा जीव गेला पर्यटक बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने बचावकार्य राबवून तिघांना पाण्याबाहेर काढले.
अमोल मुत्ते (वय 42वर्ष) राहणार मुंबईअमोल मुत्ते यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. इतर तीन पर्यटकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.स्थानिक प्रशासनाकडून अनेकदा पर्यटकांना वारंवार सतर्क राहण्यासाचं आवाहन केलं जातं. मात्र काही हुल्लडबाज पर्यटक या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. या सगळ्याने भविष्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी होतो. परिणामी यासगळ्याने स्थानिक पर्य़टन व्यवसायाला फटका बसतो. त्यामुळे कोकणात समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर स्वत: चीू काळजी घ्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सुचनांचं पालन करा असं आवाहन पर्यटकांना केलं जात आहे.
Ans: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पोहायला उतरलेले तीन पर्यटक समुद्राच्या जोरदार लाटांमुळे बुडाले. स्थानिकांनी तिघांनाही बाहेर काढले, मात्र एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Ans: समुद्रातील अचानक उसळलेल्या मोठ्या लाटा, पाण्याचा जोरदार ओघ आणि लाटांचा अंदाज न आल्यामुळे पर्यटक किनाऱ्यापासून दूर ओढले गेले आणि बुडू लागले.
Ans: स्थानिक प्रशासनाकडून पर्यटकांना समुद्रात उतरताना काळजी घेणे, धोक्याच्या वेळी पोहणे टाळणे आणि सूचनांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जाते.