इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषण प्रकरणामुळे बंद पडलेली आणि न्यायालयीन कारवाईला सामोरे गेलेल्या मिटेनी एस.पी.ए. या रासायनिक कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी करून लोटे येथे वापरात आणल्याचे वृत्त समाजमाध्यमावर गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनीही याबाबत दखल घेत वृत्त प्रसारित केल्याने स्थानिक पातळीवर त्याची अधिक चर्चा होऊ लागली आहे. याविषयीचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्याने संशयकल्लोळ वाढत चालला आहे. लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच पीएफएएससारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास वाशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रकल्पाला परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा केला असला, तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटींच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
कंपनीने जून पासून चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांमधील वेस्ट (टाकाऊ माल) त्यांनी जाळण्यासाठी तळोजा येथे पाठवला आहे. 4नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीला भेट दिली होती. कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तो पुढे तज्ज्ञ समिती स्थापून त्यांच्याकडे पाठवला जाणार आहे. या तज्ज्ञ समितीकडून खात्रीशीर अहवाल आल्यानंतरच कंपनीबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
कंपनीबाबत दिवसेंदिवस व्हायरल होत असलेल्या माहितीमुळे आता ही कंपनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर आली आहे. यासंदर्भात मुंबईतही वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. अखेर सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक कंपनीत पाठवण्यात आले. कंपनीतील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स याच्यासह परवाने यांची तपासणी केली जात आहे. नेमकं खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा यानिमित्ताने केली जात आहे.
लोटे वसाहतीमधून तळोजा येथे वेस्ट रसायन घेऊन जाणरे वाहतूकदार यांनी याआधी रसायन कशेडी घाटात आणि बोरज धरणात सोडले असल्याच्या घटना याठिकाणी घडल्या आहेत. कोकणात सीईटीपी आणि घातक कचऱ्याचे वाहतूकदार हे नियम आणि कायधाचे उल्लंघन करत असल्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत असताना सर्व वैधानिक प्रक्रिया प्रत्यक्षात पाळल्या जातील याची खात्री एलआयओएल कशी देईल असे कंपनीचे साईड हेड श्री. पाटील यांनी सांगितले. यामुळे भविष्यात लोटे वसाहतीमध्ये इटलीची पुनरावृत्ती होण्याची भीती परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Ans: लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजच्या उपकंपनीने इटलीमध्ये पर्यावरणीय प्रदूषणामुळे बंद पडलेल्या मिटेनी एस.पी.ए. या कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान व पेटंट्स वापरात आणल्याचा आरोप समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
Ans: इटलीतील या कंपनीवर पीएफएएससारख्या घातक रसायनांमुळे गंभीर पर्यावरणीय प्रदूषण केल्याचा आरोप होता. त्यामुळे ती कंपनी बंद पडली व न्यायालयीन कारवाईला सामोरी गेली.
Ans: लोटे औद्योगिक वसाहत आधीच संवेदनशील प्रदूषण क्षेत्र आहे. जर पीएफएएससारखी रसायने तयार झाली तर वाशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी व मानवी आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात.






