मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज विधीमंडळ सभागृहात बहुमत सिद्ध केले आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला. त्यानंतर आज त्यांची कसोटी लागणार होती. सकाळी ११ वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानाने त्यांनी बहुमत सिद्ध केले. दरम्यान या चाचणीसाठी आमदारांचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी – काँग्रेसचे जवळपास १० ते १२ आमदार गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश होता. यानंतर हे आमदार नाराज होते का? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
प्रथेप्रमाणे आधी चर्चा आणि नंतर मतदानाची प्रक्रिया होते. त्यामुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला. सभागृहाचे दरवाजे बंद झाल्यानंतर २-३ मिनिटातच आम्ही तिथे पोहोचलो होतो. आम्हाला तिथे यायला फक्त २-३ मिनिटच उशीर झाला होता. मात्र, बहुमत चाचणी आधीच सुरू झाल्याने आम्ही आत जाऊ शकलो नाही, असं ते म्हणाले. बहुमत चाचणीवेळी गैरहजर असलेले आमदार महाविकास आघाडीवर नाराज होते का? असा सवाल केला असता चव्हाण म्हणाले, की यात काहीही राजकीय अर्थ नाही. बाहेर मी एकटा नव्हतो तर राष्ट्रवादी-काँग्रेसचे जवळपास १०-१२ आमदार होते. यामागे कोणतंही राजकीय कारण किंवा नाराजी नाही. आम्ही आज आणि उद्याही महाविकास आघाडीसोबत आहोत. आम्ही कायम महाविकास आघाडीसोबत राहाणार आहोत, असं ते म्हणाले. तसेचं आम्ही वेळेवर बहुमत चाचणीसाठी तिथे पोहोचलो नाही याचा फार फरक पडला नाही. भाजप-शिंदे यांच्याकडो १६४ मतं होती. त्यामुळे बहुमत त्यांच्याकडेच होतं. असंही ते म्हणाले.
[read_also content=”आमदार भास्कर जाधव यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/mla-bhaskar-jadhavs-emotional-appeal-to-chief-minister-eknath-shinde-said-nrdm-300446.html”]
कोणते आमदार अनुपस्थित होते?
१- नवाब मलिक — राष्ट्रवादी
२-अनिल देशमुख –राष्ट्रवादी
३-जितेश अंतपुरकर–काँग्रेस
४-झिशान सिद्दीकी– काँग्रेस
५- दत्तात्रय भरणे -राष्ट्रवादी
६ -अण्णा बनसोडे –राष्ट्रवादी
७ -बबनदादा शिंदे –राष्ट्रवादी
८ -राहुल नार्वेकर– भाजप( मतदान करु शकत नाहीत)
९-मुक्ता टिळक– भाजप
१०-लक्ष्मण जगताप–भाजप
११-मुफ्ती इस्माईल– MIM
१२- प्रणिती शिंदे–काँग्रेस
१३- अशोक चव्हाण–काँग्रेस
१४-विजय वडेट्टीवार–काँग्रेस
१५- धीरज देशमुख–काँग्रेस
१६ -कुणाल पाटील–काँग्रेस
१७ -आण्णा बनसोडे–राष्ट्रवादी
१८ -संग्राम जगताप– राष्ट्रवादी
१९ – दत्ता भरणे– राष्ट्रवादी
२० -राजू आवळे–काँग्रेस
२१- मोहन हंबर्डे–काँग्रेस
२२;शिरीष चौधरी–काँग्रेस