Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक सक्तीच्या रजेवर; ‘हे’ आहे त्यामागचं कारण…

तसेच गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूबाबत देखील बातमी व व्हिडिओ समाजमाध्यमांत प्रसिध्द झाला होता. त्या अनुषंगाने देखील योगेश पाठक व तानाजी जाधव यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 24, 2025 | 11:06 AM
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक सक्तीच्या रजेवर; 'हे' आहे त्यामागचं कारण...

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक सक्तीच्या रजेवर; 'हे' आहे त्यामागचं कारण...

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : दर्शनरांगेतील बॅरिकेटींग कामाच्या ई-निविदेसंदर्भात प्राप्त तक्रारी व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी ॲड. माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. ही समिती पुढील 8 दिवसांत चौकशी अहवाल देणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिर समितीच्या सभेत पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील कार्यालयात बुधवारी (दि.23) सह अध्यक्ष औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ॲड. माधवी निगडे, लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते. दर्शनरांगेतील बॅरिकेटींग कामाच्या ई-निविदेसंदर्भात प्राप्त तक्रारी व गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीच्या सदस्या ॲड. माधवी निगडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली.

हेदेखील वाचा : दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडे मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर अधिकाऱ्याला पाठवलं घरी

त्यामध्ये शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर यांचा सदस्य पदावर समावेश करण्यात आला आहे. सदरची समिती पुढील 8 दिवसांत चौकशी करून मुख्य समितीसमोर अहवाल सादर करणार आहे. सदर चौकशी पूर्ण होऊन पुढील निर्णय होईपर्यंत व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

दर्शनरांगेतील बॅरिकेटिंग कामाच्या ई निविदे-संदर्भात पुरुषोत्तम सग्गम, सोलापूर यांनी आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी संदर्भात समाजमाध्यमांत बातमी प्रसिध्द झाली होती व काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना नोटीस बजावून खुलासा घेण्यात आला होता. तसेच गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूबाबत देखील बातमी व व्हिडिओ समाजमाध्यमांत प्रसिध्द झाला होता. त्या अनुषंगाने देखील योगेश पाठक व तानाजी जाधव यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधितांना कारणे दाखवा नोटीस

तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व तत्कालीन विभागप्रमुख डॉ. प्रशांत सर्वगोड व सध्याचे विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. सदरच्या दोन्ही घटना मंदिर समितीने गांभीर्याने घेतल्या असून, या दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Manager of shri vitthal rukmini temple committee on compulsory leave

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • Pandharpur News
  • Shri Vitthal Rukmini Temple
  • Solapur News

संबंधित बातम्या

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच
1

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच

पंढरपुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत; भालके, शिरसट, साबळेंमध्ये रंगणार सामना
2

पंढरपुरात नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत; भालके, शिरसट, साबळेंमध्ये रंगणार सामना

टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…
3

टेंभुर्णीजवळ टॅंकरची दुचाकीला जोरदार धडक; बाप-लेकाचा जागीच मृत्यू, सकाळीच ड्युटी संपवली अन्…

‘मरायच्या आधी सर्वांच्या मनातून…’; इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं जिवन
4

‘मरायच्या आधी सर्वांच्या मनातून…’; इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं जिवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.