Manmohan Singh Funeral Live Updates bjp leader gives Tributes and Final Journey
मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. काल (दि.26) त्यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे अर्थक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती गेला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. देशासह जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच देशामध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्या आहे. तसेच राष्ट्रध्वज देखील निम्मा खाली करण्यात आला आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. यानंतर आता राज्यातील भाजपच्या नेत्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे.
केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नितीन गडकरी यांनी लिहिले आहे की, “देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दु:ख झाले. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे काम केले. उच्चशिक्षित असण्याबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्व नम्र, सभ्य, संवेदनशील आणि देशाप्रती समर्पित होते. भाजप अध्यक्ष म्हणून मला त्यांच्याशी अनेकदा बोलण्याची संधी मिळाली. देशाला पुढे नेण्याचा विचार त्यांच्या मनात नेहमीच होता. हा देश डॉ. मनमोहन सिंग यांना कधीही विसरू शकत नाही. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबाला शक्ती देवो. ओम शांती,” अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
देश के पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह जी के निधन का समाचार सुनकर अतीव दु:ख हुआ। देश के वित्तमंत्री के रूप में भारत की अर्थव्यवस्था को नई दिशा देने का कार्य उन्होंने किया। उच्चशिक्षित होने के साथ साथ विनम्र, शालीन, संवेदनशील और देश के प्रति समर्पित ऐसा उनका व्यक्तित्व था।…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 26, 2024
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत की, “आज संपुर्ण देशात दुःखाची लाट आहे. सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. संवेदनशील शांत स्वभावाचे होते. भाजपच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो. ही पोकळी न भरून निघणारी आहे. विकसित भारताला पुढे नेण्याचं काम मोदी जी करत आहे. मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास, आणि देशासाठी ठेवी असलेली आहे,” अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदरांजली वाहिली आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नागपूरमध्ये भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, “देशातील मोठे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेलं आहे. ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा देऊन अर्थकारण सुव्यवस्थितीत आणलं होतं. मंदीच्या काळात सुद्धा अर्थकारणाची घडी नीट बसवणारा नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. प्रत्येक राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध देशासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचलं आणि देशभक्तीसाठी काम करणारा मोठा नेता आपल्यातून गेला आहे. इकॉनोमी विषय आल्यानंतर मनमोहन सिंग यांचं नाव देशात कधीच लपून राहू शकत नाही. एवढं मोठं योगदान आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांच होतं. अर्थमंत्री, पंतप्रधान म्हणून केलेली कामगिरी चिरंतर लक्षात राहील. अशा नेत्यांला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो,” असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.