• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mns Leader Raj Thackeray Pays Tribute To Manmohan Singh Through Social Media Post

Manmohan Singh Death मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते…; राज ठाकरेंची आदरांजली देत खास पोस्ट

Manmohan Singh Funeral : देशाचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे काल निधन झाले आहे. त्यांना जगभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी खास पोस्ट लिहिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 27, 2024 | 11:27 AM
MNS leader Raj Thackeray pays tribute to Manmohan Singh through social media post

मनसे नेते राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट करुन मनमोहन सिंग यांना वाहिली आदरांजली (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डय मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असून अर्थविषयक अभ्यासू व्यक्तीमत्व हरपल्याची भावना जगभरातून व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे. तसेच राज्यातील नेत्यांनी देखील त्यांना आदरांजली वाहिली आहे. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी सांगणारी खास पोस्ट लिहिले आहे.

मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर खास पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, “भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.”

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

“जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, “no power on earth can stop an idea whose time has come”. थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग.”

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली… pic.twitter.com/hZCkKw8jqv — Raj Thackeray (@RajThackeray) December 27, 2024

“पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, “I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…. ”

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

“डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.”

“डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन…”

Web Title: Mns leader raj thackeray pays tribute to manmohan singh through social media post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 11:27 AM

Topics:  

  • Dr. Manmohan Singh
  • manmohan singh death

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg News : विजयदुर्ग किल्ल्याचा होणार कायापालट ? पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

Sindhudurg News : विजयदुर्ग किल्ल्याचा होणार कायापालट ? पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा

Jan 03, 2026 | 06:20 PM
मराठी सिनेमाचा ऐतिहासिक क्षण, ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा ‘दशावतार’, मुख्य श्रेणी स्पर्धेत चित्रपटाची निवड

मराठी सिनेमाचा ऐतिहासिक क्षण, ऑस्करच्या दारात पोहोचला प्रभावळकरांचा ‘दशावतार’, मुख्य श्रेणी स्पर्धेत चित्रपटाची निवड

Jan 03, 2026 | 06:14 PM
Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक

Jan 03, 2026 | 06:06 PM
Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा

Maharashtra Politics : भाजपाचा संकल्पनामा तर बनवाबनवी! नांदेडमध्ये महायुतीच्याच नेत्याने साधला निशाणा

Jan 03, 2026 | 06:06 PM
Amravati News: मंत्री निवडणुकीत मस्त! हजारो विद्यार्थी गणवेशाविना त्रस्त

Amravati News: मंत्री निवडणुकीत मस्त! हजारो विद्यार्थी गणवेशाविना त्रस्त

Jan 03, 2026 | 05:54 PM
Maharashtra Politics: भाजप-अजित पवारांमध्ये वाद भडकणार? ‘पैलवानाच्या नादाला…’; विषय काय?

Maharashtra Politics: भाजप-अजित पवारांमध्ये वाद भडकणार? ‘पैलवानाच्या नादाला…’; विषय काय?

Jan 03, 2026 | 05:54 PM
परभणीत १९७ जणांची माघार, ४११ जण रिंगणात; परभणी महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

परभणीत १९७ जणांची माघार, ४११ जण रिंगणात; परभणी महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Jan 03, 2026 | 05:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM
Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Vasai : नायगावच्या सलूनमध्ये वाजलं ‘कश्मीर बनेगा पाकिस्तान’ गाणं

Jan 03, 2026 | 03:23 PM
Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Jan 03, 2026 | 03:19 PM
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.