मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी वाहिली डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (दि.26) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले डॉ. मनमोहन सिंग हे 92 वर्षांचे होते. देशाचे पहिले शीख पंतप्रधान म्हणून काम केलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्यातील नेत्यांनी देखील डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी लिहिले आहे की, आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाने आपण एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी गमावले आहे. भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेले योगदान, पंतप्रधान म्हणून १० वर्षे देशाची सेवा करणे, हे कायमचे लक्षात राहील. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि चाहत्यांना मनापासून श्रद्धांजली. ॐ शांति !, अशी आदरांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली आहे.
With the demise of our Former PM Dr Manmohan Singh ji, we have lost a great scholar, economist & statesman.
His contributions in Indian economic reforms, serving our Nation as PM for 10 years, will be remembered forever.
My heartfelt tributes to him.
Deepest condolences to his… pic.twitter.com/Hi91eygZXf— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 26, 2024
माजी मनमोहन सिंग यांच्या आठवणींना नेत्यांनी दिला उजाळा
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजित पवार यांनी लिहिले आहे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. एक सज्जन मनाचे, त्यांचे दूरदृष्टी आपल्या देशाच्या आर्थिक विकासात एक महत्त्वाचा टप्पा ठरले. या कठीण काळात माझे विचार आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबा आणि मित्रांसोबत आहेत, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग काळाच्या पडद्याआड; 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन पोस्ट करुन आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे की, “देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची… pic.twitter.com/ulc8yITrE0
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 26, 2024