Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: ’28 तारखेपर्यंत प्रमाणपत्र द्या, अन्यथा…’, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, आंदोलनाची घोषणा

Maratha Reservation: अंतरवाली सराटी येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी 28 ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्रे देण्याची मागणी केली. अन्यथा 29 ऑगस्टपासून अंतिम आणि निर्णायक आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 12:59 PM
Manoj Jarange Patil, Azad Maidan Protest, Mumbai Police

Manoj Jarange Patil, Azad Maidan Protest, Mumbai Police

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
  • अंतरवालीतून मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, अंतिम लढ्याची घोषणा
  • 29 ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange August 29 Protest News Marathi: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. 28 ऑगस्टपर्यंत हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला प्रमाणपत्रे द्या, अन्यथा 29 ऑगस्टपासून शेवटचे निर्णायक आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असल्याचे सांगत, यावेळी कोणतीही माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मराठा समाज न्यायासाठी लढत आहे. समाजाच्या संयमाची वारंवार परीक्षा घेतली जात असून, मराठा समाजाला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता समाजाने पुन्हा एकदा एकजुटीने उभे राहण्याची वेळ आली आहे. “29 ऑगस्टला आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण होत असून त्या दिवशी शेवटचा निर्णायक लढा सुरू होईल. एकही मराठा घरी थांबू नये,” असे आवाहन त्यांनी केले.

Kunbi Certificate : मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणाला वेग; आत्तापर्यंत 3 लाखांहून अधिक प्रमाणपत्रांचे वितरण

58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांवरून सरकारवर टीका

जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, 58 लाख नोंदी उपलब्ध असूनही पात्र मराठा बांधवांना प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. हैदराबाद गॅझेटमधील नोंदी वैध मानल्या जात असतील, तर त्यानुसार प्रमाणपत्रे देण्यास सरकार का टाळाटाळ करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहनही केले. “हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळेपर्यंत आता थांबायचे नाही,” असे ते म्हणाले.

“समाजातील लेकरांसाठी शेवटचा लढा”

“गेली तीन वर्षे मराठा समाजाच्या लेकरांचे हाल होत आहेत. त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. 58 लाख नोंदींची प्रमाणपत्रे मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांनी आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याचीही मागणी केली. “मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

सरकारने मराठा समाजासाठी विविध सवलती आणि योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात लागू झालेल्या नाहीत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. त्यांनी म्हटले की, उपोषणानंतर सरकारने ओबीसी सवलती लागू करण्याबाबत शासन निर्णय (जीआर) काढल्याचा दावा केला, मात्र संबंधित विभागांकडून त्याची अंमलबजावणीच झालेली नाही. सारथी संस्थेच्या योजना कागदावरच आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांमध्येही अनेक तरुणांना लाभ मिळालेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

स्वतंत्र मराठा मंत्रालयाची मागणी

यावेळी जरांगे पाटील यांनी स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज असल्याचे सांगत, सरकारला ते स्थापन करण्यात नेमकी अडचण काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“29 ऑगस्टला 9 जणांची नावे सांगणार”

भाषणादरम्यान त्यांनी एक मोठा दावा करत “29 ऑगस्टला मराठा समाजाच्या प्रश्नांमध्ये अडथळे आणणाऱ्या 9 जणांची नावे जाहीर करणार” असे सांगितले. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

सरकारवर दुजाभावाचा आरोप

निवड झालेल्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जात नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर दुजाभाव केल्याचा आरोप केला. “ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला जातो, मग निवड झालेल्या मराठा तरुणांना नियुक्त्या का दिल्या जात नाहीत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांना भरलेले शुल्क परत मिळणार; सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश

29 ऑगस्टच्या आंदोलनासाठी समाजाला आवाहन

शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. “29 ऑगस्ट रोजी गावागावातील मराठे वाघासारखे मैदानात उतरतील. हा लढा समाजाच्या भविष्यासाठी असून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असे ते म्हणाले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकार 28 ऑगस्टपूर्वी काय निर्णय घेते आणि आंदोलन टाळण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Manoj jarange patil august 29 final maratha reservation protest ultimatum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • maharashtra
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.