manoj jarange patil claim OBCs attempt to create riots in Maratha reservation movement
जालना : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आता महायुती सरकारचे टेन्शन आणखी वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांपूर्वी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पेटणार आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे आता विरोधक त्रिसूत्री भाषा आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवरुन राज्य सरकारला घेरणार आहेत.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला होता. उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून मराठा आरक्षणासाठी लढा दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या नाकी नऊ आणले होते. आता राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी पुन्हा एकदा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज अंतवाली सराटीमध्ये राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. यावेळी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधले. यावेळी ते म्हणाले की, “आता आपल्याला गावागावातून तयारी करायची आहे, मैदान गाजवायचं आणि विजय मिळवायचा आहे. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जायचं म्हणजे जायचं. 27 ऑगस्टला अंतरवली सोडायची, कुठेही न थांबता मुंबई गाठायची आहे. या वेळी जायचा मार्ग बदलायचा आहे. गेल्या वेळी पुणे जिल्ह्यातील सगळ्या जाती धर्मातील लोकांनी आपली सेवा केली, त्यामुळे त्यांचे आभार मानतो. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली मधून 10 वाजता निघायचं,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मोर्चाची तयारी दाखवून दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मराठ्यांची लाट काय असते, हे मुंबईत आल्यावर बघा, इथून 10 ते 12 लाख लोक निघाले पाहिजेत, पाऊस पाणी बघू नका. फक्त तुम्ही सर्व जण माझ्या मागे राहा, मी बघतोच की हे आरक्षण कसे देत नाहीत, 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करायचं आहे. फक्त माझ्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा, 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही. मराठ्यांनी आता हुशार व्हा,आपल्या बाजूने विजयाची चाहूल लागली आहे, त्यामुळे घरी थांबायचं नाही. तुमच्या ताकदीशिवाय कोणालाही विजय मिळवता येत नाही, आतापासून मुंबईला जाण्याच्या तयारी लागा,घरोघरी जाऊन सांगा,” अशा शब्दांत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केले आहे.