Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हाय कोर्टाचा लगाम; तरीही मनोज जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना हाय कोर्टाने धक्का दिला असून मुंबईमध्ये आंदोलन करण्यास मनाई केली आहे. यावर आता जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 26, 2025 | 03:03 PM
manoj jarange patil reaction on mumbai high court decision on Maratha reservation

manoj jarange patil reaction on mumbai high court decision on Maratha reservation

Follow Us
Follow Us:

Jarange Patil on Mumbai High Court : मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांना ओबीसीमधून मराठा आरक्षण हवा असून याशिवाय मराठा समाजासाठी त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. यासाठी जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहेत. मात्र यावर हाय कोर्टाने नकार देत मुंबई बाहेर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील हे लाखो समर्थकांसह मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करायचे आहे. मात्र याला मुंबई हाय कोर्टाने नकार दिला आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्याचबरोबर खारघर, नवी मुंबईमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून असे खंडपीठाने नमूद केले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या निर्णयावर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मुंबई हाय कोर्टाच्या निकालानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत 100 टक्के जाणार, न्यायदेवतेचं पालन करु, कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असा विश्वास मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जनतेचं गाऱ्हाण न्यायदेवता ऐकेल. लोकशाही मार्गाने जनता आंदोलन करु शकते. संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करतो आहे. मी 29 ऑगस्टला आझाद मैदानावर येणार आहे. उद्या 10 वाजता आम्ही सगळे मराठे मुंबईकडे कूच करतोय. हा सरकारचा खेळ आहे, न्यायदेवतेचा नाही. रास्त मागण्या आहेत. कायद्याला धरुन आंदोलन आहे, म्हणून पोटदुखी आहे, असा टोला देखील मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अंतरवाली सराटीत पोलिस बंदोबस्त वाढला

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. अंतरवाली सराटीचया सीमेवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईत पुढील दहा दिवस ही अत्यंत धावपळीचे धामधुमीचे असणार आहेत. या काळात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. 29 तारखेला मुंबईत जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Manoj jarange patil reaction on mumbai high court decision on maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 03:03 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा धक्का; Purandar Airport प्रकरणात हायकोर्टाने फेटाळली याचिका
1

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा धक्का; Purandar Airport प्रकरणात हायकोर्टाने फेटाळली याचिका

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश! ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण,काटेकोर करावे लागणार पालन
2

Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश! ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण,काटेकोर करावे लागणार पालन

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार
3

Manoj Jarange Patil: ‘जेलमध्ये गेलो तरी…’, मिशीवर ताव देत शिंदेंच्या स्टाईलची नक्कल; मनोज जरांगे म्हणाले, ‘आम्हीही रडायला लावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.