मुंबई: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात ते मुंबईत धडक देणार आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे भेटीला गेले होते. मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असल्याचे समजते आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावार आंदोलन करणार आहेत. मात्र मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद मैदान सोडून अन्य पर्याय हायकोर्टाने सुचवले आहेत. हायकोर्टाने पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास मनाई केली आहे.
परवानगीशिवाय शहरातील प्रमुख भागात आंदोलन करता येणार नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. खारघर किंवा नवी मुंबई येथे आंदोलन करण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकारसमोर खुला असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील वाहतूक आणि रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी आंदोलनाला परवानगी देऊ नये असे हायकोर्टाने सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांचे OSD जरांगे-पाटलांच्या भेटीला
उद्या राज्यभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील दहा दिवस ही अत्यंत धावपळीचे धामधुमीचे असणार आहेत. या काळात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चची दारे खुली केली आहेत. फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले होते. त्यानंतर जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलनासाठी जण्यावर ठाम असल्याचे समजते आहे.
अंतरवाली सराटीत पोलिस बंदोबस्त वाढला
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे. अंतरवाली सराटीचया सीमेवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईत पुढील दहा दिवस ही अत्यंत धावपळीचे धामधुमीचे असणार आहेत. या काळात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. 29 तारखेला मुंबईत जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.