Manoj Jarange
जालना: मराठा आरक्षणासाठी कित्येक महिन्यांपासून लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोणत्या मतदारसंघातून उमेदवार उतरवणार हे जाहीर केलं नव्हतं. मात्र आज जरांगेंनी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. केज गेवराई आणि आष्टी मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
राजकारणाचा आपल्याला जास्त अनुभव नसल्यामुळे वेळ लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत अधिकृत माहिती देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे बीड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर किंवा फुलंब्री या मतदारसंघातूनही उमदेवार देणार आहेत. तर केज, गेवराई आणि आष्टी मतदारसंघात स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर पुढची निर्णय घेऊ, असंही म्हटलं आहे.
हेही वाचा: भाजपचं संकल्पपत्र प्रसिद्ध; तरुण, गरीब, महिलांसाठी कोणती आश्वासन दिली? वाचा सविस्तर
मनोज जरांगे यांचा निर्णय काय? बीड मतदारसंघातूनही निवडणूक लढवली जाईल तर ज्याठिकाणी त्रास दिला गेल्या तिथे निवडणुकीसाठी उमेदवार उभा केला जाईल, विरोधातील उमेदवाराला पाडून बदला घ्यायचा आहे. केज (राखीव) बाबत मराठा समाज जो निर्णय घेतील ते घेऊ. आज आंतरवाली सराटीमध्ये सर्व मतदार संघातील इच्छुकांची बैठक झाली. या बैठकीत मतदारसंघ निहाय चर्चा करून काही उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित करण्यात आले. तर ज्या मतदारंसंघांमध्ये समीकरणे जुळणार नाहीत, त्याठिकाणी उमेदवार उभे केले जाणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत जशी भूमिका होती. तशीच भूमिका आताही असेल, असे निश्चित करण्यात आले.
हेही वाचा: अजित पवारांची ही टोळी पाकीटमाऱ्यांची टोळी; आमदाराची जिव्हारी लागणारी टीका
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याआधीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी या मतदारसंघातून खात्रीशीर रित्या निवडून येऊ शकतो, तेच मतदारसंघ लढवले जातील. थोड्याच ठिकाणी करायचे पण नीटनेटके करायचे, आमच्यापुढे जे राक्षस आहेत. त्याची आम्ही वाट लावणार आहोत, असा खुला इशाराही त्यांनी दिला होती. पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नका, जातीकडे बघा. निवडणुकीत पडून अपमान पचवायची ताकद आपल्यात नाही. त्यामुळे यावेळी मोजकेच मतदारसंघ लढायचे आणि जिंकायचे, आपल्याला राजकारणाचं वेड लागू द्यायचे नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.