अमित शहा यांनी आज झारखंडमध्ये संकपल्पपत्र प्रसिद्ध केलं.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकाचवेळी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राजकीय पक्षांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. भाजप आणि कॉंग्रेसकडून यावेळी जाहीरनाम्यात काय आश्वासनं दिली जातात, याची उत्सुकता होती. दरम्यान अमित शहा यांनी आज झारखंडमध्ये संकपल्पपत्र प्रसिद्ध केलं.भाजपकडून जी आश्वासने दिली जातात, ती पूर्ण करण्याचा मानस असतो. भाजपने आतापर्यंत सर्व संकल्प पूर्ण केले आहेत आणि झारखंडच्या विकासासाठी भविष्यातही चांगलं काम करणार आहे, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे.
हेह वाचा-अजित पवारांची ही टोळी पाकीटमाऱ्यांची टोळी; आमदाराची जिव्हारी लागणारी टीका
जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहा यांनी झारखंड सरकारवर जोरदार टीका केली. झारखंड सरकार भ्रष्टाचारात बुडाल आहे, पण भाजपाचं सरकार येताच भ्रष्टाचार मूळापासून उखडून टाकला जाणार आहे. झारखंडची ही निवडणूक केवळ सरकार बदलण्यासाठी नाही, तर झारखंडचे भवितव्य ठरवण्याची असणार आहे.
यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायालाही काही प्रश्न केलं. तुम्हाला रोटी, बेटी आणि धरणी मातेला धोका देणारं सरकार हवं की सुरक्षित सरकार. जर राज्यात सुधारणा हव्या असतील तर भाजपला निवडून द्या. सध्याच्या सरकारने राज्याला खूपच कठीण परिस्थिती नेवून ठेवलं आहे. त्यामुळे भाजपने जो संकल्प केला आहे, तो आम्ही पूर्ण करू, असं आश्वासन अमित शहा यांनी दिलं.
हेही वाचा-‘मुख्यमंत्री योगींनी राजीनामा दिला नाही तर बाबा सिद्दीकीप्रमाणे…’, मुंबई पोलिसांना आला धमकीचा मॅसेज
या सरकारमध्ये संथाल समाज आणि झारखंडच्या महिला सुरक्षित नाहीत. माती, महिला आणि रोटीची सुरक्षा भाजपच करू शकेल. मागास समाजाला भाजपने सन्मान दिला आहे. मोदींनी 27% आरक्षण दिलं आहे. आज संथाल समजाच्या द्रौपदी मुर्मू पहिल्या आदिवासी राष्ट्रपती झाल्या आहेत.
मोदींनी 3 लाख 80 हजार कोटी रुपये राज्यातील रस्ते व रेल्वे विकासासाठी दिले आहेत. केंद्र सरकार झारखंडच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी अनेक योजनांची माहिती दिली, जसे की मुद्रा योजना, आयुष्मान योजना, आदिवासी योजना.
“झारखंडमध्ये नाबालिक तस्करी वाढली आहे. हेमंत सरकारच्या काळात 50 लाखांपर्यंतची नोंदणी 1 रुपयात करण्याची योजना थांबवली गेली होती, ती पुन्हा सुरू केली जाणार आहे.
हेमंत सोरेन सरकार घुसखोरी थांबवण्यात अपयशी ठरलं आहे. भाजपचं सरकार आल्यानंतर सरकार या घुसखोरांना बाहेर काढेल. तरुणांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. पण त्यांनी काय केलं?. राज्यात पेपर लीकची प्रकरण सर्वात जास्त आहेत. जर आमच्या सरकारमध्ये पेपर लीक झाला, तर या माफियांना उलट लटकवलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.