Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain: यंदाचा पाऊस ठरला अनोखा! एक महिना आधी आगमन अन्…; सविस्तर वाचा

सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हिणी घाटमाथ्यावर यंदा विक्रमी पाऊस पडला आहे. १ जून ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल ९४७१ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले असून, ही देशातील सर्वाधिक नोंद आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2025 | 02:35 AM
Maharashtra Rain: यंदाचा पाऊस ठरला अनोखा! एक महिना आधी आगमन अन्…; सविस्तर वाचा
Follow Us
Close
Follow Us:

सुनयना सोनवणे/पुणे: यंदा मान्सूनच्या कालावधीत महाराष्ट्राने इतर वर्षांच्या तुलनेत पावसाचा वेगळा अनुभव घेतला. मान्सूनचे आगमन वेळेआधी, म्हणजे तब्बल एक महिना लवकर झाले. ७ जूनऐवजी ७ मेपासूनच तो धो-धो कोसळू लागला. त्यामुळे पावसाचा कालावधी नेहमीपेक्षा अधिक वाढल्याचे दिसून आले. जवळपास पाच महिने चाललेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती नियोजन विस्कळीत झाले. पावसाच्या दीर्घ सत्रामुळे भात, भाजीपाला, फळबागा आणि हंगामी पिकांना मोठा फटका बसला.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात एकूण ९९६.७ मिलिमीटर पाऊस पडला, जो दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे १०३.६ टक्के इतका आहे. मुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले; सुमारे साठ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.
यावर्षी इतका पाऊस का पडला?

यामागचे मुख्य कारण हवामान बदल आणि समुद्र तापमानातील चढ-उतार हे आहे. समुद्राचे वाढते तापमान हवेत अधिक बाष्प साठवते, परिणामी कमी वेळेत प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे यावर्षी राज्याला हवामान बदलाचा थेट फटका बसलेला स्पष्ट दिसतो. जागतिक तापमानवाढ आणि मानवनिर्मित हवामान बदल यांनी पावसाचे गणित बदलले आहे. अल-निनो आणि भारतीय महासागर द्विध्रुव (इंडियन ओशन डायपोल) यांसारख्या नैसर्गिक चक्रांमुळे पावसाचे प्रमाण बदलते, परंतु मानवी कारणांमुळे ही चक्रेही असंतुलित झाली आहेत.

Maharashtra Rain Update: पावसाला करा बाय-बाय! येत्या दोन दिवसांत…; IMD चा अलर्ट काय?

पूर्वी मान्सूनचे आगमन आणि माघार ठराविक कालावधीत होत असे; पण आता काही वर्षे अतिवृष्टी तर काही वर्षे दुष्काळ अशा टोकाच्या स्थिती निर्माण होत आहेत. यंदाही काही भाग कोरडे राहिले, तर काहींना पुराने वेढले. जागतिक तापमानात १.१ ते १.२ अंश सेल्सिअस वाढ झाल्याने ढगफुटी आणि पूरांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याचे दिसून आले. मागील चार महिन्यांत येथे सरासरीच्या ९८ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली.
एकूण पावसाचे प्रमाण (टक्केवारीत): (महारेन संकेतस्थळावरून)
भाग                                   टक्के
मावळ, वडगाव.                  २०८
पुणे शहर                           १२९.६
आंबेगाव, घोडेगाव               १२६.३
दौंड                                   ११७.२
खेड, राजगुरुनगर                 ११५
भोर                                  ११०
इंदापूर                              १०३.२
शिरूर, घोडनदी                  १०२
मुळशी, पौड                       ९९.१
हवेली                                ९२.१
पुरंदर, सासवड.                   ८५.६
बारामती.                            ८४.४
वेल्हे                                  ८३.३
जुन्नर.                               ७५.३
बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ज्यावेळी पश्चिमेकडे सरकते आणि ते ज्यावेळी मराठवाडा, विदर्भावरून जाते, त्यावेळी तेथे मुसळधार पाऊस पडतो. ही परिस्थिती यावर्षी दोन वेळा निर्माण झाली असल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे असे क्षेत्र मोठ्या प्रमाणात तयार झाले. त्यामुळे मध्य भारतात, महाराष्ट्रात जास्त पाऊस पडला.

-डॉ. एस. डी. सानप, हवामान शास्त्रज्ञ, हवामान विभाग, पुणे

Maharashtra Rain Alert: ‘शक्ती’ चक्रीवादळ महाराष्ट्राला रडवणार! कोकणात धुमशान अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा

 चेरापुंजीलाही मागे टाकणारा ताम्हिणी घाट!
सह्याद्री पर्वतरांगांतील ताम्हिणी घाटमाथ्यावर यंदा विक्रमी पाऊस पडला आहे. १ जून ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल ९४७१ मिमी पर्जन्यमान नोंदवले गेले असून, ही देशातील सर्वाधिक नोंद आहे. त्यामुळे ताम्हिणी हे भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण ठरले आहे. सलग दुसऱ्या वर्षी ताम्हिणीने चेरापुंजीचा विक्रम मोडीत काढला. २०२४ मध्ये ताम्हिणीमध्ये ९८०० मिमी पाऊस पडला होता, तर त्याच वेळी चेरापुंजीत केवळ ७३०३ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी चेरापुंजीत फक्त ४२१७ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. ताम्हिणी घाटातील अतिवृष्टीमागे अनेक भौगोलिक आणि हवामानशास्त्रीय कारणे आहेत. सह्याद्री पर्वतरांगांमध्ये बाष्पाचे अभिसरण होऊन दाट ढग तयार होतात, तसेच अरबी समुद्रातून येणारा मान्सून प्रवाह आणि स्थानिक हवामान प्रणाली यांच्या संयोगामुळे या भागात मुसळधार पाऊस पडतो.

Web Title: Mansoon came earty in this year latest know all maharashtra rain update 2025 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Weather

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.