महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
महाराष्ट्राला शक्ती चक्रीवादळाचा फटका
राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
कोकण किनारपट्टीवर पावसाचा इशारा
Weather Update: महाराष्ट्रात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत नाहीये. अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. शक्ती चक्रीवादळामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने नक्की काय इशारा दिला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ यामुळे राज्यात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील तीन ते चार दिवस विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पुढील ४८ तासांमध्ये राज्याच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांच्या दिशेत बदल झाल्याने राज्यात पुन्हा एकदा पवससाठी पोषक हवामान तयार झाल्याचे दिसून येत आहे.
कोकणात देखील शक्ती चक्रीवादळाचा परिणाम होण्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात समुद्राला उधाण येण्याची शक्यत आहे. मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्वाचे आहेत. पुढील दोन दिवसांत शक्ती चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे.
राज्यात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात यंदा मान्सून चांगलाच लांबला आहे. मे महिन्याच्या मध्यातच यावेळी पावसाळा सुरुवात झाली. पावसाळ्याच्या आधी सुरू झालेला पुस पावसाळासंपला तरी अजून जायचे नाव घेताना दिसून येत नाहीये. कारण जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात जोरदार धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर
शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. २९ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीमध्ये वाहून गेली आहे त्यांना ३.४७ लाख रुपयांची मदत हेक्टरी केले जाणार आहे. जमीन खरडून गेलेय शेतकऱ्यांना ४७ हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख नरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.