मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू (फोटो-सोशल मीडिया)
पाऊस दोन चार दिवसांत माघारी परतणार
शक्ती चक्रीवादळाचा धोका झाला कमी
हवामान विभगाने दिली माहिती
Maharashtra Weather Update: यंदा मान्सून लांबल्याचे दिसून आले. मे महिन्यातच सुरू झालेला पाऊस आता सर्वांची रजा घेणार आहे. येत्या दोन चार दिवसांमध्ये पाऊस माघारी परतणार आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस सुरू होता. अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे पावसाचा मुक्काम लांबला. पुढील दोन ते चार दिवसांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
राज्यातून लवकरच मान्सून माघारी जाणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे पाऊस लांबला. विविध भागातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रातून पाऊस कमी होत आहे. गेले काही दिवस पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने राज्यात कहर केला होता. सोलापूर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टी झाली होती. जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या काही भागात ऑक्टोबर हीटचा देखील त्रास जाणवू लागला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला नाहीये. हवामान मोकळे राहण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर
शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. २९ जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीमध्ये वाहून गेली आहे त्यांना ३.४७ लाख रुपयांची मदत हेक्टरी केले जाणार आहे. जमीन खरडून गेलेय शेतकऱ्यांना ४७ हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख नरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.
पॅकेजमध्ये नेमके काय?
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीमध्ये वाहून गेली आहे त्यांना ३.४७ लाख रुपयांची मदत हेक्टरी केले जाणार आहे. जमीन खरडून गेलेय शेतकऱ्यांना ४७ हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख नरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.