Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation:अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना; मुंबईत घडामोडींना वेग

मराठा आरक्षण प्रश्नावर आज उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमका कोणता निर्णय होणार, तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 31, 2025 | 03:25 PM
Maratha Reservation:

Maratha Reservation:

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना
  • आजच आरक्षणाच्या तोडग्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता
  • मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न

Maratha Reservation: मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे सध्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मुंबईत मराठा आंदोलकही प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळातही हालचाली वेगाने वाढल्या आहेत. यासगळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी १२ वाजता मंत्रिंमडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील हे या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुण्यातील सर्व कार्यक्रम अजित पवार रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर आजच तोडगा निघणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर दिसणार नसल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार हे आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आजच आरक्षणाच्या तोडग्याबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Manoj Jarage Patil: ‘उद्यापासुन कडक उपोषन करणार, पाणी बंद करणार’, मनोज जरांगे पाटलांनी घेतला टोकाचा निर्णय

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास येण्याचा कार्यक्रम होता. त्यांनी यासाठी वेळ दिला होता. मात्र, अचानक मुंबईला जावे लागल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार माऊली कटके यांनी दिली.

मराठा आरक्षण प्रश्नावर आज उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नेमका कोणता निर्णय होणार, तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आंदोलकांची मागणी, सरकारची भूमिका आणि पुढील दिशा या बैठकीनंतर निश्चित होणार आहे. त्यामुळे या बैठकीतून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका समोर येते का, याकडे सर्वांचेच लक्ष केंद्रीत झाले आहे.

मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरांगे यांनी संयम ठेवावा, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. सामंत यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटले की, जरांगे यांच्या आंदोलनाचा उपयोग मतांसाठी केला जात आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे की नाही, हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Maratha Reservation : “मराठा व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य…; मंत्रिमंडळातील भाजप नेत्याने

महाविकास आघाडीचे नेते या मुद्द्यावर मौन बाळगत आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण आपला मतांचा आकडा ठरवत आहेत, असा आरोपही सामंत यांनी केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह बोलावून घेतलेल्या चर्चेचा उल्लेख केला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावरही त्यांनी भाष्य केले.

Web Title: Maratha reservation ajit pawar cancels all his programs in pune and leaves for mumbai events in mumbai gain momentum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक
1

Manoj Jarange : भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमुळे धनगर समाज आक्रमक

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो
2

Manoj Jarange : मराठा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांचा आर्त टाहो

Manoj Jarange Patil Live: हायकोर्टाच्या निर्देशांवर जरांगे पाटलांचे भाष्य; म्हणाले, “मेलो तरी चालेल, पण…”
3

Manoj Jarange Patil Live: हायकोर्टाच्या निर्देशांवर जरांगे पाटलांचे भाष्य; म्हणाले, “मेलो तरी चालेल, पण…”

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ
4

Manoj Jarange : मुंबईतील आंदोलकांना दररोज पाठवले जाणार खाद्य पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.