Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: “मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा अन्यथा…”; 42 मराठा संघटनांचा सरकारला इशारा

Kolhapur News: रविवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला राज्यभरातील ४२ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आरक्षणाबरोबरच ११ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 23, 2025 | 07:08 PM
Maratha Reservation: “मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा अन्यथा…”; 42 मराठा संघटनांचा सरकारला इशारा
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर:  मराठा आरक्षण तसेच इतर मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३ ते १० मार्च या अधिवेशन काळात तोडगा काढावा; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी दिला. रविवारी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीला राज्यभरातील ४२ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आरक्षणाबरोबरच ११ ठराव एकमताने मंजूर केले.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची वज्रमूठ बांधण्याचे नियोजन केले आहे. बैठकीला ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रतापसिंह जाधव हे व्हिडीओ कॉन्स्फरन्सीद्वारे हजर होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती विनायक मेटे, सुरेश जावडेकर, सुधाकरराव माने, वंदनाताई मोरे, दीपक पाटील यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

सुरेशदादा पाटील म्हणाले, राज्य सरकारकडे आम्ही संयमाने मागण्या सादर करत आहोत. लवकरच मराठा आरक्षण परिषद घेणार आहोत. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले जाणार आहे. त्यांनी परिषदेला हजर राहून आमच्या मागण्या मान्य कराव्यात अथवा काहीतरी ठोस आश्वासन द्यावे. १० मार्चपर्यंत आम्ही त्यांना मुदत देत आहोत. त्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव अधिवेशनानंतर तीव्र आंदोलन छेडतील. त्यातून परिस्थिती बिघडल्यास त्याला सरकारच जबाबदार असेल.

शिवसंग्राम संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योती मेटे म्हणाल्या, मराठा समाजाच्या अनेक मागण्या आज प्रलंबित आहेत; मात्र शासन केवळ आश्वासनापलीकडे काहीच देत नाही. सरकारला जागे करण्यासाठी आता पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. जोपर्यंत आपल्या दहा मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाची मशाल खाली ठेवणार नाही. सुरेश जावडेकर म्हणाले, मराठा समाज आता आक्रमक बनला आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा पुन्हा लोक पेटून उठतील.

बैठकीत करण्यात आलेले अकरा ठराव

ओबीसी प्रवर्गातील ज्या सोयी सवलती आहेत, तशाच त्या मराठा समाजाला लागू कराव्यात.

हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, बॉम्बे गॅझेटनुसार महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी करावी.
एसईबीसी (मराठा समाज) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रतिपूर्ती करावयाच्या इतर शुल्काबाबतची सवलत द्यावी.
कुणबी प्रमाणपत्रासाठी जिल्हा व तालुका पातळीवर समिती गठण करून, या समितीमध्ये मराठा समाजाचे दोन प्रतिनिधी समाविष्ट करावेत.
परराज्यात शिकणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती योजना लागू करावी.
 एसईबीसी प्रवर्गातील युवक-युवतींकरिता मोटार वाहनचालक व वाहक प्रशिक्षण योजना लागू करावी.
 गुन्हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच शासन निर्णयानुसार तपासून मागे घ्यावेत.
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे फक्त मराठा समाजाला लागू करावे.
 अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तातडीने चालू करावे.
 महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यात यावे.
कोल्हापुरातील बैठकीला उपस्थित विविध ४२ संघटनांचे पदाधिकारी हात उंचावून पाठिंबा दिला तर ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले, आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले; पण त्यांनी मराठ्यांसाठी काय केले, असा प्रश्न निर्माण होतो. आपल्याच लोकांनी आपलाच घात केला आहे. मागसवर्गीय व ओबीसींना ज्या प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, त्याच प्रमाणे मराठ्यांना मिळाली पाहिजे. सर्वांना सोबत घेऊनच ही लढाई आपणास सुरू ठेवून ती जिंकायची आहे. मी नेहमीच मार्गदर्शक म्हणून सोबत राहणार आहे.

Web Title: Maratha reservation struggle committee warn cm devendra fadnavis to complete all demands abouth maratha reservation kolhapur meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 07:08 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • kolhapur news
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला
1

Manoj Jarange Dasara Melava live : हातात सलाईन तरी घेतला दसरा मेळावा; मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिला मोलाचा सल्ला

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा
2

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र होणार’; खासदार शाहू महाराज यांचा इशारा

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी
3

कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना
4

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.