Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांना भरलेले शुल्क परत मिळणार; सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश

मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ओबीसींप्रमाणे सवलती लागू झाल्यानंतर भरलेले शैक्षणिक शुल्क परत मिळणार असल्याची घोषणा आमदार प्रसाद लाड यांनी केली. सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश दिले जाणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Jun 19, 2026 | 02:50 PM
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांना भरलेले शुल्क परत मिळणार; सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश

मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांना भरलेले शुल्क परत मिळणार; सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश

Follow Us
Follow Us:
  • अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची घेतली प्रसाद लाड यांनी भेट
  • राज्य सरकारकडून मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा, विद्यार्थ्यांनी भरलेले शुल्क परत मिळणार
  • शासनाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर कारवाईचा इशारा
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजासाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी हा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडला.

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला मुद्दा

अंतरवाली सराटी येथे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी मराठा विद्यार्थ्यांना जाहीर केलेल्या सवलतींचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सरकारने 5 जून रोजी संबंधित शासकीय निर्णय (जीआर) जारी केला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप अनेक ठिकाणी झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

“मराठा समाजाच्या मुलांचे कल्याण होणार असल्याचे सांगितले जाते, त्यांना ओबीसींप्रमाणे सवलती मिळणार असल्याचे जाहीर झाले. मात्र आजही विद्यार्थ्यांकडून 100 टक्के शैक्षणिक शुल्क घेतले जात आहे. आम्ही फी भरल्यानंतर सवलतींचा फायदा काय?” असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

ST Employees : एसटीच्या आर्थिक संकटात ८६ हजार कर्मचाऱ्यांची देणी रखडली; परिवहन मंत्र्यांकडे निवेदन

23 जूनच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

यावर प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद लाड यांनी मोठी घोषणा केली. मराठा विद्यार्थ्यांकडून शाळा आणि महाविद्यालयांनी वसूल केलेले शैक्षणिक शुल्क परत केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हा विषय 23 जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रसाद लाड यांनी पुढे सांगितले की, उपसमितीच्या बैठकीत सर्व विभागीय आयुक्तांना आवश्यक निर्देश दिले जातील. तसेच सोमवारपर्यंत राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना यासंदर्भातील आदेश पाठवण्यात येतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना सवलतींचा लाभ तातडीने मिळू शकेल.

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

दरम्यान, सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी काही अधिकारी करत नसल्याचा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला. सातबारा आणि कुणबी नोंदी उपलब्ध असतानाही अनेक पात्र व्यक्तींना प्रमाणपत्रे दिली जात नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच शैक्षणिक सवलतींबाबतचे शासन परिपत्रक अनेक शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचले नसल्याची तक्रारही त्यांनी केली.

साखर उद्योग अडचणीत; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे ‘ही’ मोठी मागणी

या प्रकरणात नियमांचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली. त्यावर प्रतिसाद देताना प्रसाद लाड यांनीही शासनाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या संस्थांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला.

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला असून, आता सोमवारपर्यंत जारी होणाऱ्या आदेशांकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maratha students fee refund obc benefits government announcement prasad lad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Arakshan
  • Maratha Reservation
  • Prasad Lad

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
2

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग
4

मराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू; आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी कार्यवाहीला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.