Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: निवडणूक आयोगाविरोधात इंडिया अलायन्सच्या मोर्चाला सुरूवात: राहुल-प्रियांका गांधी सज्ज

Marathi breaking live marathi- काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कबूतर खान्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र, जैन समाजातील कार्यकर्त्यांनी ती तातडीने काढून टाकत आपला विरोध नोंदवला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 12, 2025 | 08:47 AM
Top Marathi News Today: निवडणूक आयोगाविरोधात इंडिया अलायन्सच्या मोर्चाला सुरूवात: राहुल-प्रियांका गांधी सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates:  सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या आदेशानुसार, कबूतर खान्यात कबुतरांना धान्य दिल्यास ते गुन्हा मानला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशानंतर जैन समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, कबूतर खान्यावर ताडपत्री टाकण्याच्या महापालिकेच्या कृतीविरोधात समाज आक्रमक झालेला दिसतो.काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कबूतर खान्यावर ताडपत्री टाकली होती. मात्र, जैन समाजातील कार्यकर्त्यांनी ती तातडीने काढून टाकत आपला विरोध नोंदवला होता.

The liveblog has ended.
  • 11 Aug 2025 06:52 PM (IST)

    11 Aug 2025 06:52 PM (IST)

    Kunal Kamra: कुणाल कामरा पुन्हा बरळला! निवडणूक आयोगावर केवळ ‘या’ ४ शब्दांत केली टीका

    LiveUnstoppable/Rahul Gandhi:  अनेक दिवसांपासून राहुल गांधी हे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावरून निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी झाली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याविरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले.दरम्यान आज महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जनआक्रोश आंदोलन केले. याच दरम्यान कुणाल कामरायाने एक ट्विट करत निवडणूक आयोगालाच लक्ष्य केले आहे. त्याने ट्विट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

  • 11 Aug 2025 06:30 PM (IST)

    11 Aug 2025 06:30 PM (IST)

    पृथ्वी शॉच्या कारकिर्दीला ग्रहण का लागले? रोहित शर्माच्या प्रशिक्षकाने केला ‘हा’ खळबळजनक खुलासा..

    Prithvi Shaw’s cricket career : भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ एकेकाळी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत खूप मोठ्या शिखरावर होता. खूप कमी वयात त्याने प्रसिद्धी मिळवली होती. आपल्या फलंदाजीच्या शैलीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु, त्याला आपला फॉर्म आणि आपली प्रसिद्धी टिकवता आली नाही आणि त्याच्या कारकिर्दीला ग्रहण लागले. पृथ्वी शॉची कारकीर्द उध्वस्त होण्यामागे नेमकं कारण काय? याबाबत आता रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी खुलासा केला आहे.

  • 11 Aug 2025 06:08 PM (IST)

    11 Aug 2025 06:08 PM (IST)

    मोठी बातमी! कबुतरखान्यावरील बंदी राहणार की उठणार? सुप्रीम कोर्टाने दिला 'हा' महत्वाचा निर्णय

    मुंबई/kabutarkhana: मुंबईमधील दादर परिसरात असणारा कबुतरखाना सध्या वादाचा विषय बनला आहे. महापालिकेने हा कबुतरखाना बंद केला होता. त्यानंतर जैन समाजाने या ठिकाणी मोठे आंदोलन केले. त्या ठिकाणी बांधण्यात आलेली ताडपत्री काढून टाकण्यात आली. दरम्यान हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले. हायकोर्टाने कबुतरांना अन्न, पाणी घालण्यास बंदी कायम ठेवली. मग कबुतरखान्यावरील बंदी उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने देखील कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे.

  • 11 Aug 2025 05:35 PM (IST)

    11 Aug 2025 05:35 PM (IST)

    बंगळुरूमध्ये Tesla चा उघडणार नवीन शोरूम

    टेस्लाने लवकरच तिसरे शोरूम उघडण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन शोरूम दक्षिण भारतातील बेंगळुरूमध्ये उघडले जाईल. तसेच कंपनी केवळ बंगळुरूमध्ये शोरूम उघडणार नाहीत तर तिथे एक सुपरचार्जर देखील स्थापित करतील. पुढील महिन्यापर्यंत कंपनी तिसरा शोरूम उघडू शकेल अशी अपेक्षा आहे.

  • 11 Aug 2025 05:27 PM (IST)

    11 Aug 2025 05:27 PM (IST)

    कॉमेडियन कपील शर्माच्या सुरक्षेत वाढ

    लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कॉमेडियन कपील शर्माच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या आठवड्यात कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर गोळीबार झाला होता. कपिल शर्माने सलमान खानला शोला बोलावल्याने धमक्या मिळत असल्याचे बोलले जाते आहे.

  • 11 Aug 2025 05:26 PM (IST)

    11 Aug 2025 05:26 PM (IST)

    मोठी बातमी! पुण्यात भीषण अपघात; पिकअप रिव्हर्स आली अन् थेट...; ८ भाविकांवर काळाचा घाला

    पुणे: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील खेड येथे देवदर्शनाला गेलेल्या ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुंडेश्वर येथे दर्शनाला गेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 11 Aug 2025 05:05 PM (IST)

    11 Aug 2025 05:05 PM (IST)

    IND vs ENG : निराशाजनक इंग्लंड मालिकेनंतर करुण नायरने व्यक्त केली आशा

    भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली आहे. तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली आहे. या मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. या मालिकेसाठी ८ वर्षांनंतर संघात स्थान मिळालेल्या करूण नायरसाठी मालिका निराशाजनक राहिली आहे. नायरने याबाबत बोलताना सांगितले की, ओव्हलवर मिळालेल्या सुरुवातीचे शतकात रूपांतर न केल्याने मी निराश झालो. पण पहिला दिवस खेळून काढणे महत्त्वाचे होते. मी थोडा घाबरलो होतो पण बरे वाटले. मला आशा होती की, मी त्याचे शतकात रूपांतर करू शकेन जे मी करू शकलो नाही. कर्नाटकच्या या फलंदाजाने कबूल केले की ही त्याच्यासाठी ‘उतार-चढाव’ मालिका होती आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय संघात स्थान मिळवल्यानंतर त्याची कामगिरी निराशाजनक होती. मी खूप विचार केला पण जे घडले ते विसरून पुढील काही महिन्यांत मला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे

  • 11 Aug 2025 04:50 PM (IST)

    11 Aug 2025 04:50 PM (IST)

    वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांना दिला सकारात्मक प्रतिसाद

    वडखळ, बोरी, शिर्की, वाशी, काराव, शिहू, हमरापूर या विभागांतील नागरिक वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे हैराण झाली होती. माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरण कंपनीच्या हुडको पेण येथील कार्यलयावर धडक दिली. संजय जांभळे यांनी मागणी केल्या १० मागण्यांना वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांना याबाबत लेखी पत्र दिले आहे.

  • 11 Aug 2025 04:50 PM (IST)

    11 Aug 2025 04:50 PM (IST)

    अपंग महिलेला दिली गेली अपमानास्पद वागणूक

    मानपाडा पोलिस ठाण्यात तीन वेगवेगेळे एफआयआर दाखल केले आहेत.  एका अपंग महिलेला दिलेली अपमानास्पद वागणूक आणि  पोलिसांना केलेली धक्काबुक्की यांमुळे मानपाडा पोलिसांनी दीपक आव्हाड, राहूल आंग्रे, दीपक मिश्रा सर्वेक्ष पावसकर, महेश ठोेंबरे, अल्पवेश शेंद्रे, वेद प्रकाश तिवारी, राकेश शिंदे आणि धीरज शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

     

  • 11 Aug 2025 04:40 PM (IST)

    11 Aug 2025 04:40 PM (IST)

    "भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी उल्हासनगरात ‘जनआक्रोश मोर्चा

    संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महायुती सरकारमधील कलंकित व भ्रष्ट नेत्यांच्या हकालपट्टीसाठी तसेच सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातही आज भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले.उल्हासनगर कॅम्प ५ मधील कैलाश कॉलनी परिसरात जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला.

  • 11 Aug 2025 04:33 PM (IST)

    11 Aug 2025 04:33 PM (IST)

    रिलायंसचे चेअरमन मुकेश अंबानींना धमकी

     

    रिलायंसचे चेअरमन मुकेश अंबानींना आसिफ मुनीरची धमकी देण्यात आली आहे. धार्मिक संदर्भ देत मुनीरची मुकेश अंबानींना धमकी...

  • 11 Aug 2025 04:30 PM (IST)

    11 Aug 2025 04:30 PM (IST)

    शिवसेना शिंदे गटात राडा

    नाशिकमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात बैठकी दरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिंदे गटात राडा घातल्याने दोन गटात गोंधळ उडाला आहे.

  • 11 Aug 2025 04:25 PM (IST)

    11 Aug 2025 04:25 PM (IST)

    ब्लूस्टोन ज्वेलरी आणि लाइफस्टाइलचा IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला, १३ ऑगस्टपर्यंत गुंतवणुकीची संधी

    ‘ब्लूस्टोन’ या ब्रँड नावाखाली आधुनिक शैलीतील दागिने तयार करणारी कंपनी, ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइल लिमिटेड (BJLL) चा IPO आज म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी उघडला आहे. या इश्यूसाठी गुंतवणूकदार १३ ऑगस्टपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीचे शेअर्स १९ ऑगस्ट रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सूचीबद्ध होतील. कंपनी या IPO द्वारे १,५४०.६५ कोटी रुपये उभारू इच्छिते.

  • 11 Aug 2025 04:19 PM (IST)

    11 Aug 2025 04:19 PM (IST)

    मोदींसारखे नेतृत्व सक्षम नाही, तर; हर्षवर्धन सपकाळांचा टोला

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.

  • 11 Aug 2025 04:15 PM (IST)

    11 Aug 2025 04:15 PM (IST)

    अंबरनाथ एमआयडीसीतील उद्योग परराज्यात जाणार ?

    अंबरनाथ एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला आहे, असा गौप्यस्फोट अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे उमेश तायडे यांनी केला आहे. जमिनीचे प्लॉट 4ते 5 पट दराने विकले जात असून उद्योजकांना स्थानिकांकडून देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. असा धक्कादायक आरोप अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे.

  • 11 Aug 2025 04:10 PM (IST)

    11 Aug 2025 04:10 PM (IST)

    राज्य सरकारविरोधात ठाकरे सेनेचे जनआक्रोश आंदोलन

    सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राज्य सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी या जनआक्रोश आंदोलनातून करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • 11 Aug 2025 04:00 PM (IST)

    11 Aug 2025 04:00 PM (IST)

    खालापुरात ठाकरे गटाला खिंडार

    खालापुरात सध्या राजकीय घडामोडीना वेग आलेला दिसत आहे. तालुक्यात मिळावे व पक्षांप्रवेशाचे कार्यक्रम होत आहेत त्यात शिंदेची शिवसेना व अजितदादाची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खोपोली कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रामपंचायत व धामणी गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले असून पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत झाला.

  • 11 Aug 2025 03:53 PM (IST)

    11 Aug 2025 03:53 PM (IST)

    नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत

    नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे आगमन काल अहिल्यानगर स्थानकावर रात्री झाले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व खासदार निलेश लंके यांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. या सेवेमुळे विद्यार्थी, व्यापारी व पर्यटकांना जलद व सुखद प्रवासाची सुविधा मिळणार असून, वेळ व खर्च वाचणार असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बेंगळुरू–बेलगावी, अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा व गाडी क्रमांक ०१००१ नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस या तीन गाड्यांचा ध्वज फडकावून शुभारंभ करण्यात आला.

  • 11 Aug 2025 03:05 PM (IST)

    11 Aug 2025 03:05 PM (IST)

    Big Breaking: ८ आठवड्यांत त्यांना पकडा आणि…; सुप्रीम कोर्टाचा भटक्या कुत्र्यांबाबत दिल्ली सरकारला महत्वाचा आदेश

    सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत महत्वाचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

  • 11 Aug 2025 02:46 PM (IST)

    11 Aug 2025 02:46 PM (IST)

    राज्य सरकरी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

    राज्य सरकरी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून महागाई भत्त्यात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. महागाई भत्ता आता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर करण्यात आला आहे.

  • 11 Aug 2025 02:43 PM (IST)

    11 Aug 2025 02:43 PM (IST)

    AI बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्यांदाच ChatGPT o3 ने मारली बाजी

    OpenAI चे AI मॉडेल ChatGPT o3 ने एलन मस्कची कंपनी xAI च्या Grok 4 ला मागे टाकलं आहे. कागलद्वारे AI बुद्धिबळ टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सुमारे तीन दिवस चालू होती आणि तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एलन मस्कच्या AI मॉडेलला मागे टाकत चॅटजीपीटीने बाजी मारली आहे. बुद्धिबळ स्पर्धेत चॅटजीपीटीने अव्वल स्थान पटकावलं आहे. तीन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धेत, अनेक कंपन्यांचे जनरल-पर्पज लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) एकमेकांविरुद्ध उभे होते. विशेष म्हणजे यापैकी कोणतेही मॉडेल विशेषतः बुद्धिबळ खेळण्यासाठी डिझाइन केलेले नव्हते. मात्र तरी देखील या मॉडेल्सनी अत्यंत हुशारीने बुद्धिबळ खेळला.

  • 11 Aug 2025 02:43 PM (IST)

    11 Aug 2025 02:43 PM (IST)

    कोयते लपवण्यासाठी मुलाला आईचीच साथ

    राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पुण्यातही गेल्या काही महिन्यापासून कोयतेधारी टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. पोलिसही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले आहे. मात्र, तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्यारे अल्पवयीन आरोपीच्या घरात त्याच्या आईच्या परवानगीने लपवल्याचे समोर आल्यानंतर हडपसर पोलिसांनी या गुन्ह्यात आईलाही सहआरोपी केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • 11 Aug 2025 02:36 PM (IST)

    11 Aug 2025 02:36 PM (IST)

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

    नवी दिल्ली: पुन्हा एकदा देशभरात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील एक ते दोन दिवस उत्तराखंड राज्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व आणि मध्य भारतात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने देशातील कोणकोणत्या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेलाआहे, त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • 11 Aug 2025 02:34 PM (IST)

    11 Aug 2025 02:34 PM (IST)

    मोहम्मद सिराज माजी दिग्गजाबाबत काय बोलून गेला? वाचा सविस्तर

    विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात शानदार यश मिळवले. इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही विभागात दमदार कामगिरी करून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या दौऱ्यात सर्वांचे मन जिंकले आहेत. ओव्हल येताहेत खेळवण्यात आलेल्या शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात इंग्लंडला ६ धावांनी पराभूत करून भारताने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २-२ अशी बरोबरी साधली. या संपूर्ण मालिकेत आपल्या प्रभावी गोलंदाजीने मोहम्मद सिराजने २३ बळी टिपले. तोच शेवटच्या सामन्यांतील विजयाचा हिरो ठरला.

  • 11 Aug 2025 02:29 PM (IST)

    11 Aug 2025 02:29 PM (IST)

    आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयानक लक्षणे

    दैनंदिन आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, चुकीची जीवनशैली, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप आणि कामाच्या वाढलेल्या तणावामुळे अनेक लोक शरीराकडे दुर्लक्ष करतात. वाढत्या वयात शरीरात दिसणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे लहान आजार मोठे स्वरूप घेतात. जगभरात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे लाखोंच्या संख्येने रुग्ण आहेत. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जगभरात सगळीकडे आतड्यांच्या कॅन्सरची रुग्ण संख्या वाढली आहे. आतड्यांचा कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो.

  • 11 Aug 2025 02:27 PM (IST)

    11 Aug 2025 02:27 PM (IST)

    सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’

    केंद्रामध्ये राहुल गांधी तर राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये झालेली मतांची चोरी आणि राज्यातील बेताल वक्तव्य करणारे राजकीय नेत्यांची हकालपट्टी करावी अशा मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. याच मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन सुरु केले आहे. दादरमधील शिवाजी पार्क येथील जनआक्रोश आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे देखील सहभागी झाले आहेत.

  • 11 Aug 2025 02:26 PM (IST)

    11 Aug 2025 02:26 PM (IST)

    टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित

    टायगर श्रॉफचे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या आगामी ‘बागी ४’ चित्रपटाची वाट पाहत आहेत. अखेर आज ११ ऑगस्ट रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये टायगर अतिशय आक्रमक शैलीत दिसत आहे आणि तो त्याच्या शत्रूंवर कोणतीही दया न दाखवता जोरदार हल्ला करत आहे. टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • 11 Aug 2025 02:25 PM (IST)

    11 Aug 2025 02:25 PM (IST)

    श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या या गोष्टींचे करा दान

    जन्माष्टमीचा सण हा भगवान श्रीकृष्णाच्या पराक्रमांची आठवण करून देणारा हा एक खास दिवस. या दिवशी श्रीकृष्णाचे भक्त उपवास करतात. चित्रे सजवतात आणि रात्री 12 वाजता जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. जो भक्त भक्तिभावाने उपवास करुन श्रीकृष्णाची पूजा करतात आणि देवाला प्रिय असलेल्या वस्तूंचे दान करतात अशा लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि दारिद्र्य दूर होते. यंदा जन्माष्टमीचा सण शुक्रवार, 15 ऑगस्ट रोजी आहे. खासकरुन श्रीकृष्णाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या

  • 11 Aug 2025 01:55 PM (IST)

    11 Aug 2025 01:55 PM (IST)

    देशातील ट्रॅक्टरला लागणार जीपीएस, ब्लॅक बॉक्स; आमदार सतेज पाटलांचा तीव्र विरोध

    विमानाच्या धर्तीवर ट्रॅक्टर ट्राल्यांना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉस बसवण्याचा विचाराधीन केंद्र सरकार आहे. मात्र या निर्णयाला पहिला थेट विरोध आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अधिसूचनेत ट्रॅक्टरसाठी जीपीएस ब्लॅक बॉक्ससारखी उपकरणे सक्तीने बसवण्याची तरतूद आहे.

  • 11 Aug 2025 01:50 PM (IST)

    11 Aug 2025 01:50 PM (IST)

    लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान

    सध्या स्वित्झर्लंडमध्ये लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल २०२५ आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात चिनी सुपरस्टार जॅकी चॅन यांना ‘पार्डो अल्ला कॅरिरा अचिव्हमेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळाल्यानंतर, अभिनेत्यानेही प्रतिक्रिया दिली आणि त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल सांगितले. अभिनेता या पुरस्कार सोहळ्यात नक्की काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 11 Aug 2025 01:45 PM (IST)

    11 Aug 2025 01:45 PM (IST)

    आज लोकसभेत सादर होणार नवीन कर विधेयक, आयकर कायद्यात ऐतिहासिक सुधारणा होणार का?

    भारतीय कर पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, नवीन आयकर विधेयक, २०२५ आज लोकसभेत सर्व सुधारणांसह सादर केले जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण ते सादर करतील. निवड समितीने सुचवलेल्या २८५ सुधारणा या नवीन विधेयकात समाविष्ट केल्या जातील.भाजप खासदार बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या सुधारणांना मान्यता दिली होती. हे नवीन विधेयक जवळजवळ ६३ वर्षे जुन्या आयकर कायद्याची जागा घेईल. हे नवीन विधेयक जुन्या आयकर कायद्यापेक्षा कसे आणि किती वेगळे आहे ते जाणून घेऊयात…

  • 11 Aug 2025 01:40 PM (IST)

    11 Aug 2025 01:40 PM (IST)

    पुरुषांसाठी ६ जागा, महिलांसाठी ३ जागा… सैन्य भरतीवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

    भारतीय सैन्यात JAG ब्रांचमध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यावेळी सुप्रीम कोर्टात भारतीय सैन्याच्या न्यायाधीश अ‍ॅडव्होकेट जनरल (जेएजी) या ब्रांचमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याचे धोरण असंवैधानिक ठरवले आहे आणि ते रद्द केले आहे. यावेळी कोर्टाने स्पष्टपणे सांगितले की, पुरुष आणि महिला या लिंग तटस्थता म्हणजे सर्व पात्र उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावर करावी, लिंगाच्या आधारावर नाही, अशी स्पष्ट भूमिका कोर्टाने मांडली आहे.

  • 11 Aug 2025 01:35 PM (IST)

    11 Aug 2025 01:35 PM (IST)

    या आकर्षक कलर व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आयफोनची नवी सिरीज

    टेक जायटं कंपनी अ‍ॅपल पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये त्यांची नवीन आयफोन सिरीज लाँच करणार आहे. ही आगामी सिरीज आयफोन 17 या नावाने लाँच केली जाणार आहे. ही सिरीज नक्की कधी लाँच केली जाणार त्याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र आगामी आयफोन सिरीजबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याचं कारण आगामी आयफोनबाबत सोशल मीडियावर सतत अपडेट्स शेअर केले जात आहेत. वाचा सविस्तर.

  • 11 Aug 2025 01:30 PM (IST)

    11 Aug 2025 01:30 PM (IST)

    War 2: ज्युनियर एनटीआर आणि हृतिकशिवाय ‘हा’ अभिनेता दिसणार कॅमिओ भूमिकेत

    हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर ‘वॉर २’ या अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटात दिसणार आहेत, जो तीन दिवसांनी १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या स्पाय अ‍ॅक्शन चित्रपटात कियारा अडवाणी देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटात आणखी एक अभिनेता दिसणार असल्याचे समोर आले आहे, जो चित्रपटात कॅमिओ करणार आहे.आता हा अभिनेता कोण आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 11 Aug 2025 01:25 PM (IST)

    11 Aug 2025 01:25 PM (IST)

    PM Fasal Bima Yojana चे पैसे मिळाले की नाही, कसे तपासावे?

    आज देशातील लाखो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सरकार ३२०० कोटी रुपयांची मदत करणार आहे. जर मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील. ही एक प्रकारची विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत, नैसर्गिक आपत्ती किंवा कीटकांमुळे झालेल्या नुकसानाला तोंड देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.या योजनेअंतर्गत दावा केलेले पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करू शकता. कशा पद्धतीने तुम्ही तपासावे याबाबत जाणून घ्या

  • 11 Aug 2025 01:23 PM (IST)

    11 Aug 2025 01:23 PM (IST)

    दिल्लीत खासदार संजय राऊतांना घेतले पोलिसांनी ताब्यात

    इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी कर द्वार ते निवडणूक आयोग असा आक्रमक मोर्चा काढला होता. निवडणुकीतील मतांची चोरी केल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    अटक!
    संसद मार्ग पोलीस स्टेशन
    राहुल गांधी यांच्या सोबत
    मत चोरी च्या विरोधात आंदोलन दिल्ली pic.twitter.com/gNy0WzYyE5

    — Sanjay Raut (@rautsanjay61) August 11, 2025

  • 11 Aug 2025 01:15 PM (IST)

    11 Aug 2025 01:15 PM (IST)

    RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर UP T20 League मध्ये बंदी!

    राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे. सध्या तो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय आहे. अनेक वृतांच्या माहितीनुसार त्याच्यावर अनेक लैगिंक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. सोशल मिडीयावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात यासंदर्भात टीका केली जात आहे. 2025 आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने 18 वर्षानंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर चेंगराचेंगरी प्रकरणांमध्ये अनेक खेळाडू फसले होते.

  • 11 Aug 2025 01:10 PM (IST)

    11 Aug 2025 01:10 PM (IST)

    श्रावण महिन्यात रानभाज्यांची दर वाढले

    श्रावणात सणासुदीचे दिवस येत असल्याने या काळात भाज्यांचे महत्व असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात गावठी भाज्या विक्रीसाठी येत आहेत. स्थानिक शेतकरी परसबागेत लाल भाजी, मुळा, वाल, भोपळा, कारली, पडवळ या भाज्या विक्रीस आणत आहेत. कुडाळ तालुक्याच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ही भाजी अन्य शहरात नेली जाते. तसेच सध्या श्रावण महिना असल्याने भाज्यांचे दरही वधारलेले आहेत.

  • 11 Aug 2025 01:05 PM (IST)

    11 Aug 2025 01:05 PM (IST)

    एसआयआरवर इंडिया अलायन्सचा संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा

    दिल्लीतील संसद भवनातील मकर द्वार येथे इंडिया अलायन्सचे नेते जमले आहेत. बिहारमधील मतदान होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (एसआयआर) आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत "मतदार फसवणूक" झाल्याच्या आरोपांच्या निषेधार्थ इंडिया ब्लॉकचे नेते संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढणार आहेत.

  • 11 Aug 2025 01:05 PM (IST)

    11 Aug 2025 01:05 PM (IST)

    इस्रायलच्या गाझातील कारवाया सुरुच; हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार

    रविवारी (१० ऑगस्ट) रात्री उशिरा इस्रायलने (Israel) पुन्हा एकदा गाझावर (Gaza) हल्ला केला आहे. गाझातील अल-शिफा रुग्णालयावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रुग्णालयाबाहेर असलेल्या तंबूवर हा हल्ला झाला. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल जझीराच्या ५ पत्रकारांचाही यामध्ये मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.

  • 11 Aug 2025 01:02 PM (IST)

    11 Aug 2025 01:02 PM (IST)

    अंबरनाथ एमआयडीसीतील उद्योग परराज्यात जाणार ?

    अंबरनाथ एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात दलालांचा सुळसुळाट झाला असून जमिनीचे प्लॉट चार ते पाच पट दराने विकले जात आहेत, तसेच उद्योजकांना स्थानिकांकडुन देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा धक्कादायक आरोप अतिरिक्त अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या पदाधिकऱ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर एमआयडीसी प्रशासन जमीन अधिग्रहण करण्यापूर्वीच थेट उद्योजकांना त्या जमीनींची विक्री करते. या सर्व प्रकाराला एमआयडीसी प्रशासन जबाबदार असल्याचा धक्कादायक आरोप आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केलाय.  जर असंच सुरू राहिलं तर अंबरनाथ एमआयडीसीतील जवळपास १४०० कंपन्या परराज्यात स्थलांतरित होण्यास वेळ लागणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया उमेश तायडे यांनी व्यक्त केली.

  • 11 Aug 2025 01:00 PM (IST)

    11 Aug 2025 01:00 PM (IST)

    दहीहंडीच्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा करा - पोलिसांचे आवाहन

     

    आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दहीहंडी उत्सवाचे आयोजक आणि गोविंदा पथकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी यासोबतच दहीहंडी उत्सव साजरा करताना समाजात घडणाऱ्या विविध घटनांबाबत समाजात जनजागृती करण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दहीहंडी आयोजकांना केलं.

  • 11 Aug 2025 12:57 PM (IST)

    11 Aug 2025 12:57 PM (IST)

    सरकारच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

    पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री यांची वेशभूषा धारण करून प्रतिकात्मक आंदोलन ठाकरे गटाने केलं आहे.
    शिवसेना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे. भ्रष्ट मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वरती पाय अशा घोषणा देत डोंबिवलीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

  • 11 Aug 2025 12:53 PM (IST)

    11 Aug 2025 12:53 PM (IST)

    भटक्या कुत्र्यांसाठी निवारा गृहे बांधण्याचे निर्देश

    सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत. भटक्या कुत्र्यांसाठी निवारा गृहे बांधण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत. यासोबतच भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

  • 11 Aug 2025 12:53 PM (IST)

    11 Aug 2025 12:53 PM (IST)

    कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    कॉंग्रेस पक्षासह देशातील विरोधकांनी संसद ते निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे. यामध्ये 300 हून अधिक खासदारांचा समावेश आहे. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge को पुलिस ने हिरासत में लिया।

    आज वोट चोरी के खिलाफ INDIA गठबंधन के सांसद चुनाव आयोग तक मार्च निकाल रहे थे। नरेंद्र मोदी ने पुलिस भेजकर उनकी आवाज दबाने की कोशिश की।

    लेकिन तानाशाह सरकार याद रखे- हम डरने वाले नहीं हैं, लोकतंत्र की रक्षा में डटे… pic.twitter.com/b4zOyz3LMJ

    — Congress (@INCIndia) August 11, 2025

  • 11 Aug 2025 12:48 PM (IST)

    11 Aug 2025 12:48 PM (IST)

    जरांगे पाटलांकडून मराठा व मराठेत्तर वाद वाढवण्याचा प्रयत्न - बबनराव तायडे

    मराठा आंदोलनामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याच्या जरांगे पाटलांच्या आरोपावर ओबीसी नेते बबनराव तायडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मनोज जरांगे हे मानसिक तणावातून आरोप करत आहे. कदाचित मनोज जरांगे हेच असले कृत्य करत असावे, त्यामुळे त्यांनी ही भावना व्यक्त केली असावी. खरंतर मनोज जरांगे हेच महाराष्ट्रात मराठा व मराठेत्तर वाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका बबनराव तायडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.

  • 11 Aug 2025 12:47 PM (IST)

    11 Aug 2025 12:47 PM (IST)

    मराठा आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव - जरांगे पाटील

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे.  येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आंदोलन करायचे आहे. या मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आला आहे. मराठ्याच्या विरोधात दंगल करा, असं ओबीसींच्या नेत्यांचे कान भरले आहे. दंगल झाली ना तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला तुम्ही जबाबदार असाल, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

  • 11 Aug 2025 12:00 PM (IST)

    11 Aug 2025 12:00 PM (IST)

    निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी - संजय राऊत

    निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झााली असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये आता निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी  असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

  • 11 Aug 2025 11:50 AM (IST)

    11 Aug 2025 11:50 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूर दौरा

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 11 Aug 2025 11:40 AM (IST)

    11 Aug 2025 11:40 AM (IST)

    15 ऑगस्टला मी कल्याण - डोंबिवली येथे जाऊन मांसाहार करणार - जितेंद्र आव्हाड

    कल्याण - डोंबिवली परिसरामध्ये येत्या स्वातंत्र्यदिनी मासांहार विकणारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. या 15 ऑगस्टला मी कल्याण - डोंबिवली येथे जाऊन मांसाहार करणार...!  सत्ताधारी आधी जनतेमध्ये जात- धर्म वरून भांडण पेटवायचे,वाद लावायचे.आता तेच सत्ताधारी मांसाहारी - शाकाहारी हा वाद पेटवत आहेत.समाज सतत धगधगत राहिला पाहिजे,लोकांचं मूळ प्रश्नावर लक्ष गेले नाही पाहिजे,यासाठीच सत्ताधाऱ्यांचे हे उद्योग सुरू आहेत, असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

Web Title: Marathi breaking news live updates political crime sports national international breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण
1

Top Marathi News Today Live: राज्यात कोसळधार! मुंबईसह राज्यभरात पावसाचे थैमान, नागरिक हैराण

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी
2

Top Marathi News Today : मुंबईसह पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस; ऑरेंज अलर्ट जारी

Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत
3

Top Marathi News Today: मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस; रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत

Top Marathi News Today: कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम- कोर्ट
4

Top Marathi News Today: कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम- कोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.