
Maharashtra Breaking News Updates Today:
NCP Ajit Pawar National Executive Row अजित पवार गटाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीवरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, निवडणूक आयोगाला दिलेल्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर ही यादी व्हायरल झाल्यानंतर विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत या यादीत तांत्रिक चूक झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही यादी अंतिम नसून तांत्रिक त्रुटीमुळे दिग्गजांची नावे सुटल्याचे स्पष्ट झाल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
12 May 2026 05:59 PM (IST)
बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ उडाली आहे. जालना रोड परिसरात रात्रीच्या सुमारास एका हॉटेलसमोर आशिष आठवले याने गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशिष आठवलेला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. त्याच्याकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
12 May 2026 05:47 PM (IST)
भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात काँग्रेसच्या वतीने ‘युवा मिलाप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानूची तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे भारतीय युवक काँग्रेसचे सचिव महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा आणि संयुक्त सचिव महाराष्ट्र सह प्रभारी सामभावी शुक्ला उपस्थित होते
या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हटवण्याच्या वादावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
12 May 2026 05:39 PM (IST)
भिवंडी पालिका प्रशासनाने दिलेल्या मुदतीत रिक्षा स्टँड शेजारील अतिक्रमण न हटविल्याने लालबावटा रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीने कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी पालिका मुख्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.तीनबत्ती येथील रिक्षा स्टँड याठिकाणी असलेल्या पोलिस चौकी लगत एका स्थानिक गुंडाने अतिक्रमण करून टपरी उभी केली आहे.या विरोधात कारवाई करावी यासाठी संघटनेच्या वतीने पालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या कडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता.तर याच मुद्द्यावर ९ ते ११ फेब्रुवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले होते.त्यावेळी प्रशासनाने ४५ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटविले जाणार असे लेखी आश्वासन दिले.परंतु ही मुदत संपल्यानंतर ही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने पालिका मुख्यालया समोर मंगळवारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
12 May 2026 05:29 PM (IST)
लॉंग मार्चदरम्यान करण्यात आलेल्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ माकपाच्या वतीने आज पालघरमध्ये मोर्चा काढण्यात आला.
पालघर येथील शिवाजी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी संबंधित मागण्यांबाबतची कागदपत्रे पालघर प्रांत कार्यालयात सादर केली.
प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी माकप आमदार विनोद निकोले यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “येत्या काही दिवसांत सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुढील आंदोलन लाखोंच्या संख्येने लॉंग मार्च काढून थेट मंत्रालयावर धडक देण्यात येईल.”
12 May 2026 05:17 PM (IST)
नीट पेपरफुटीप्रकरणी नाशिक पोलिसांनी आज एका ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. या तरूणाला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आजच ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
12 May 2026 05:06 PM (IST)
नीटची प्रश्नपत्रिका सुरूवातीला नाशिकमधूनच फुटल्याचा दावा केला जात आहे. नाशिकमधूनच अन्य राज्यांमध्ये ही प्रश्नपत्रिका गेल्याचा दावाही केला जात असल्याने खळबळ उडाली आहे.
12 May 2026 04:50 PM (IST)
मिरा-भाईंदरमध्ये वाहतूक विभागाच्या भोंगळ कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांकडून दंड वसूल केल्यानंतर अधिकृत पावतीऐवजी बेस्ट बसचे तिकीट दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावर मनसेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अशा प्रकारांवर तात्काळ चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
12 May 2026 04:45 PM (IST)
अहिल्यानगरमध्ये ऐन परीक्षांच्या काळात वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. अभ्यासाच्या महत्त्वाच्या वेळेत अचानक ‘बत्ती गुल’ होत असल्याने विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होत असून संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परीक्षांचा हंगाम सुरू असताना महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
12 May 2026 04:40 PM (IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील मासू गावात नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे. गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिलांसह नागरिकांना दूरवरून पाणी आणावं लागत आहे. प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
12 May 2026 04:30 PM (IST)
पंतप्रधानांनी इंधन जपून वापरण्याचे आवाहन केल्यानंतरही चिपळूण शहरात पेट्रोलसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने केवळ एका पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होते.यामुळे वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात त्या पेट्रोल पंपावर धाव घेतल्याने लांबच लांब रांगा लागल्या. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
12 May 2026 04:25 PM (IST)
गुहागर तालुक्यातील मासू गावात नळपाणी योजना बंद पडल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.गावातील महिलांना सुमारे २ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत असून, वाढत्या उष्णतेमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. तालुक्यात इतरत्र पाणीटंचाई नसतानाही मासू गावातील नळपाणी योजना ठप्प असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.ही योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत असली तरी वीजबिल थकबाकीमुळे महावितरणने वीजजोडणी खंडित केल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. परिणामी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.उपोषणकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायतीच्या धारेवर धरत प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, प्रशासनाकडून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र जोपर्यंत नळपाणी योजना सुरू होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
12 May 2026 04:20 PM (IST)
शहरातील वाहतूक विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वाहनचालकांकडून धक्कादायक आरोप करण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारताना अधिकृत पावती देण्याऐवजी काही वाहनचालकांना थेट बेस्ट बसचे तिकीट देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वाहनचालकांच्या मते, दंड भरल्यानंतर अधिकृत चलन किंवा ऑनलाइन पावती न देता हातात बेस्ट बसचे तिकीट देण्यात येत आहे. या प्रकारामुळे दंडाची रक्कम शासनाकडे जमा होते की नाही, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रकाराचे काही फोटो आणि तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. “वाहतूक विभागाचा हा भोंगळ आणि संशयास्पद कारभार तात्काळ थांबवावा. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
12 May 2026 04:15 PM (IST)
पावसाळ्यापूर्वी शहरातील नद्या आणि नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे तसेच नागरिकांना पूरस्थितीपासून दिलासा मिळावा या मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात आले.गोल मैदान, टेलिफोन एक्सचेंजजवळील नाल्याजवळ आयोजित या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरातील अनेक नाले कचरा आणि गाळामुळे तुंबल्याने पावसाळ्यात पाणी साचणे व पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने JCBच्या माध्यमातून नालेसफाई आणि गाळ उपसण्याची मागणी केली. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
12 May 2026 04:10 PM (IST)
भिवंडी पालिका प्रशासनाने दिलेल्या मुदतीत रिक्षा स्टँड शेजारील अतिक्रमण न हटविल्याने लालबावटा रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीने कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी पालिका मुख्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.तीनबत्ती येथील रिक्षा स्टँड याठिकाणी असलेल्या पोलिस चौकी लगत एका स्थानिक गुंडाने अतिक्रमण करून टपरी उभी केली आहे.या विरोधात कारवाई करावी यासाठी संघटनेच्या वतीने पालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या कडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला होता.तर याच मुद्द्यावर ९ ते ११ फेब्रुवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन केले होते.त्यावेळी प्रशासनाने ४५ दिवसात कारवाई करून अतिक्रमण हटविले जाणार असे लेखी आश्वासन दिले.परंतु ही मुदत संपल्यानंतर ही पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने पुन्हा एकदा संघटनेच्या वतीने पालिका मुख्यालया समोर मंगळवारी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
12 May 2026 04:05 PM (IST)
मीरा-भाईंदर शहरात काँग्रेसच्या वतीने ‘युवा मिलाप’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानूची तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे भारतीय युवक काँग्रेसचे सचिव महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा आणि संयुक्त सचिव महाराष्ट्र सह प्रभारी सामभावी शुक्ला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा हटवण्याच्या वादावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
12 May 2026 03:59 PM (IST)
मिरा-भाईंदर : शहरातील वाहतूक विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वाहनचालकांकडून धक्कादायक आरोप करण्यात येत आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारताना अधिकृत पावती देण्याऐवजी काही वाहनचालकांना थेट बेस्ट बसचे तिकीट देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
वाहनचालकांच्या मते, दंड भरल्यानंतर अधिकृत चलन किंवा ऑनलाइन पावती न देता हातात बेस्ट बसचे तिकीट देण्यात येत आहे. या प्रकारामुळे दंडाची रक्कम शासनाकडे जमा होते की नाही, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित प्रकाराचे काही फोटो आणि तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे.
12 May 2026 03:47 PM (IST)
उल्हासनगर : पावसाळ्यापूर्वी शहरातील नद्या आणि नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी, गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करावे तसेच नागरिकांना पूरस्थितीपासून दिलासा मिळावा या मागण्यांसाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात आले.
गोल मैदान, टेलिफोन एक्सचेंजजवळील नाल्याजवळ आयोजित या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरातील अनेक नाले कचरा आणि गाळामुळे तुंबल्याने पावसाळ्यात पाणी साचणे व पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
12 May 2026 03:34 PM (IST)
भिवंडी शहरात एका तरुणाने गळ्यात जिवंत साप गुंडाळून दुचाकीवरून भर रस्त्यात फिरत स्टंट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील तरुणाचे नाव साकिब अन्सारी असून तो निजामपूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
सदर तरुणाने हा साप कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होता याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र गळ्यात साप गुंडाळून रस्त्यावर फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा साप इतरांना किंवा स्वतः तरुणालाच चावला असता तर जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस प्रशासन याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
12 May 2026 03:27 PM (IST)
राज्य सरकारने तुकडेबंदी कायदा रद्द करून निवासी क्षेत्रात ऑक्टोबर2024 पूर्वी झालेल्या जमिनीच्या तुकड्यांना मान्यता दिली आहे. मात्र, त्यानंतर कोणताही जमिनीचा तुकडा अधिकृत ले-आऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही. महापालिका किंवा संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील. त्यानंतरही असे तुकडे झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
12 May 2026 03:13 PM (IST)
बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ उडाली आहे. जालना रोड परिसरात रात्रीच्या सुमारास एका हॉटेलसमोर आशिष आठवले याने गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशिष आठवलेला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. त्याच्याकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
12 May 2026 03:10 PM (IST)
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे सायंटिस्ट सखाराम सानप यांनी दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पुढील 3 दिवसात राज्यात उष्माघाताचा धोका वाढला आहे, उष्माघातामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महाराष्ट्र उन्हाने तापला आहे, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 दिवस महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे गेले आहे
12 May 2026 02:58 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणारे तिघे सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, आरोपींकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहे. या सराईत गुन्हेगारांकडून 11 लाख 19 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमालासह जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केली.
12 May 2026 02:50 PM (IST)
NEET-UG 2026 परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपांमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, 'आप'चे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, "NEET परीक्षेचा पेपर फुटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. असे यापूर्वी चार वेळा घडले आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, यामध्ये संगनमत आणि राजकीय वरदहस्त यांचा समावेश आहे. या देशात नक्की चालले तरी काय ? ज्यांना साधी एक परीक्षाही नीटपणे घेता येत नाही, ते सरकार तरी कसे चालवणार? हे पूर्णपणे संगनमताचे प्रकरण आहे. माझी सहानुभूती परीक्षार्थीच्या पाठीशी आहे. मला त्यांना हे सांगायचे आहे की, या सरकारला केवळ 'जनआंदोलनांची' भाषाच समजते आणि केजरीवाल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत."
12 May 2026 02:41 PM (IST)
नाशिकच्या मालेगाव शहरातील मोसम नदी काठी सरदार नारोशंकर राजेबहद्दर यांनी स्थापन केलेल्या भुईकोट किल्याची अत्यंत दुरवस्था झाली होती, मालेगावच्या ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून किल्ल्याची पडझड होत असल्याने इतिहासप्रेमी आणि मालेगावकरांच्या वतीने दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात होती. त्या साठी आंदोलन झाली होती, अखेर पुरातत्व खात्याने त्याच्या दुरुस्तीतीला सुरवात केली असून, भुईकोट किल्ल्याला पुन्हा मिळलावे यासाठी प्रयत्न सुरू केले आह, किल्ल्यांच्या दुरुस्ती, देखभाल आणि संवर्धनासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
12 May 2026 02:29 PM (IST)
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातला महान गावानजीक गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन मृतदेह आढळलेत. महान इथल्या जलशुद्धीकरण केंद्राजवळच्या टेकडीवर एका झाडाला दोन्ही मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत गावकऱ्यांना दिसले. आत्महत्या केलेले दोघेही जण मित्र असल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतकांमध्ये किशोर मारुती बोडखे (वय 60, रा. वरुड गाव, जि. वाशिम) आणि, तर दुसरा मृतक किशोर बळीराम सोनटक्के (वय 40, रा. कानडी बाजार) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही तीन दिवसांपासून बेपत्ता होते. आत्महत्या की घातपात? या दिशेने पोलिस करत आहे.
12 May 2026 02:20 PM (IST)
नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर आला आहे. सदर प्रकरणात निदा खानचा देखील महत्वाचा सहभाग होता, असा ठपका राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने 50 पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये निदा खानने इतर आरोपींसह महिलांचा छळ केला. जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कंपनीच्या पॉश समितीनेही नाशिक युनिटला भेट दिली नसल्याचं उघड झालं आहे.
12 May 2026 02:08 PM (IST)
बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ उडाली आहे. जालना रोड परिसरात रात्रीच्या सुमारास एका हॉटेलसमोर आशिष आठवले याने गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशिष आठवलेला ताब्यात घेत मोठी कारवाई केली. त्याच्याकडून एक गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
12 May 2026 02:00 PM (IST)
महामार्गांच्या संगमामुळे वेगाने विस्तारत असलेल्या आळेफाटा शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या छाताडावर बुलडोझर फिरत आहे. शहरातील नैसर्गिक जलवाहिन्या असलेले ओढे, पाणवठे आणि नाले मुरूम टाकून बुजवले जात आहे. त्या जागी व्यावसायिक गाळे आणि बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्गच संपुष्टात येत असल्याने भविष्यात आळेफाट्याला कृत्रिम पुराचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
12 May 2026 01:55 PM (IST)
एक अशी अभिनेत्री जिने फक्त जिने फक्त हिंदी मालिकाच गाजवल्या नाहीत तर रियालिटी शो असो किंवा बॉलिवूड सिनेविश्व तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य जागवलं. ही अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. नागिन, देवों के देव महादेव आणि अशा अनेक हिंदी मालिकेतून मौनीने चाहत्यांची मनं जिंकली. गेल्या चार वर्षापूर्वी अभिनेत्रीचा सुरु झालेला संसार आता मोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत. मौनीच्या वैयक्तिक आयुष्यात गेले कित्येक दिवस ताण तणाव असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
12 May 2026 01:45 PM (IST)
जर्मन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लिझलाझ आठवते का? तीच, जिच्या इन्स्टाग्राम फोटोला विराट कोहलीने लाईक केल्यामुळे ती भारतात रातोरात प्रसिद्ध झाली. तिला रिॲलिटी शोज आणि ब्रँड्सकडून ऑफर्स येऊ लागल्या. संपूर्ण भारतात “लिझलाझ कोण आहे?” आणि “लिझलाझ कोण आहे?” अशा सर्चचा पूर आला. आता, ती बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान जर्मन मॉडेल लिझलाजने विराट कोहलीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. तिने उघड केले आहे की, त्या ‘लाईक’च्या प्रकरणानंतर अनेक मीडिया संस्था आणि पत्रकारांनी तिच्याशी संपर्क साधला आणि काहींनी तर तिला विराट कोहलीविरुद्ध बोलण्यासाठी आणि त्याची बदनामी करण्यासाठी पैशांची ऑफरही दिली. तिने या पत्रकारांची नावे उघड केली नाहीत.
12 May 2026 01:40 PM (IST)
यंदा नीट (NEET UG 2026) ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नुकतेच नीट यूजी 2026 चा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच आता या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करणार आहे.यंदा ३ मे रोजी नीट परीक्षेला २२ लाखांहून अधिक उमेद्वार बसले होते. आता पेपरफुटीच्या प्रकरणामुळे NTA सर्व उमेद्वारांची परीक्षा पुन्हा घेणार असून, परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
12 May 2026 01:35 PM (IST)
मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४० मिमी असताना तब्बल १२७४ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, एवढा पाऊस होऊनही यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. मार्च महिन्यापासून वाढलेल्या तापमानामुळे धरणे, नद्या, विहिरी आणि बोअरवेलची पातळी झपाट्याने घटू लागली असून शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः पायपीट करावी लागत आहे.
12 May 2026 01:25 PM (IST)
अमेरिका इराण तणाव (US Iran Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी इराणचा युद्धबंदीचा सुधारित प्रस्ताव फेटाळला असून शस्त्रसंधीबाबात मोठे विधान केले आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इराणसोबतची शस्त्रसंधी आता शेवटच्या घटका मोजत आहे. ट्रम्प यांच्या या नकारात्मक विधानामुळे आखाती देशातील राजकीय वातावरण पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. तसेच परिणामी जागतिक तेल बाजारात गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
12 May 2026 01:15 PM (IST)
मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतीयांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आणि पेट्रोल, डिझेल व खाद्यतेलाचा वापर शक्य तितका कमी करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. या घोषणांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
12 May 2026 01:08 PM (IST)
महामार्गांच्या संगमामुळे वेगाने विस्तारत असलेल्या आळेफाटा शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या छाताडावर बुलडोझर फिरत आहे. शहरातील नैसर्गिक जलवाहिन्या असलेले ओढे, पाणवठे आणि नाले मुरूम टाकून बुजवले जात आहे. त्या जागी व्यावसायिक गाळे आणि बहुमजली इमारती उभारल्या जात आहेत. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्गच संपुष्टात येत असल्याने भविष्यात आळेफाट्याला कृत्रिम पुराचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
12 May 2026 01:02 PM (IST)
पुणे शहराचे स्वास्थ राखण्यासाठी पुणे शहर पोलिस दल रात्रंदिवस पहारा देत असताना, काही अधिकारी अन् अंमलदारांमुळे पोलिस खाते डागाळले जात आहेच, पण पोलिस दलाची लक्तरे देखील वेशीला टांगली जात आहेत. अशा या अधिकारी अन् पोलिस अंमलदारांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई होते, पण मलिन झालेली प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी वर्षेनवर्षे पोलिस दलाला खस्ता खाव्या लागतात. पुणे शहर पोलिस दल देखील अशाच काही महाभागांमुळे गेल्या काही वर्षात डागाळले गेले असून, गेल्या सात वर्षात तब्बल ३३३ जणांवर निलंबनाची कारवाई, तर ६१ जणांवर बडतर्फीची कारवाई झाल्याचे समोर आले आहे.
12 May 2026 12:48 PM (IST)
पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरातून अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलांना पकडल्याचे सातत्याने समोर येत आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात वास्तव्यास राहत काही महिला देहव्यापार करत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. अशातच आता बुधवार पेठेतील रेड लाईट परिसरात पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवत पाच बांगलादेशी महिलांना पकडले आहे. सातत्याने या भागातून बांगलादेशी महिलांना महिलांना पकडून कारवाई केली असून, गेल्या काही दिवसांमधील ही चौथी कारवाई आहे. सकीना खातून (वय २६), मोनिका अल्ताफ शेख (वय २८), परवीन जोहरमुल्ला शेख (वय ३५), हबीब अब्दुल शेख (वय २४), इसरात जनस सलमान शेख (वय २३) अशी पकडलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
12 May 2026 12:36 PM (IST)
पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. आंबेगाव पठार परिसरात अनैतिक संबंधातून एका तरुणाचा डोक्यात लाकडी पाट तसेच धारधार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. दरम्यान, दोघांनी या तरुणाचा खून केला असून, दोघेही पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. दिपक क्षीरसागर वय (३८, रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दिपक याच्या बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
12 May 2026 12:24 PM (IST)
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येत असून भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. शेतकऱ्यांची संमती घेवून त्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या कल्पना, आडाखे मांडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत प्रकल्प बाधित शेतकरी शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित होताना दिसत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा परतावा या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस प्रसिद्ध करून शेतकऱ्यांच्या संमती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या संमती घेण्यासाठी शेतकऱ्यांवरच एक मोठा डाव टाकला आहे. आणि तो म्हणजे जमिनीची संमती घेताना ती जमीन निर्वेध आणि निर्जोखमीची म्हणजे जमीन कोणत्याही बँकेकडे किंवा सावकाराकडे गहाण नसावी, संबंधित क्षेत्रावर कोणत्याही बँकेचे कर्ज नसावे अशी अट घातली आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प बाधित सातही गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी केली आहे. सातही गावातील शेतकऱ्यांनी कोणत्या बँकेतून आणि किती कर्ज काढले आहे याची माहिती संकलित केली आहे. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँक, सोसायटी, सहकारी बँक, पतसंस्था यांच्याकडून माहिती घेतली. तसेच ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे त्यांना प्रथम कर्ज बँकेत भरण्यास सांगून बँकेकडून कोणतेही कर्ज नसल्याचा दाखला घेतला. त्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांची संमती घेवून त्यास त्याप्रमाणे पैसे दिले.
12 May 2026 12:12 PM (IST)
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, खाद्यतेल, डाळी तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे मध्यमवर्गीय व कामगार वर्गाचे जगणे अधिक कठीण बनले आहे. पूर्वी महिन्याचा खर्च ठराविक मर्यादेत भागत होता; मात्र आता पगार वाढत नसताना खर्च दुप्पट झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. “महिन्याचा पगार हातात पडतो आणि काही दिवसांतच संपतो,” अशी व्यथा अनेक कुटुंबप्रमुखांनी व्यक्त केली आहे. बाजारपेठेत टोमॅटो, कांदा, बटाटा यांसारख्या सर्वसामान्य भाज्यांचे दरही चढेच राहिले आहेत. त्यातच दूध, खाद्यतेल व किराणा सामानाच्या किंमती वाढल्याने गृहिणींचे बजेट विस्कळीत झाले आहे. घरखर्च भागविताना अनेकांना बचतीकडे पाठ फिरवावी लागत असून, काही कुटुंबांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. वाहनधारकांनाही इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे प्रवास खर्च वाढला असून, त्याचा परिणाम भाडेवाढ आणि मालवाहतुकीवरही होत आहे. परिणामी बाजारातील वस्तूंच्या किंमती आणखी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
12 May 2026 12:00 PM (IST)
महाराष्ट्र कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ नेते अभय छाजेड यांच्या कारला सोमवारी (11 मे) रोजी पुण्याजवळ अपघात झाल्याची माहीत समोर आली आहे. या अपघातात छाजेड यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने शहरातील पुना हस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
12 May 2026 11:55 AM (IST)
देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘नारी शक्ती अवॉर्ड्स २०२६’ (Nari Shakti Awards 2026) ची अधिकृत घोषणा केली आहे. हा अवॉर्ड देशातील महिलांच्या नेतृत्वाला, त्यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेला आणि सामाजिक योगदानाला राष्ट्रीय ओळख मिळवून देणारा आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाला ‘यूएन विमेन एम्पॉवरमेंट प्रिन्सिपल्स’ (UN Women Empowerment Principles) नुसार धोरणात्मक सहकार्य लाभले आहे. ज्यामुळे महिलांचा विविध क्षेत्रातला सहभाग, समानता आणि सर्वसमावेशकता वाढण्यास मदत होईल.
12 May 2026 11:50 AM (IST)
जैवतंत्रज्ञान आणि आरोग्य संशोधन क्षेत्रात वाढत्या तांत्रिक कौशल्यांच्या गरजा लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राने आरटी-पीसीआर व प्रगत मॉलिक्युलर बायोलॉजी तंत्रज्ञानावरील दोन आठवड्यांचा ऑन-जॉब ट्रेनिंग (ओजेटी) कार्यक्रम सुरू केला आहे. जीव विज्ञान शाखेतील विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसिद्धता वाढविण्याच्या उद्देशाने हा ४ क्रेडिटचा अल्पकालीन प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
12 May 2026 11:45 AM (IST)
राज्यात शासकीय प्रकल्प उभारताना जमिनीचे भूसंपादन केले जाते. त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला दिला जातो. परंतु, काही व्यक्ती, व्यापारी प्रशासनाला हाताशी धरून व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, तसे गैरव्यवहार आढळून आल्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
12 May 2026 11:40 AM (IST)
टेक जायंट कंपनी अॅपलने अखेर त्यांच्या करोडो iPhone यूजर्ससाठी नवीन आयओएस अपडेट जारी केले आहे. यावेळी कंपनीने आयओएस 26.5 अपडेट रोल आउट केले आहे. गेल्या एका महिन्यापासून या अपडेटचे बीटा वर्जन डेवलपर्ससाठी उपलब्ध होते. मात्र आता कंपनीने या अपडेटचे स्टेबल पब्लिक वर्जन देखील जारी केले आहे. या नव्या अपडेटमध्ये यूजर्सना अनेक नवीन फीचर्स आणि सिक्योरिटीसह प्रायव्हसी देखील सुधारण्यात आली आहे.
12 May 2026 11:35 AM (IST)
पुण्यातील नसरापूर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त झाली. विकृत नराधमाने एका चिमुरडीचा जीव घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला. मात्र आता या मधील आरोप भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कस्टडी मध्ये आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस याचा तपास वेगाने करत आहेत. करण लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी चार्जशीट दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार पुणे पोलिसांच्या हाती लागला आहे. ज्या व्यक्तीने तो नराधम हा गोठ्यात घेवून जात होता. तो महत्वाचा पुरावा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याची पण साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्याची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.
12 May 2026 11:30 AM (IST)
सोशल मिडियाच्या जगात कधी काय होईल ते सांगता येत नाही. इथे अनेक अजब-गजब आणि धक्कादायक दृष्ये शेअर केली जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. फक्त थक्क करणारेच नाही तर काही मजेदार हास्यास्पद व्हिडिओ देखील इथे शेअर केले जातात. अलिकडे एका लग्नासमारंभातील अनोखा प्रकार इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे जो फार ट्रेंडमध्ये आहे. व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपातच नवरा आणि नवरी यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसते. मुख्य म्हणजे हा वाद पुढे जाऊन इतका वाढतो की, लग्नाच्या स्टेजवरच वर आणि वधू एकमेकांना हाणामारी करायला सुरुवात करतात.
12 May 2026 11:25 AM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या शालांत माध्यमिक म्हणजेच दहावीच्या (एसएससी) परीक्षेत महानगरपालिकेच्या २४६ माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महानगरपालिका मुख्यालयात शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी साेमवारी गाैरव केला. यावेळी विद्यार्थ्यांबराेबर मनमाेकळ्या गप्पा मारत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या या छोटेखानी समारंभास शिक्षण समिती सदस्य, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी सुजाता खरे, शिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किरतकुडवे आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
12 May 2026 11:20 AM (IST)
पश्चिम बंगालमधील सत्ताबदलाचा परिणाम सीमेपलीकडील बांगलादेशात दिसू लागला आहे. भाजपच्या सत्तेत येण्याने बांगलादेश (Bangladesh) कट्टरपंथीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशातील कट्टरपंथी मौलाना इनायतुल्लाह यांनी उकसवणारे भाषण केले आहे. त्यांनी थेट भारतविरोधी युद्धाची धमकीची भाषा केली आहे. यामुळे भारत-बांगलादेश संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
12 May 2026 11:08 AM (IST)
महाराष्ट्र बोर्ड परीक्षांच्या निकालानंतर आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) १२ वीच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांमध्ये लागली आहे. अखेर ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण आज सीबीएसईचा निकाल लगण्याची शक्यता आहे. तसेच इतर राज्यांच्या बोर्डाच्या निकालाप्रमाणे सीबीएससी बोर्ड परिक्षेत मुली बाजी मारणार का ? याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.