Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण

Marathi breaking live marathi headlines update 13 March 2025: आज 13 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातील शासकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 13, 2025 | 07:29 PM
Top Marathi News today Live

Top Marathi News today Live

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates : विरारमध्ये बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी आग लागल्याने जळाल्या. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा संताप आहे. पूर्वीही बस मध्ये पेपर तपासताना शिक्षक दिसले होते. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत. पोलिस तपास सुरू आहे.

The liveblog has ended.
  • 13 Mar 2025 07:15 PM (IST)

    13 Mar 2025 07:15 PM (IST)

    Thackeray Brothers : गुढीपाडव्याला बंधू मिलन? राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार? निमंत्रण पत्रिका व्हायरल

    कित्येक वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. काही नेत्यांनी ही इच्छा बोलूनही दाखवली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन्ही मोठे नेते. ठाकरे बंधू एकत्र आले तर शिवसेना किंवा मनसेला अधिक बळ मिळेल असं बोललं जातं. मात्र अद्याप तसं काही झालेलं नाही. अशातच आता बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर लावलेल्या निमंत्रण पत्रिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

  • 13 Mar 2025 06:59 PM (IST)

    13 Mar 2025 06:59 PM (IST)

    ठाकरेंच्या पक्षातील गळती थांबेनाच! ‘या’ ‘फायरब्रँड’ महिला नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे जिल्ह्यात दोन दिवसात दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे. कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना आपल्याकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील फायरब्रँड नेत्या शिवसेनेच्या गळाला लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. यावेळी सुलभा उबाळे यांचे पुत्र अजिंक्य उबाळे यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • 13 Mar 2025 05:05 PM (IST)

    13 Mar 2025 05:05 PM (IST)

    नातीची छेडछाड, तीन फरार, आरोपींना पोलिसांना पाठबळ

    छेडछाड प्रकरणातील आरोपी फरार आहेत, त्यांना स्थानिक नेत्याचे संरक्षण आहे. त्याचबरोबर पोलिसांशी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

     

  • 13 Mar 2025 04:08 PM (IST)

    13 Mar 2025 04:08 PM (IST)

    हलाल सर्टिफिकेशन असलेल्या प्रत्येक वस्तूवर हिंदू ग्राहकांनी बहिष्कार टाकावा

    हलाल सर्टिफिकेशन असलेल्या खाद्यपदार्थात काय मिसळलं जातं हे तपासण्याची गरज आहे. हलाल सर्टिफिकेशनसाठी कंपन्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या पैशाचं पुढे काय होते? त्याचा वापर कुठे होतो? या गौडबंगालाचा शोध सरकारने घ्यावा, अशी मागणी भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

  • 13 Mar 2025 03:19 PM (IST)

    13 Mar 2025 03:19 PM (IST)

    सतीश उर्फ खोक्या भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा

    प्रयागराज न्यायालयाकडून खोक्या भोसलेला ट्रांसिट रिमांड मिळाल्याने पोलिसांना यश मिळाले आहे. आता त्याला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • 13 Mar 2025 03:11 PM (IST)

    13 Mar 2025 03:11 PM (IST)

    १८ मार्चपासून माथेरान बंद; पर्यकांची फसवणूक होत असल्याचा पर्यटन समितीचा गंभीर आरोप

    माथेरान शहरात येणाऱ्य़ा पर्यटकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पर्यटक सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतात. माथेरान शहरातील पर्यटन वाचवण्यासाठी माथेरान शहर बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणारे पर्यटक यांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी माथेरान मधील व्यावसायिक आणि माथेरान मधील नागरिक यांच्याकडे पोहचल्या आहेत. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माथेरान पर्यटन बचाव समिती कडून या पर्यटक फसवणुकीबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.

  • 13 Mar 2025 02:29 PM (IST)

    13 Mar 2025 02:29 PM (IST)

    संगमनेरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर धक्काबुक्की

    राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरच्या दौऱ्यावर होते. संगमनेर नगरपालिकेत विखे पाटील यांनी आढावा बैठक घेतली हेाती. त्या बैठकीत छात्रभारती संघटनेचे कार्यकर्ते पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्या वेळी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. राणे यांचा राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली होती, घोषणाबाजीनंतर गोंधळ वाढत गेला. त्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार विखे पाटील यांच्यासमोर घडला.

  • 13 Mar 2025 02:06 PM (IST)

    13 Mar 2025 02:06 PM (IST)

    तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार

    धनंजय मुंडे 302 च्या गुन्ह्यात शंभर टक्के येणार आहे, ही गोष्ट सर्वांना आता कळते आहे. पुरवण्या दोषारोपापत्रात ते सहआरोपी म्हणून येणार. ते जर आले नाही तर सरकार संशयाच्या भोवऱ्यात येणार, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले.

  • 13 Mar 2025 01:58 PM (IST)

    13 Mar 2025 01:58 PM (IST)

    आयपीएलमधून दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज हॅरी ब्रुकवर बंदी

    इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकला यावेळी मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले, परंतु त्याने सीझन-१८ सुरू होण्यापूर्वी त्याचे नाव मागे घेतले. त्यानंतर हॅरी ब्रुकवर आयपीएलमधून बंदी घालण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये असा नियम करण्यात आला होता की जो कोणी परदेशी खेळाडू हंगाम सुरू होण्यापूर्वी आपले नाव मागे घेईल त्याला पुढील 2 आयपीएल हंगामांसाठी बंदी घातली जाणार आहे. त्यामुळे आता याचा फायदा सरफराज खान याला होऊ शकतो.

    Harry Brook should be banned. No excuse. pic.twitter.com/NHKaArgRpg

    — Yash Lahoti (@YvLahoti) March 10, 2025

  • 13 Mar 2025 12:45 PM (IST)

    13 Mar 2025 12:45 PM (IST)

    ठाणे मनपा हद्दीत स्वच्छता मोहिम; पालिका आयुक्तांनी केली पाहणी

    ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली आहे. इंदिरानगर,  किसननगर येथे करण्यात येत असलेल्या साफसफाईचे  काम तसंच सीपी टॅंक येथे सुरू असलेल्या कचरा हस्तांतरण प्रक्रियेचीही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली आहे.

  • 13 Mar 2025 11:58 AM (IST)

    13 Mar 2025 11:58 AM (IST)

    धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण

    धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर हे पोलिसांना शरण आले आहेत. खिंडकर हे एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता, त्यांनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पिंपळनेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

  • 13 Mar 2025 11:57 AM (IST)

    13 Mar 2025 11:57 AM (IST)

    पुणे मेट्रो उद्या बंद राहणार

    राज्यात आज होळी साजरी होत आहे. यानिमित्ताने पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. पुणे मेट्रोकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. उद्या १४ मार्च रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पुण्यात मेट्रो सेवा बंद राहणार आहे. दुपारी ३:०० ते रात्री ११:०० या वेळेत पुणे मेट्रोची प्रवासी सेवा नियमित सुरु असेल. याबाबत पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी टि्वट करीत माहिती दिली आहे.

  • 13 Mar 2025 11:40 AM (IST)

    13 Mar 2025 11:40 AM (IST)

    लीलावती रुग्णालयात काळी जादू?

    मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालय चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला आहे. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय आणि वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. ट्रस्टने असाही दावा केला आहे की, माजी विश्वस्त आणि त्यांचे सहकारी रुग्णालयाच्या परिसरात काळी जादू करत होते.

  • 13 Mar 2025 11:39 AM (IST)

    13 Mar 2025 11:39 AM (IST)

    दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार?

    राज्यात परीक्षांचे वातावरण आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परिक्षाचा सुरु आहेत. पुढील आठवड्यामध्ये या दोन्ही परीक्षा संपणार आहेत. अशामध्ये झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे कामही सुरु झाले आहे. अशातच विद्यार्थ्यंना दहावी आणि बारावीचा निकाल लागणार कधी? हा प्रश्न पडला आहे. यावर राज्य मंत्री मंडळाने निर्णय दिला आहे. HSC तसेच SSC चा निकाल लवकरच लागणार आहे. १५ मे २०२५ या तारखेच्या पूर्वी निकाल सादर करण्यात येणार आहे.

  • 13 Mar 2025 11:25 AM (IST)

    13 Mar 2025 11:25 AM (IST)

    शक्तीपीठ महामार्गाची मागणी कोणाची?

    खासदार संजय राऊत म्हणाले की, “ महायुतीच्या जाहीरनाम्यात दोन प्रमुख घोषणा आहेत. यामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये तर शेतकऱ्यांना कर्ज माफी या घोषणा आहेत. त्याचं तुम्ही काय करणार याचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालं पाहिजे. आठ लाख हजार कोटीच्या वरच कर्ज हा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? शक्तीपीठ मार्गाची मागणी कोणी केली होती?. शक्तीपीठ मार्गाची मागणी गेल्या काही वर्षात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. टेंडर देण्यात आले. ते पैसे निवडणुकीचत वापरले असतील किंवा आमदार खरेदीसाठी वापरले असावेत” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

  • 13 Mar 2025 11:20 AM (IST)

    13 Mar 2025 11:20 AM (IST)

    महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने जाहीर केली आकडेवारी

    नाशिक- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. नाशिकच्या गोदावरीतील पाण्याला गुड टू एक्सलांट असा शेरा म्हणजे पाणी पिण्यायोग्य आहे. गुड टू एक्सलांट शेरा म्हणजे मिनरल वॉटरचे पाणी. राज ठाकरेंनी नदी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी चर्चेत आली आहे.

  • 13 Mar 2025 11:11 AM (IST)

    13 Mar 2025 11:11 AM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या  अनधिकृत बांधकामावर पडला हातोडा 

    मुंबई-गोवा महामार्गालगत ओरोस येथे असलेले अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी अब्दुल हमीद सबुराती यांच्या मालकीच्या गादी कारखान्यावर कारवाई केली आहे. तसंच आजूबाजूच्या अनधिकृत बांधकामावर देखील हातोडा पाडला आहे.

  • 13 Mar 2025 11:07 AM (IST)

    13 Mar 2025 11:07 AM (IST)

    मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अग्नीतांडव; तीन वाहनांना लागली आग

    मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काल रात्री 11 ते पहाटे 5 वाजन्याच्या कालावधित एकूण तीन वाहनाना आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगीत वाहनं जळून खाक झाली मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

  • 13 Mar 2025 11:00 AM (IST)

    13 Mar 2025 11:00 AM (IST)

    बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

    विरार पश्चिमेकडे अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला आले आहे. मुळात, राज्यात परीक्षांचे वातावरण आहे. परीक्षा झाल्या की राज्यातील शिक्षकवर्ग उत्तरपत्रिकेच्या तपासणीला लागतात. पण असा नियम आहे की शिक्षकांनी त्या उत्तरपत्रिकांची तपासणी शाळेमध्येच करावी. पण विरारमध्ये घडलेल्या या घटनेमध्ये उत्तरपत्रिका घरी तपासणीसाठी नेण्यात आली होती. दरम्यान, शिक्षिकेच्या घरी लागलेल्या या आगीमध्ये उत्तरपत्रिका जाळून खाक झाले आहेत.

  • 13 Mar 2025 10:55 AM (IST)

    13 Mar 2025 10:55 AM (IST)

    सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांनी घेतला

    बीडवरून प्रयागराज गेलेल्या पोलिस पथकाने खोक्या उर्फ सतीश भोसलेचा ताबा घेतला आहे. प्रयागराजच्या एअरपोर्ट पोलिस ठाण्यातून हा ताबा घेण्यात आला आहे. ताबा घेतल्यानंतर आज अकरा वाजता प्रयागराज न्यायालयासमोर खोक्याला हजर केलं जाणार आहे. तर त्यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात येण्याची शक्यता आहे.

  • 13 Mar 2025 10:55 AM (IST)

    13 Mar 2025 10:55 AM (IST)

    होळीसाठी 13 विशेष रेल्वे

    उन्हाळ्याच्या सुटीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन पुणे रेल्वे विभागाने होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवर मोठा मंडप टाकण्यात आला आहे.

  • 13 Mar 2025 10:55 AM (IST)

    13 Mar 2025 10:55 AM (IST)

    कर्ज काढून दिवाळी, राऊतांची सरकारवर टीका

    ९ लाख ३२ हजार कोटींचा राज्यावर कर्ज आहे , कर्ज काढून राज्य चालवलं जात आहे , राज्य लुटलं जात आहे, कर्जाच्या ओझं दिवसेंदिवस वाढत आहे , हे माहीत असताना लाडक्या बहिणी सारख्या योजना आणल्यात आणि आता ते बंद करण्याच्या मार्गावर आहे शिवभोजन थाळी सारख्या गरिबांच्या योजना , शिधा योजना अश्या अनेक योजना बंद केल्या , राज्य कस चालवणार असा प्रश्न , कर्ज काढून दिवाळी साजरी करणं किंवा निवडणुकात मतं विकत घेणं म्हणजे हा कर्जबाजारी महाराष्ट्राची तिजोरी या लोकांनी महिलांचा मते विकत घेण्यासाठी वापरली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 13 Mar 2025 10:54 AM (IST)

    13 Mar 2025 10:54 AM (IST)

    मुंबईत डिझेल दोन रुपयांनी स्वस्त

    मुंबईत इंधन स्वस्त झाले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. IOCL च्या आकड्यांनुसार, मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 44 पैसे प्रति लिटरची कपात दिसली. तर किंमत 103.50 रुपये प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत सर्वाधिक 2.12 रुपये इतकी कपात झाली आहे. त्यानंतर डिझेलची किंमत 90.03 रुपये प्रति लिटर झाले.

  • 13 Mar 2025 10:54 AM (IST)

    13 Mar 2025 10:54 AM (IST)

    उन्हाचे चटके, शाळेची वेळ कमी करा

    उन्हाचे चटके बसू लागले आता तरी शाळेची वेळ कमी करा चिमुरड्यांची सरकारकडे आर्त हाक दिली आहे. सध्या उन्हाची दाहकता वाढू लागल्याने त्याच्या झळा आता लहान लहान मुलांनाही बसू लागले असून शाळेची वेळ कमी करा अशी मागणी आता विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही केली आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates 13 march 2025 marathi blog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Breaking News
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी
1

Amravati : वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गाची चाचपणी

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा
2

Kolhapur News : आता नाही माघार, शाहिरांचा जरांगेंना पाठिंबा

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार
3

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

Navi Mumbai : सहाय्यकआयुक्त असल्याचं सांगत नागरिकांची फसवणूक; नवी मुंबईतील भामट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
4

Navi Mumbai : सहाय्यकआयुक्त असल्याचं सांगत नागरिकांची फसवणूक; नवी मुंबईतील भामट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.