Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News today Live : राज्यामध्ये पावसाची संततधार सुरु, पर्वतीय भागात पावसाचा अंदाज

Marathi breaking live marathi headlines update : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 16, 2025 | 02:56 PM
LIVE
Top Marathi News today Live : राज्यामध्ये पावसाची संततधार सुरु, पर्वतीय भागात पावसाचा अंदाज
Follow Us
Close
Follow Us:
  • 16 Sep 2025 02:58 PM (IST)

    16 Sep 2025 02:58 PM (IST)

    ‘पीछे देखो पीछे’ व्हायरल मुलगा अहमद शाहवर कोसळला दुःखाचा डोंगर

    ‘पिछे देखो पिछे’ या मीमने जगभरातील लोकांचं मन जिंकणारा बाल कलाकार अहमद शाहने अलीकडेच त्याच्या चाहत्यांसाठी एक दुःखद बातमी शेअर केली आहे. अहमदने स्वतः इंस्टाग्रामवर त्याच्या भावाच्या मृत्यूची दुःखद बातमी शेअर केली आहे. दोन वर्षांपूर्वी त्याच्या धाकट्या बहिणीचे निधन झाले होते आता त्याने त्याचा धाकटा भाऊ उमेर शाहला सुद्धा कायमचं गमावलं आहे. त्याच्या भावाच्या अचानक निधनामुळे त्याचे संपूर्ण कुटुंब धक्का बसला आहे.

  • 16 Sep 2025 02:57 PM (IST)

    16 Sep 2025 02:57 PM (IST)

    लहान मुलांपासून मोठ्यांसह सगळ्यांचं आवडेल पदार्थ!

    सणावाराच्या दिवसांमध्ये घरात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पुरी. पुरी भाजी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. घरात पनीर, किंवा मटारची भाजी बनवल्यानंतर आवडीने पुरी बनवली जाते. जेवणाच्या ताटात चमचमीत पदार्थ असतील तर चार घास जास्त जातात. पण आज आम्ही तुम्हाला नारळाच्या सरणाच्या खमंग पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काहींना जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच बाजारातील मिठाई आणि साखर टाकून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये खमंग नारळाच्या पुऱ्या बनवू शकता. तुम्ही बनवलेला पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया खमंग नारळाच्या पुऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.

  • 16 Sep 2025 02:56 PM (IST)

    16 Sep 2025 02:56 PM (IST)

    सव्वा लाख लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा होणार नाही, काय आहे कारण?

    मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक खोटी कागदपत्रे दाखल करून योजनेचा फायदा घेतला. मराठवाड्यातील ६५ वर्षांवरील महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. २१ वर्षांखालील मुलींनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे अनेक आरोप सुरु होता.

  • 16 Sep 2025 02:55 PM (IST)

    16 Sep 2025 02:55 PM (IST)

    ह्रुता आणि ललितच्या ‘आरपार’ ला प्रेक्षकांची पसंती

    हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा ‘आरपार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तरुण मंडळी हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. हा चित्रपट एका प्रेमळ लव्ह स्टोरीवर आधारित आहे. रोमँटिक कथा असलेल्या या चित्रपटामध्ये ललित आणि ऋता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना ही नवी जोडी चांगलीच आवडली आहे. या चित्रपटामधील गाणी देखील गाजत आहे. आता अश्याच ‘आरपार’ची चर्चा बॉलीवूडमध्येही होताना दिसत आहे.

  • 16 Sep 2025 02:51 PM (IST)

    16 Sep 2025 02:51 PM (IST)

    ‘या’ सिमेंट शेअर्समध्ये गुंतवणुकीची मोठी संधी!

    Cement Stocks to Buy Marathi News: जीएसटी दर कपात लागू होण्याच्या एक आठवडा आधी सिमेंट स्टॉक्समध्ये हालचाल दिसून येत आहे. मंगळवारी (१६ सप्टेंबर) सुरुवातीच्या व्यवहारात जेके सिमेंट सारख्या कंपन्यांचे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत वाढले. शेअर्समधील चढउताराच्या दरम्यान, ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने सिमेंट क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. यासोबतच, ब्रोकरेजने त्यांच्या कव्हरेजमध्ये समाविष्ट असलेल्या पाच सिमेंट स्टॉक्सवरील लक्ष्य किंमत ४५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. ब्रोकरेजने अंबुजा सिमेंट्स आणि श्री सिमेंट या दोन सिमेंट स्टॉक्सवरील रेटिंग देखील अपग्रेड केले आहे.

  • 16 Sep 2025 02:49 PM (IST)

    16 Sep 2025 02:49 PM (IST)

    पत्रिकेतील मंगळदोष म्हणजे नक्की काय

    हिंदू संस्कृतीत लग्न जुळवताना घर, कुटुंब आणि वधू वराचा स्वभाव याला महत्व दिलं जातं . यासगळ्याबरोबर महत्व येतं ते म्हणजे लग्नासाठी एकमेकांना वधू वर किती साजेसे आहेत हे ठरवण्यासाठी पाहिली जाते ती पत्रिका. तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती काय आहे यावरुन वरुन तुमच्या भविष्याचा अंदाज वर्तवला जातो. लग्नासाठी पत्रिका जुळवताना असं म्हटलं जातं की तुमचे 36 पैकी किती गुण जुळतात यावरुन वधू वर एकमेकांसाठी किती योग्य आहे याला ज्योतिषी भाषेतून अंदाज व्यक्त केला जातो. याच 36 गुणांबरोबरच महत्वाचं आहे ते म्हणजे वधू किंवा वराच्या पत्रिकेतील मंगळाचं स्थान.

  • 16 Sep 2025 02:30 PM (IST)

    16 Sep 2025 02:30 PM (IST)

    नामांकित मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा लैंगिक अत्याचार;

    पुण्याच्या पिंपरी- चिंचवड येथून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मॉलमध्ये कार्यरत असलेल्या महिला सुरक्षा रक्षकावर तिच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे. ही घटना वाकड परिसरातील मिलेनियम मॉलमध्ये घडली आहे.

  • 16 Sep 2025 02:25 PM (IST)

    16 Sep 2025 02:25 PM (IST)

    ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट

    भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये झालेल्या मालिकेमध्ये मालिका अनिर्णयीत राहिली. भारताच्या संघाने शेवटच्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका ड्राॅ केली. चौथ्या सामन्यामध्ये भारताचा उपकर्णधार रिषभ पंत याला गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे त्याला संघ सोडावा लागला होता. त्यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. आता रिषभ पंतच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

  • 16 Sep 2025 02:20 PM (IST)

    16 Sep 2025 02:20 PM (IST)

    अकोल्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार, मूकबधिर मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

    अकोल्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. शेजाऱ्याने एका मूकबधिर मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. ही घटना अकोला शहरातील मोठी उमरी येथील परिसरातील १० सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने शहर हादरून गेले आहे.

  • 16 Sep 2025 02:20 PM (IST)

    16 Sep 2025 02:20 PM (IST)

    नवीन जीएसटी दर लागू होण्याआधी FMGC उत्पादनांवर डिस्काउंटचा महापूर

    वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चे नवीन दर लागू होण्यापूर्वी म्हणजेच २१ सप्टेंबरपर्यंत जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू (एफएमसीजी) बनवणाऱ्या कंपन्या किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या सवलती देत ​​आहेत. जीएसटीचे नवीन दर २२ सप्टेंबरपासून लागू होतील. एफएमसीजी कंपन्या किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांवर ४ ते २० टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत.

  • 16 Sep 2025 02:15 PM (IST)

    16 Sep 2025 02:15 PM (IST)

    प्राजक्ता कोळी ‘या’ बहुचर्चित चित्रपटातून करणार मराठीत पदार्पण

    हेमंत ढोमे क्रांतीज्योती विद्यालय- मराठी माध्यम या नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या आधी त्याच्या ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ आणि ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्याने क्रांतीज्योती विद्यालय- मराठी माध्यम या नवीन चित्रपटाची घोषणा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी केली होती.

  • 16 Sep 2025 02:15 PM (IST)

    16 Sep 2025 02:15 PM (IST)

    नाशिकमध्ये अनैतिक संबंधातून पतीची निर्घृण हत्या

    नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती हा पत्नीच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नी आणि प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. प्रेयसीचा नवरा अडथळा ठरत असल्याकने काटा काढण्यासाठी प्रियकरानं थरारक कट रचल्याच समोर आलं आहे. संतोष उर्फ छोटू काळे असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या तिघांना संशयितांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे

  • 16 Sep 2025 02:12 PM (IST)

    16 Sep 2025 02:12 PM (IST)

    चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालाला मिळाली धमकी

    प्रॉडक्शन हाऊस नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट (NGE) ने काही लोकांविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हे लोक त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे मागत होते आणि त्यांच्या चित्रपटांची, चित्रपट निर्मात्यांची आणि कलाकारांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत होते. साजिद नाडियाडवाला यांची कंपनी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने सोमवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यांच्याकडे असे पुरावे आहेत जे सिद्ध करतात की त्यांना धमक्या मिळत आहेत.

  • 16 Sep 2025 01:55 PM (IST)

    16 Sep 2025 01:55 PM (IST)

    जागतिक अनिश्चितता असूनही ऑगस्टमध्ये निर्यात 6.7 टक्क्यांनी वाढली, व्यापार तूट घटली

    ऑगस्टमध्ये भारताच्या वस्तूंच्या निर्यातीत ६.७ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३५.१ अब्ज डॉलर्स झाली. जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकेने अनेक भारतीय वस्तूंवर लादलेले जड शुल्क असूनही निर्यातीत ही वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये वस्तूंच्या निर्यातीत वाढ ही गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ३२.९ अब्ज डॉलर्सच्या कमी निर्यात आधारामुळे देखील झाली आहे. या वर्षी जुलैबद्दल बोलायचे झाले तर, देशातून ३७.२४ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात झाली. अशाप्रकारे, जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये निर्यातीत ५.७ टक्क्यांनी घट झाली आहे.

  • 16 Sep 2025 01:54 PM (IST)

    16 Sep 2025 01:54 PM (IST)

    भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

    ल्ह्यातील जिंतूर औंढा महामार्गावरील पुंगळा गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावरून वेगाने जात असलेल्या ट्रकने थेट झाडाला धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. यात चालक आणि क्लीनर दोघांचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

  • 16 Sep 2025 01:45 PM (IST)

    16 Sep 2025 01:45 PM (IST)

    वाहतूक कोंडीवर काढला तोडगा? घोडबंदर रहिवाशांना मिळणार दिलासा

    मुंबईहून अहमदाबाद जाताना घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही वाहतूक कोंडी आता प्रवाशांसाठी आणि स्थानिकांसाठी देखील डोकेदुखी ठरत आहे. गेले कित्येक दिवस या वाहतूक कोंडीच्या त्रासाला कंटाळलेल्या स्थानिकांना आणि प्रवाशांना आता यातून दिलासा मिळणार असल्याचं दिसून येत आहे. सततच्या या वाहतूक कोंडीबाबत आता उपमुख्य़मंत्र्य़ांनी यावर तोडगा काढला असून समस्येबाबत काही आदेश जिल्हाप्रशासनाला दिले आहेत.

  • 16 Sep 2025 01:35 PM (IST)

    16 Sep 2025 01:35 PM (IST)

    वीकेंड नंतरही ‘दशावतार’ची कोट्यावधींची घोडदौड सुरूच!

    वीकेंड नंतरही ‘दशावतार’ चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. या चित्रपटाने ४  दिवसांत जोरदार कमाई केली आहे. कोकणातील लोककलेशी निगडीत असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. दशावतार शुक्रवारी. १२ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने सलग तीन दिवस कोटींमध्ये कमाई केली. आठवड्याच्या पहिल्यादिवशी सोमवारी या चित्रपटाने १ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ‘दशावतार’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर हाऊसफुल केले आहेत. दशावतार चित्रपटाने पहिल्या आठवड्यात आपली ताकद दाखवून असून या चित्रपटाने ४ दिवसांत एकूण ६.२३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

  • 16 Sep 2025 01:25 PM (IST)

    16 Sep 2025 01:25 PM (IST)

    मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू युवराज सिंह ED च्या कचाट्यात

    क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे.अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात आणि युवराजला २३ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. उथप्पा सध्या आशिया कप २०२५ च्या कमेंट्री टीमचा भाग आहे. आतापर्यंत दिल्लीतील या प्रकरणात चार माजी भारतीय क्रिकेटपटूंना समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी, संघीय एजन्सीने या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली होती. हे प्रकरण १xBet नावाच्या बेटिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे.

  • 16 Sep 2025 01:15 PM (IST)

    16 Sep 2025 01:15 PM (IST)

    आता फक्त ५० रुपयांत होणार जेवणाची डिलिव्हरी!

    नवीन ऑफरिंगमुळे अन्न वितरण बाजारपेठेत स्पर्धा तीव्र होत चालली आहे. ऑनलाइन ऑर्डरवर अन्न वितरण करणारी कंपनी स्विगीने परवडणाऱ्या श्रेणीमध्ये विविधता आणण्यासाठी ‘टोइंग’ हे वेगळे अॅप्लिकेशन सुरू केले आहे. सध्या, हे नवीन अॅप पुण्यात अन्न वितरण सेवा देत आहे. परंतु त्याचे मुख्य लक्ष्य निवडक रेस्टॉरंट्स, सुव्यवस्थित ऑर्डरिंग, सरलीकृत वापरकर्ता अनुभव आणि मुख्य स्विगी अॅपपेक्षा तुलनेने कमी किमती देणे आहे. 

  • 16 Sep 2025 01:05 PM (IST)

    16 Sep 2025 01:05 PM (IST)

    माजी क्रिकेटपटू युवराज सिंह ED च्या कचाट्यात

    क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे.अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. उथप्पाला २२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ईडी मुख्यालयात आणि युवराजला २३ सप्टेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. हे प्रकरण ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित आहे. उथप्पा सध्या आशिया कप २०२५ च्या कमेंट्री टीमचा भाग आहे. आतापर्यंत दिल्लीतील या प्रकरणात चार माजी भारतीय क्रिकेटपटूंना समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी, संघीय एजन्सीने या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी केली होती. हे प्रकरण १xBet नावाच्या बेटिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे.

  • 16 Sep 2025 01:05 PM (IST)

    16 Sep 2025 01:05 PM (IST)

    भारत अन् अमेरिकेमधील नाराजी होणार दूर

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे व्यापार सल्लागारी पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतवर मोठे विधान केले आहे. नवारो यांनी पुन्हा भारत आणि अमेरिकेच्या व्यापार चर्चेवर आणि भारतावर लादलेल्या करावर आपले मत माडंले आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारताला टॅरिफचा महाराजा म्हटले आहे. तसेच एका मुलाखतीदरम्यान नावारो यांनी म्हटले की, भारत व्यापार चर्चेचा अंतिम टप्प्यावर आला आहे. सध्या दोन्ही देशात व्यापारातील अडथळे दूर करण्यावर चर्चा सुरु आहे. पण त्यांनी भारत रशिया तेल व्यापारावर आणि भारत चीन संबंधावर टीका केली आहे.

  • 16 Sep 2025 12:55 PM (IST)

    16 Sep 2025 12:55 PM (IST)

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन…

    उमराणे येथील रामेश्वर बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. अचानक भाव गडगडल्याने शेतकरी देवळा-मालेगाव रोडवर उतरले. रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांकडून शेतकऱ्यांना समजावण्याचे प्रयत्न सुरू. कांदाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी…

  • 16 Sep 2025 12:45 PM (IST)

    16 Sep 2025 12:45 PM (IST)

    उमराणे – कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

    उमराणे (नाशिक) – उमराणे येथील रामेश्वर बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला. कांदा बाजारभावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. अचानक भाव गडगडल्याने शेतकरी देवळा-मालेगाव रोडवर उतरले. रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

  • 16 Sep 2025 12:35 PM (IST)

    16 Sep 2025 12:35 PM (IST)

    मराठवाड्यात सव्वा लाख लाडक्या बहिणी अपात्र

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला, 65 वर्षाच्या वरील महिलांनीही लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते, तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही पुढे आले, त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला. यात मराठवाडा परिसरात सव्वा लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे.

  • 16 Sep 2025 12:25 PM (IST)

    16 Sep 2025 12:25 PM (IST)

    काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन

    सोलापूर काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. काँग्रेसकडून त्या दोन वेळा विजयी झाल्या होत्या. स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्या कन्या आणि काँग्रेसच्या सक्रिय आमदार म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेस पक्षासह त्यांचा महिला चळवळीतही सक्रिय सहभाग होता. सोलापूर शहर दक्षिण मधून काँग्रेसकडून 1872 ते 1976 या काळात त्या विधानसभेवर तर त्यानंतर त्या विधान परिषदेवर आमदार राहिल्या.

  • 16 Sep 2025 12:15 PM (IST)

    16 Sep 2025 12:15 PM (IST)

    सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन

    सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी रात्री निधन झालं. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वोच्च न्यायालयात चक्कर आल्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ शिंदे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मूळचे नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे ते रहिवासी होते. सिद्धार्थ हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू होते.

  • 16 Sep 2025 12:05 PM (IST)

    16 Sep 2025 12:05 PM (IST)

    लोकलमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीशी गैरवर्तन 

    दादर रेल्वे स्थानकावर एका ६२ वर्षीय आरोपीने लोकलमधील गर्दीचा फायदा घेत लोकलधील १९ वर्षीय तरुणीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. डीजी मखाण असे या आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

    ही घटना १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. मखाण दिल्लीचे रहिवासी असून तहसीलमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर जीआरपी पोलिसांनी त्याला अटक केली.

  • 16 Sep 2025 11:55 AM (IST)

    16 Sep 2025 11:55 AM (IST)

    राज्याच्या तिजोरीतून पैसे कुठे चाललेत, नाना पटोलेंचा अजित पवारांच्या भेटीनंतर सवाल

    नाना पटोले यांनी नुकतंच अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रलंबित विषयांवर भेट घेतल्याची माहिती दिली. राज्याच्या तिजोरीतून पैसे कुठे चालले आहेत, सध्या तिजोरी लुटण्याचं काम सुरु असल्याने राज्यावर बोजा येत आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

  • 16 Sep 2025 11:45 AM (IST)

    16 Sep 2025 11:45 AM (IST)

    बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प ओव्हरफ्लो, 19 दरवाजे उघडले

    बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, प्रकल्पाचे एकूण १९ दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले आहेत. यामुळे प्रकल्पातून १३२६ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदीकाठच्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्पाचेही पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • 16 Sep 2025 11:35 AM (IST)

    16 Sep 2025 11:35 AM (IST)

    बॅनरवर प्रिती बंड यांचा फोटो नसल्याने वाद

    एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अमरावतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ता लावलेल्या फलकावरुन शिवसेनेच्या उपनेत्या प्रिती बंड यांचा फोटो नसल्याचे वादाला तोंड फुटलं आहे. प्रीती बंड यांनी काही महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्ञानेश्वर धाने पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • 16 Sep 2025 11:33 AM (IST)

    16 Sep 2025 11:33 AM (IST)

    माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा आज वाढदिवस

    देशाचे माजी अर्थमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांचा आज वाढदिवस आहे.  कॉंग्रेसमधील एक संयमी नेते आणि राजकारणातील अनुभवी व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या पी. चिदंबरम यांनी तीन वेळा देशाचे अर्थमंत्रीपद सांभाळले आहे. मनमोहन सिंग सरकारमधील एक महत्त्वाचे सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या शांत आणि मृदू स्वभावामुळे त्यांची राजकीय वर्तुळामध्ये संयमी नेते अशी ओळख निर्माण झाली आहे. तीन दशके त्यांनी कॉंग्रेस पक्षामधून काम केले असून १६ सप्टेंबर १९४५ रोजी तामिळनाडूमध्ये झाला.

  • 16 Sep 2025 11:25 AM (IST)

    16 Sep 2025 11:25 AM (IST)

    राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला परवानगी

    राज्यात इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवेला सरकारने महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियमांतर्गत परवानगी दिली आहे. आता राज्य सरकारने या बाइक टॅक्सीचे भाडेदर निश्चित केलं आहे. हा निर्णय तत्काळ लागू करण्यात येणार असल्याचेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

  • 16 Sep 2025 11:15 AM (IST)

    16 Sep 2025 11:15 AM (IST)

    महापालिका निवडणुकीबाबत आज सुनावणी

    स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे. जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढ मिळावी, अशी मागणी सरकारने केली आहे. त्यावर आज सुनावणी आहे.

  • 16 Sep 2025 11:12 AM (IST)

    16 Sep 2025 11:12 AM (IST)

    मराठवाड्यातील बोगस लाखो लाडक्या बहिणींची पोलखोल

    महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या बोगस किंवा अपात्र महिलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मराठवाड्यातील बोगस लाखो लाडक्या बहिणींची पोलखोल झाली असून 80 हजार मराठवाड्यामधील अर्ज बाद करण्यात आले आहे. यामध्ये 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांनी अर्ज दाखल केले असल्याचे उघडकीस आले आहे.

  • 16 Sep 2025 11:09 AM (IST)

    16 Sep 2025 11:09 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत मुदतवाढीसाठी राज्य सरकाराचा अर्जे

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार असून याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणुक घेण्याबाबत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सरकारने याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज केला असून यामध्ये जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढीची मागणी केली आहे.

Marathi Breaking news live updates : आज देखील देशभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पर्वतीय राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पूर्वेकडील राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राजस्थान, पंजाब, गुजरात आणि अन्य भागात पावसासाठी अनुकूल आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशमधील 14 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे राहण्याचा अंदाज आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates 16 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 11:07 AM

Topics:  

  • daily news
  • maharashtra news
  • political news

संबंधित बातम्या

राज्यातील परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट होणार बंद? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच घेणार निर्णय
1

राज्यातील परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट होणार बंद? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच घेणार निर्णय

नवनियुक्त राज्यपालांची उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट; व्यक्त केल्या सदिच्छा
2

नवनियुक्त राज्यपालांची उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट; व्यक्त केल्या सदिच्छा

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका
3

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल…; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास
4

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल…; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.