Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट होणार बंद? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच घेणार निर्णय

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर दौरा केला आहे. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेजवळील नांदणी चेक पोस्टची पाहणी केली.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 16, 2025 | 02:49 PM
Transport Minister Pratap Sarnaik visits Solapur, inspects checkposts Political News

Transport Minister Pratap Sarnaik visits Solapur, inspects checkposts Political News

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर :  कायद्याच्या कक्षेत बसून सर्वसामान्य वाहनचालकांना चेक पोस्टवर विनाकारण त्रास दिला जात आहे. तसेच या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याने त्यास पायबंद घालण्यासाठी शासन नवीन धोरण आखत आहे. त्या अनुषंगाने आंतरराज्य सीमावर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेक पोस्ट बंद करण्याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सोलापूर शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित शासकीय विभाग प्रमुख व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री सरनाईक मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी आज (दि.15) महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतील नांदणी येथील चेक पोस्टला स्वतः भेट दिली. त्या चेक पोस्ट वरून रोज किती गाड्या पास होतात तसेच अतिरिक्त भार असलेल्या किती गाड्यावर कारवाई केली याचा सविस्तर अहवाल लेखी स्वरूपात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सादर करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय स्तरावर सुरू आहेत. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. तसेच अतिवृष्टीने सोलापूर शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेले होते त्याचेही पंचनामे करावेत व असे नागरिक शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. विमानतळ प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने सोलापूर येथून मुंबईसाठी विमान सेवा लवकरच सुरू होईल या दृष्टीने संबंधित विमान कंपनीकडे पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरणाने प्रयत्न केले पाहिजेत, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देऊन कुणबी प्रमाणपत्र वाटपाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन जिल्हा प्रशासनाने करावे, असेही त्यांनी सांगितले.

कामगार विभागाच्या वतीने सर्वसामान्य व गोरगरीब कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो परंतु या विभागाकडे बऱ्याच तक्रारी येत असून जिल्हाधिकारी यांनी स्वतः या दृष्टीने स्वतंत्र बैठक घेऊन विना तक्रार जिल्ह्यातील सर्व कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच मंद्रूप, दुधनी व बोरामणी येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस स्थानक होण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता महसूल प्रशासनाकडून व्हावी. एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी उपरोक्त ठिकाणी भेटी देऊन जागा पाहणी करावी व सदरची जागा महसूल प्रशासनाकडून मिळण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच सोलापूर येथील एसटी महामंडळाचे वर्कशॉप एमआयडीसी येथील नवीन जागी लवकरात लवकर सुरू करावे, असेही निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 10 सप्टेंबर 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच पंचनामे कार्यवाही पूर्ण होत असून त्याचा सविस्तर प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी विषय सूचीनुसार विषयांची माहिती दिली.

बैठकीत पदाधिकाऱ्यांनी मांडलेले विषय व सूचना…

  • सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालयात कामगारांसाठी असलेल्या योजनांचा लाभ दिला जात नाही तसेच कागदपत्रांसाठी विनाकारण त्रास दिला जातो त्या अनुषंगाने संबंधितावर कार्यवाही करून कामगारांना योजनांचा लाभ द्यावा.
  • मंद्रूप ग्रामपंचायत ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून लोकसंख्या 20000 पेक्षा अधिक आहे. तरी या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा तसेच या ठिकाणी एसटी महामंडळाचे बस स्थानक बांधावे.
  • दुधनी येथे एसटी महामंडळाचे बस स्थानक निर्माण करावे, बोरामणी येथे बस स्थानक निर्माण करावे, सोलापूर येथील एसटी महामंडळाचे वर्कशॉप नवीन जागेत स्थलांतरित करावे.
  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा,
  • सोलापूर महापालिकेने सोलापूर शहराचा बृहत आराखडा केला असून तो चुकीचा आहे त्याला स्थगिती देण्याची मागणी
  • अतिवृष्टीमध्ये सोलापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले याला महापालिका जबाबदार असून सर्व रस्ते नाल्या स्वच्छता याबाबत महापालिकेने त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.
  • टेंभुर्णी येथे अनेक खत कारखाने असून त्यात भेसळ होत असल्याचा संशय असल्याने प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी,
  • टेंभुर्णी बस स्थानकावरील अतिक्रमणे काढण्याची मागणी, मोहोळ येथे क्रीडा संकुल उभारण्याची मागणी

 

Web Title: Transport minister pratap sarnaik visits solapur inspects checkposts political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • political news
  • pratap sarnaik
  • Solapur News

संबंधित बातम्या

नवनियुक्त राज्यपालांची उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट; व्यक्त केल्या सदिच्छा
1

नवनियुक्त राज्यपालांची उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट; व्यक्त केल्या सदिच्छा

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका
2

वर्ध्यात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; काँग्रेससह इतर पक्षांना झटका

Top Marathi News today Live : राज्यामध्ये पावसाची संततधार सुरु, पर्वतीय भागात पावसाचा अंदाज
3

Top Marathi News today Live : राज्यामध्ये पावसाची संततधार सुरु, पर्वतीय भागात पावसाचा अंदाज

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल…; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास
4

कौशल्य विकासातूनच भारत आत्मनिर्भर बनेल…; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.