Deputy Speaker Neelam Gorhe met the newly appointed Governor Acharya Devvrat
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. गुजरातचे राज्यपाल असलेल्या आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. मुंबई येथील राजभवनमधील दरबार हॉलमध्ये पार पडला. सकाळी ११.०० वाजता झालेल्या या शपथविधी प्रसंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
Deputy Speaker Neelam Gorhe met the newly appointed Governor Acharya Devvrat political news
या वेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू छत्रपती पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. नव्या जबाबदारीसाठी त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे कार्य फलदायी ठरो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यपाल शपथविधी सोहळा ही घटना लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाची पायरी असल्याचे प्रतिपादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याच्या शासनव्यवस्थेत नवी ऊर्जा आणि दिशा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी राज्यातील विविध नेते उपस्थित असून शासकीय मानवंदना देत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी केलेला धोती लूक सर्वांचे लक्ष वेधत होता.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सी पी राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार हा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी ते गुजरातहून मुंबईमध्ये रेल्वेने आले. आचार्य देवव्रत यांनी सपत्नीक हा प्रवास केला असून याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
आचार्य देवव्रत मूळचे हरियाणाचे आहेत. त्यांचे जीवन आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या शिकवणींनी प्रभावित आहे. रोहतकमध्ये जन्मलेले आचार्य देवव्रत हे गुजरातमधील प्रतिष्ठित विद्यापीठ गुजरात विद्यापीठाचे कुलपती देखील आहेत. राज्यपाल होण्यापूर्वी देवव्रत हे कुरुक्षेत्रातील एका गुरुकुलचे प्राचार्य होते. सरकारने त्यांना प्रथम हिमाचलचे राज्यपाल बनवले. त्यानंतर त्यांना गुजरातची जबाबदारी देण्यात आली. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या संभाव्य नावांमध्ये त्यांचाही उल्लेख होता. नैसर्गिक शेतीला एक मिशन बनवण्यात गुंतलेले आचार्य देवव्रत अतिशय सात्विक जीवन जगतात. त्यांच्या पुढाकाराने गुजरातमधील हलोल येथे देशातील पहिले नैसर्गिक कृषी विद्यापीठ देखील सुरू झाले आहे. अलीकडेच आचार्य देवव्रत या विद्यापीठाला भेट देण्यासाठी आले होते. ६६ वर्षीय आचार्य देवव्रत ऑगस्ट २०१५ मध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झाले.