Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today : विदर्भात पावसाचा हाहा:कार; अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Marathi Breaking News Live Updates : देश-विदेशातील घडामोडींसह राजकारण, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील अनेक ताज्या घडामोडी मिळवता येतील एका क्लिकवर...

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2025 | 08:23 PM
Top Marathi News Today : विदर्भात पावसाचा हाहा:कार; अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Top Marathi News Today : विदर्भात पावसाचा हाहा:कार; अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking News Live Updates :  पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. नद्या आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पूल आणि रस्ते कोसळले आहेत. तर डझनभर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नागपूरच्या कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यात आलेल्या पुरात 2 जण वाहून गेले आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला. दुसरीकडे, कामठी तालुक्यातील नाग नदीकाठच्या वस्त्यांमध्ये अडकलेल्या 70 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.

The liveblog has ended.
  • 10 Jul 2025 08:00 PM (IST)

    10 Jul 2025 08:00 PM (IST)

    Devendra Fadnavis: आता शहरी नक्षलवाद खिळखिळा होणार! विधानसभेत ‘जनसुरक्षा विधेयक’ मंजूर

    मुंबई: सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन मुंबईत सुरु आहे. दरम्यान आज अधिवेशनात राज्य सरकारकडून जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आले. दरम्यान आवाजी मतदानाने जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. अखेर जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्र विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभेत मांडले होते. अखेर हे विधेयक मंजूर झाले आहे.

  • 10 Jul 2025 07:22 PM (IST)

    10 Jul 2025 07:22 PM (IST)

    मस्ती बेतली असती जीवावर! शेकडो भुतांचा घोळका लागला मागे… आजही भरते त्यांची जत्रा “जो गेला, तो खपला”

    आहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोटाशा गावात रंजन आणि साहिल उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी आले होते. दोघे तसे मुंबईला राहणारे. दोघे भावंडं नसली तरी एकाच गावातली घट्ट मित्र! सोबत राहणे, खाणे, फिरणे… अगदी लहानपानपासून दोघे जण प्रत्येक काम अगदी सोबतच करतात. परीक्षा संपवून दोघे जण गावी आले होते. साहिल तर दिवस असो वा रात्र, रंजनचा घर काही त्याला सुटत नव्हता. दोघे दिवस रात्र खेळात असत. एकेदिवशी, रंजनच्या आजीने दोघांना ठणकावून सांगितली की माळरानावर जाऊ नका! आणि रात्रीच्या वेळी तर मुळीच फिरकू नका. तिथे भुतांची जत्रा भरते. रंजन आणि साहिल तसे हार्ड कोर मुंबईकर! त्यांना या गोष्टी ऐकून नवल वाटले आणि विश्वास बसे ना!

  • 10 Jul 2025 06:59 PM (IST)

    10 Jul 2025 06:59 PM (IST)

    मोठी बातमी! कपिल शर्माच्या कॅफेवर तुफान गोळीबार; कॅनडामधली घटना

    कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार कॅनडामध्ये घडला आहे. कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये एक नवीन कॅफे सुरु केला होता. त्याच कॅफेवर आता काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला आहे.

  • 10 Jul 2025 06:03 PM (IST)

    10 Jul 2025 06:03 PM (IST)

    पावसाच्या टार्गेटवर विदर्भ अन्…; पुढील काही दिवस ‘या’ जिल्ह्यांत तुफान बरसणार

    पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. कोकण विभाग, मराठवाडा, विदर्भ विभागात अत्यंत मुसळधार पाऊस सुरु आहे. कोकण विभागात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर हवामान विभागाने महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भात तर पावसाने कहर केला आहे. नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  • 10 Jul 2025 05:38 PM (IST)

    10 Jul 2025 05:38 PM (IST)

    Akkalkot : गुरूपौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

    गुरुपौर्णिमेनिमित्त येथील वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिरात येण्यासाठी एक रस्ता, बाहेर जाण्यासाठी एक रस्ता, दोन ठिकाणी पादत्राणे स्टैंड, मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्तिगीतांचे वादन, विशेष दर्शन रांगेचे नियोजन, पावसापासून संरक्षणाकरिता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्राशेड उभा करण्यात आला आहे. स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोट मध्ये जवळपास पाच लाख भाविक दाखल झाले आहेत, याचा आढावा घेतला आहे.

  • 10 Jul 2025 05:20 PM (IST)

    10 Jul 2025 05:20 PM (IST)

    Shrikant Shinde ED Notice : खासदार श्रीकांत शिंदेंना ईडीची नोटीस? मुलासाठी वडीलांनी अधिवेशन सोडत गाठली दिल्ली?

    राज्यातील काही नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. यामध्ये शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांचा समावेश आहे. संजय शिरसाट यांच्या मालमत्तेमध्ये झालेल्या वाढीवरुन त्यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी देखील दुजोरा दिला असून सिद्धांत शिरसाट यांच्या ‘विट्स हॉटेल’ची चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ते केवळ 67 कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप होत आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. असे असताना आता आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील ईडीची नोटीस आल्याची चर्चा आहे.

  • 10 Jul 2025 05:10 PM (IST)

    10 Jul 2025 05:10 PM (IST)

    Bihar Election 2025: बिहार मतदार पडताळणीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, एसआयआर राहणार सुरू

    बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) च्या निषेधार्थ गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, याचिकाकर्ते आणि निवडणूक आयोगाची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने एसआयआरला स्थगिती देण्यास नकार दिला. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला सांगितले की कागदपत्रांची यादी अंतिम नाही. न्यायालयाने आयोगाला आधार, मतदार कार्ड आणि रेशन कार्ड हे पुरावे म्हणून समाविष्ट करण्यास सांगितले, ज्याचा आयोगाने विरोध केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही तुम्हाला थांबवत नाही आहोत. तुम्हाला कायद्यानुसार काम करण्यास सांगत आहोत. न्यायालय आता २८ जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

  • 10 Jul 2025 04:55 PM (IST)

    10 Jul 2025 04:55 PM (IST)

    क्रिकेटपटू यश दयाल अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचले

    गाझियाबादमध्ये त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या खटल्याबाबत क्रिकेटपटू यश दयाल यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर यश यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यशविरुद्ध ६ जुलै रोजी गाझियाबादमधील इंदिरापुरम पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. बीएनएसच्या कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • 10 Jul 2025 04:45 PM (IST)

    10 Jul 2025 04:45 PM (IST)

    याचिकाकर्त्यांनी प्रस्तावित केलेल्या कागदपत्रांचा विचार करा

    बिहारमध्ये मतदार पडताळणीचे काम सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयात सिंघवी म्हणाले की आधार कार्ड स्वीकारले पाहिजे. ८७% कव्हरेज आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र आणि तिसरे रेशन कार्ड देखील स्वीकारले पाहिजे. यावर न्यायमूर्ती धुलिया यांनी आयोगाला सांगितले की याचिकाकर्त्यांनी प्रस्तावित केलेल्या कागदपत्रांचा तुम्ही विचार करावा.

  • 10 Jul 2025 04:35 PM (IST)

    10 Jul 2025 04:35 PM (IST)

    मध्य प्रदेश सरकार कृतीच्या स्थितीत

    मध्य प्रदेशातील पुलांच्या खराब डिझाइन आणि अपूर्ण बांधकाम प्रक्रियेवरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार कृतीच्या स्थितीत आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील पुलांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक जिल्ह्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. चौकशीसाठी तज्ञांची समिती देखील स्थापन केली जात आहे.

  • 10 Jul 2025 04:30 PM (IST)

    10 Jul 2025 04:30 PM (IST)

    आता शेतमजुरांनाही विशेष विमा योजना

    राज्यात आता शेतकऱ्यांसोबत शेतमुजरांनाही विशेष विमा योजना आणण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने घोषणा केली आहे. 1 कोटी 75 लाख शेतमजुरांना याचा थेट फायदा होणार आहे.

  • 10 Jul 2025 04:25 PM (IST)

    10 Jul 2025 04:25 PM (IST)

    इयत्ता पाचवी व आठवीचा शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर

    एकूण निकालामधील ३१ हजार ७८६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यात इयत्ता पाचवीमधील १६ हजार ६९३ विद्यार्थ्यांचा, तर आठवीतील १५ हजार ९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  • 10 Jul 2025 03:56 PM (IST)

    10 Jul 2025 03:56 PM (IST)

    मनसेचा बच्चू कडूंच्या पदयात्रेला पाठींबा; बाळा नांदगावकर

    शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण अशी 138 किलोमीटरची पदयात्रा काढलीये.दरम्यान या पदयात्रेला आणि शेतकऱ्यांच्या विविध मागणीला पाठींबा देण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदयात्रेत सहभागी होत पांठीबा दिला आणि सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं अस स्पष्ट मत त्यांनी यावेळी बोलून दाखविल.

  • 10 Jul 2025 03:21 PM (IST)

    10 Jul 2025 03:21 PM (IST)

    विधानपरिषद आहे की कुस्तीचा आखाडा? परबांना देसाई भिडले; म्हणाले, “बाहेर ये तुला…”

    मुंबई: राज्यात सध्या अनेक प्रकरणे घडताना दिसत आहेत. मराठी-हिंदी भाषेचा वाद सुरु आहे. काल आमदार संजय गायकवाड यांनी कँटीनमध्ये केलेली मारहाण अशा अनेक घटना घडत आहेत. दरम्यान सध्या राज्याचे अधिवेशन सुरु असून, या अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आहे. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून बोलताना आमदार परब यांनी तू गद्दारी केली असे शंभूराज देसाई यांना म्हटले. यावर शंभूराज देसाईसुद्धा चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. विधानपरिषदेत सुरु झालेली खडाजंगी विधानभवनाच्या बाहेर पाहायला मिळाली.

  • 10 Jul 2025 03:19 PM (IST)

    10 Jul 2025 03:19 PM (IST)

    गुरुपौर्णिमेनिमित्त साईनगरीत भक्तांची मांदियाळी, भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

    श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईंची नगरी फुलली असून आकर्षक फुलांच्या तसेच विद्युत रोषणाईने समाधी मंदिर परिसर फुलला आहे. याचबरोबर आज श्री साई बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.

  • 10 Jul 2025 03:17 PM (IST)

    10 Jul 2025 03:17 PM (IST)

    सिंधुदुर्गात किंजवडेमध्ये लोखंडी पूल कोसळला

    देवगड तालुक्यातील किंजवडे बाईतवाडी व खालची कदमवाडी यांना जोडणारा 'अन्नपूर्णा' नदीवरील साकव (लोखंडी पूल) कोसळला असून स्थानिक ग्रामस्थ या साकवाची डागडुजी करीत असतानाचही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. साकव (लोखंडी पूल) कोसळल्यामुळे बाईतवाडी व कदमवाडी या दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. या भागातील नागरिकांना आता नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

  • 10 Jul 2025 03:10 PM (IST)

    10 Jul 2025 03:10 PM (IST)

    खाजगी रुग्णालयाप्रमाणे सोयीसुविधा; चौक ग्रामीण रुग्णालय सर्वसामान्यांसाठी ठरतोय वरदान

    चौक बाजारपेठ व सभोवतालच्या 18 ते 20 वाड्या-वस्त्या, व आजूबाजूच्या 9 ते 10 गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले ग्रामीण रुग्णालय चौक हे परिसरातील रुग्णांसाठी जीवनरेषा किंवा संजीवनीच आहे असे म्हणावे लागेल. ग्रामीण रुग्णालय चौक येथील वैदयकीय अधिक्षक डॉ. सविता काळेल पदभार स्विकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे दिसून येते.मोहोपाडा रसायनीसह तालुक्यातील मागील अनेक रुग्णांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळाला आहे.

  • 10 Jul 2025 03:09 PM (IST)

    10 Jul 2025 03:09 PM (IST)

    केज तालुक्यात प्रभाग रचनेत विशिष्ट समाजाचा समावेश – राष्ट्रवादीचे दत्तात्रय ठोंबरे

    बीडच्या केज तालुक्यातील विडा जिल्हा परिषद गटात विशिष्ट समाजाच्या गावांना बाहेर काढून काही विशिष्ट समाजाच्या गावांचा समावेश केला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते दत्तात्रय ठोंबरे यांनी केला आहे.

  • 10 Jul 2025 02:43 PM (IST)

    10 Jul 2025 02:43 PM (IST)

    KD: The Devil चा अ‍ॅक्शनने भरलेला टीझर रिलीज

    ‘केडी द डेव्हिल’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ध्रुव सरजाच्या चित्रपटाचा टीझर इंटरनेटवर येताच व्हायरल झाला. चित्रपटाच्या टीझरमध्ये बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी लोकांचे लक्ष वेधले आहे. संजय दत्तची अ‍ॅक्शन इतकी जबरदस्त आहे की टीझर पाहणारा कोणीही स्वतःला ‘वाह’ म्हणण्यापासून रोखू शकणार नाही. चित्रपटाच्या टीझरबद्दल वापरकर्त्यांचे काय म्हणणे आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.

  • 10 Jul 2025 02:43 PM (IST)

    10 Jul 2025 02:43 PM (IST)

    स्कॉटलंडला हरवून पहिल्यांदाच मिळू शकते T20 विश्वचषकाचे तिकीट

    इटली विरुद्ध स्कॉटलंड : इटलीला २०२६ च्या टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते. हो… तुम्ही बरोबर वाचले आहे. फुटबॉल आणि टेनिससाठी प्रसिद्ध असलेला हा देश हळूहळू क्रिकेटच्या जगातही आपले नाव कमावत आहे. युरोप रीजनल फायनल क्वालिफायरमध्ये स्कॉटलंडला हरवल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळण्याची इटलीची आशा निर्माण झाली. तुम्हाला सांगतो की, २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होतील.

  • 10 Jul 2025 02:42 PM (IST)

    10 Jul 2025 02:42 PM (IST)

    आता गणेशोत्सवाचा खास सन्मान; फडणवीस सरकारची मोठी घोषणा

    काय म्हणाले मंत्री आशिष शेलार? 

    महाराष्ट्रात गणेशोत्सव 1893 साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. होता आणि त्या पद्धतीनेच चालू आहे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करीत आहे, त्याबद्दल आज विधानसभेत विविध मुद्दे स्पष्ट केले.

    देशात नाहीतर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटीबद्ध राहील. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सव बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला. पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचाय हे महायुतीचं सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजींच्या, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना, आलेल्या स्पिड ब्रेकरला बाजूला करण्याचे काम अतिशय शीघ्रतेने केले.

  • 10 Jul 2025 02:41 PM (IST)

    10 Jul 2025 02:41 PM (IST)

    जपानपासून ब्राझीलपर्यंत ‘या’ देशांवर ट्रम्पचा टॅरिफ बॉम्ब

    Trump Tariff Marathi News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्व देशांवर सातत्याने आपला टॅरिफ बॉम्ब टाकत आहेत. अवघ्या तीन दिवसांत अमेरिकेने २१ देशांवर टॅरिफ जाहीर केला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी, ट्रम्प यांचे टॅरिफ पत्र जपान-कोरियासह १४ देशांना पाठवण्यात आले आणि एका दिवसाच्या शांततेनंतर, बुधवारी ७ देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • 10 Jul 2025 02:40 PM (IST)

    10 Jul 2025 02:40 PM (IST)

    अनोळखी व्यक्तीशी नजर मिळवताय मग सावधान

    भिवंडी : एखाद्या अनोळखी व्यक्तीने पत्ता विचारल्यावर त्याला मदत करणं आता आपल्याच जीवावर बेतू शकतं. डोळ्यांनी हिप्नोटाईज करुन अपहरण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. माणकोली-डोंबिवली दरम्यानच्या पुलाजवळून अपहरण झालेला शाळकरी मुलगा थेट नवी दिल्लीत गजबजलेल्या सदर बाजारातील एका दुकानात सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या मुलाचे व्हॉट्स अ‍ॅपवरून लोकेशन सापडल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी थेट माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर कपिल पाटील यांनी तत्काळ नवी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पोलिसांसह मुलाचा शोध घेण्यास सांगितल्यानंतर, अवघ्या तासाभरात बाजारातील एका दुकानात मुलगा आढळला. व्हिडीओ कॉलवरून मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

  • 10 Jul 2025 02:39 PM (IST)

    10 Jul 2025 02:39 PM (IST)

    मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधूंचा राजकीय युतीचा घाट

    Mahavikas Aghadi broke : मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्णय दिल्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका या स्वबळावर लढण्याचा नारा हा राज्यातील पक्षांकडून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी सुरु असल्याचे दिसून येत असून यामध्ये कॉंग्रेस पक्ष एकटा पडल्याचे देखील दिसत आहे.

  • 10 Jul 2025 02:23 PM (IST)

    10 Jul 2025 02:23 PM (IST)

    भुताने झपाटलं म्हणून महिलेला मारहाण केली अन्

    कर्नाटकामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या आईला भुताने झपाटल्याचा संशयावरून मांत्रिकाकडे नेले. तिथे नियंत्रिक विद्या करणाऱ्या महिलेने भूत काढण्याच्या नावाखाली इतके मारहाण केली की तिचा तडफडत तडफडत मृत्यू झाला. ही मारहाण मुलासमोरच करण्यात आली आहे. ही घटना कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात घडली आहे. मृतकाचे नाव गीतम्मा आहे. याप्रकरणी तिघांविरुधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 10 Jul 2025 02:23 PM (IST)

    10 Jul 2025 02:23 PM (IST)

    डाळिंब सोलल्यानंतर साल फेकून न देता ‘या’ प्रकारे करा वापर

    त्वचेचे सौंदर्य कायम टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअर, महागड्या ट्रीटमेंट आणि इतरही अनेक उपाय केले जातात. मात्र तरीसुद्धा त्वचा चमकदार आणि सुंदर होत नाही. वाढत्या वयात त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेवरील तारुण्य कमी होऊन चेहऱ्यावर सतत सुरकुत्या येणे, त्वचा निस्तेज दिसणे किंवा चेहऱ्यावर वांग येऊ लागतात. त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. त्यात अतिशय आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंबाचे सेवन केल्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते आणि शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. लाल चुटुक डाळिंबाचे दाणे आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहेत. डाळिंब खाल्ल्यानंतर डाळिंबाच्या साली फेकून दिल्या जातात. मात्र या सालींमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात.

  • 10 Jul 2025 02:22 PM (IST)

    10 Jul 2025 02:22 PM (IST)

    CDAC कडून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना दिलासा

    CDAC मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. मुळात, डिझाईन इंजिनियर पदासाठी कार्य करण्यास इच्छुक असाल तर या भरतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. डिझाईन इंजिनियर तसेच सीनियर डिझाईन इंजिनियर या पदांसाठी रिक्त असणाऱ्या जागांना भरण्यासाठी या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 280 उमेदवार नियुक्त होऊ शकतात. जरी शेवटची तारीख 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर फार विलंब न करता या भरतीसाठी अर्ज करण्यात यावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे त्यामुळे अर्ज कर्त्यांनी सीडी एसीच्या cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

  • 10 Jul 2025 02:22 PM (IST)

    10 Jul 2025 02:22 PM (IST)

    लॉर्ड्सवर कोण वर्चस्व गाजवेल?

    भारतीय संघामध्ये जसप्रीत बुमराह याचे पुनरागमन होणार आहे, तर इंग्लडच्या संघामध्ये जोफ्रा आर्चर ४ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएल 2025 चा जोफ्रा आर्चर भाग होता पण तो काही प्रभावशाली कामगिरी या १८ व्या सिझनमध्ये करु शकला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आज म्हणजेच १० जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू होणार आहे. हा सामना १० जुलै ते १४ जुलै २०२५ दरम्यान खेळला जाईल.

  • 10 Jul 2025 02:21 PM (IST)

    10 Jul 2025 02:21 PM (IST)

    रशियाच्या मदतीने भारत कसा बनला अणु पाणबुडी महासत्ता?

    India nuclear submarine program : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांनी भारताला अत्याधुनिक सुखोई-५७ लढाऊ विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे. भारत-रशिया संबंध हा केवळ संरक्षण व्यवहारांचा भाग नसून, तो दशकानुदशकांचा विश्वास आणि सहकार्याचा दुवा आहे. विशेषतः भारत अणु पाणबुडी महासत्ता बनत असताना, रशियाचे योगदान निर्णायक ठरले.

  • 10 Jul 2025 02:21 PM (IST)

    10 Jul 2025 02:21 PM (IST)

    आपत्कालीन लॅंडिगदरम्यान पोलिस हेलिकॉप्टरचा नदीत कोसळून अपघात

    क्वालालंपूर : एक मोठी दुर्घटना घडली आहे. मेलेशियाच्या जोहोर राज्यात पोलिसांच्या हेलिकॉप्टरचा नदीत कोसळून भीषण अपघात झाला. आपत्कालीन लॅंडिग दरम्यान हा अपघात घडला. सुदैवाने विमानातील अधिकाऱ्यांना आणि क्रू मेंबर्सना वेळेत बाहेर काढण्यात आले, यामुळे कोणाचाही मृत्यू झाला नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायाला मिळत आहे.

  • 10 Jul 2025 01:52 PM (IST)

    10 Jul 2025 01:52 PM (IST)

    परागला येतेय पत्नी शेफालीची आठवण, पुन्हा एकदा भावुक होऊन शेअर केली पोस्ट

    अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दिवंगत अभिनेत्रीचे चाहते आणि प्रियजन अजूनही या दुःखातून बाहेर पडू शकलेले नाहीत. तसेच, शेफालीचा पती, अभिनेता पराग त्यागी देखील पत्नी गमावल्याच्या दुःखात आहे. पराग त्यागी किती दुःखातून जात आहे याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. पत्नी गमावण्याचे दुःख काय असते हे सध्या फक्त परागलाच माहिती आहे. परागने पुन्हा शेफालीच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

  • 10 Jul 2025 01:48 PM (IST)

    10 Jul 2025 01:48 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी घेणार निवृत्ती

    शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यावरुन चर्चेमध्ये असतात. खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच रिटायरमेंट घेणार असल्याचे ते म्हणाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नियमांची आठवण करुन देत आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा दाखला देत खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केलं आहे.

  • 10 Jul 2025 01:40 PM (IST)

    10 Jul 2025 01:40 PM (IST)

    इंग्लिश संघाचा शुभमन गिलला रोखण्यासाठी प्लान तयार! हा गोलंदाज बेन स्टोक्सचे शस्त्र

    भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. भारताच्या फलंदाजांनी दोन्ही सामन्यामध्ये दमदार खेळ दाखवला. संघाच्या फलंदाजांना इंग्लिश गोलंदाजांना रोखणे कठीण झाले होते. भारताचा नवा कर्णधार शुभमन गिल याने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते तर दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यामध्ये त्याने आणखी एक शतक झळकावले. याआधी भारताच्या संघाला रोकण्यासाठी इंग्लडच्या संघाने नवा प्लान तयार केला आहे.

  • 10 Jul 2025 01:33 PM (IST)

    10 Jul 2025 01:33 PM (IST)

    अफगाणिस्तानात सहा वर्षांच्या चिमुकलीचे लग्न ; वराचे वय जाणून बसेल झटका

    एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अफगाणिस्तानमध्ये एका ६ वर्षाच्या चिमुकलीचे ४५ वर्षाच्या अफगाण पुरुषाशी लग्न करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. सध्या या घटनेवर संपूर्ण जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकास्थित अफगाण मीडिया आउटलेट Amu.tv ने हे वृत्त दिले आहे.यानंतर तालिबान सरकारमध्ये गोंधळ उडाला आहे. यावर कारवाई म्हणून संबंधित मुलीच्या आईवडिलांना अटक करण्यात आली आहे. तसेच वरालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान सरकारने मुलीला वयाच्या ९ व्या वर्षी तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या हेलमड प्रांतात ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • 10 Jul 2025 01:26 PM (IST)

    10 Jul 2025 01:26 PM (IST)

    निवडणूक आयोगाचा नवा खेळ! बिहार मतदार यादी दुरुस्ती प्रकरणावर ‘सर्वोच्च’ सुनावणी

    बिहारमधील मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी ही सर्वासमावेशक आहे, असा खुलासा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांने मंगळवारी केला. या फेरतपासणीला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावर आज (10 जुलै) सुनावणी होणार आहे. बिहार निवडणुकीपूर्वी मतदार यादीच्या विशेष सघन पुनर्रचना विरोधात विरोधी महाआघाडीचे नेतेही ९ जुलै रोजी रस्त्यावर उतरले आणि रस्ते अडवले. बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, डाव्या पक्षाचे दीपांकर भट्टाचार्य यांसारखे वरिष्ठ नेतेही या निषेधात सहभागी झाले होते. रस्त्यावर विरोधकांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर आता कायदेशीर लढाईची पाळी आली आहे.

  • 10 Jul 2025 01:25 PM (IST)

    10 Jul 2025 01:25 PM (IST)

    आज येणार आयटी कंपनीचे निकाल, शेअरच्या किमतीत चढ-उतार, जाणून घ्या

    देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीचे निकाल आज म्हणजेच गुरुवारी (१० जुलै) जाहीर करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच शेअरमध्ये हालचाल दिसून येत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे अर्धा टक्का वाढ झाल्यानंतर, तो लाल चिन्हावर व्यवहार करत आहे.सकाळी ११:१० वाजता, BSE वर TCS चे शेअर्स ३३७९.०५ रुपयांवर व्यवहार करत होते, ज्यामध्ये ५.३० रुपये किंवा ०.१६ टक्के घट झाली. गुंतवणूकदार निकालांपूर्वी कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळत आहेत. मंद जागतिक संकेत आणि ट्रम्प टॅरिफबद्दलच्या अनिश्चिततेमुळे बाजार मर्यादित श्रेणीत व्यवहार करत आहे.

  • 10 Jul 2025 01:18 PM (IST)

    10 Jul 2025 01:18 PM (IST)

    शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार? आयकर विभागाने बजावली नोटीस

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती खुद्द शिरसाट यांनी दिली आहे. आयकर विभागाच्या नोटिशीमुळे राजकीय वतुर्ळात एकच चर्चा सुरु आहे.मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या ‘विट्स हॉटेल’ची चर्चा सुरु आहे. छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत 110 कोटी रुपये असताना, ते केवळ 67 कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप होत आहे. याप्रकरणाच्या चौकशीची मागणी विरोधकांकडून केली जात होती. असे असताना आता आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.

  • 10 Jul 2025 01:10 PM (IST)

    10 Jul 2025 01:10 PM (IST)

    कॅन्टोन्मेंट महापालिकेत? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज निर्णय होण्याची शक्यता

    पुणे महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असतानाच शहरातील पुणे व खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील नागरी परिसर महापालिकेत विलीनीकरण करण्याच्या कामाला गती दिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी (आज) मुंबईमध्ये कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक होत आहे. या बैठकीमध्ये कॅन्टोन्मेंटच्या विलीनीकरणाबाबत ठोस निर्णय होणार का? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटसह राज्यातील अन्य कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसर संबंधित कॅन्टोन्मेंटजवळील स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीनीकरण करण्यासंदर्भात मागील चार ते पाच वर्षांपासून चर्चा सुरू आहे.

  • 10 Jul 2025 01:01 PM (IST)

    10 Jul 2025 01:01 PM (IST)

    गोलान हाइट्सच्या बदल्यात सत्ता राखणार?

    सीरियाचे नवे राजकीय नेते अल-शारा यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हनेग्बी यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीमुळे पश्चिम आशियातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेबनीज वृत्तसंस्था ‘अल मायादीन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही उच्चस्तरीय चर्चा यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्या उपस्थितीत झाली.

  • 10 Jul 2025 12:55 PM (IST)

    10 Jul 2025 12:55 PM (IST)

    दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती

    महाराष्ट्र विकासासंदर्भात एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली. दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई, महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणणं ही आमची जबाबदारी आहे, असंही सामंत म्हणाले.

  • 10 Jul 2025 12:45 PM (IST)

    10 Jul 2025 12:45 PM (IST)

    खासदार भुमरेंच्या भावजयसाठी मद्य परवान्याची जलद प्रक्रिया

    खासदार भुमरेंच्या भावजयसाठी मद्य परवान्याची जलद प्रक्रिया करण्यात आल्याचा आरोप आहे. मद्य परवाना ट्रान्सफर प्रक्रिया वायूवेगात राबवल्याचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठातील याचिकेमुळे फाईलचा वेगवान प्रवास समोर आला आहे. त्यामुळे 2023 मधील प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे.

  • 10 Jul 2025 12:41 PM (IST)

    10 Jul 2025 12:41 PM (IST)

    शेअर बाजाराने गमावली चमक, सेन्सेक्स-निफ्टी घसरले

    देशांतर्गत शेअर बाजारातील सुरुवातीचा उत्साह आता कमी झाला आहे. सेन्सेक्स २२३ अंकांनी घसरून ८३३१२ वर पोहोचला आहे. तर निफ्टी ६० अंकांच्या घसरणीसह २५४१५ वर आहे. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या शेअर्समध्ये भारती एअरटेल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा हे सर्वाधिक तोट्यात आहेत. तर मारुती, इटरनल आणि टाटा स्टील हे सर्वाधिक तोट्यात आहेत.

    (सविस्तर बातमी)

  • 10 Jul 2025 12:40 PM (IST)

    10 Jul 2025 12:40 PM (IST)

    संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस

    संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस बजावण्यात आली आहे.

  • 10 Jul 2025 12:35 PM (IST)

    10 Jul 2025 12:35 PM (IST)

    हैदराबादमध्ये ईडीकडून 29 सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल

    हैदराबादमध्ये ईडीकडून 29 सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकाश राज, विजय देवरकोंडा, राणा डग्गुबत्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सट्टेबाजीच्या अॅपशी संबंधित प्रकरणात हे गुन्हे दाखल झाले आहेत. हैदराबादच्या सायबराबाद पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

  • 10 Jul 2025 12:33 PM (IST)

    10 Jul 2025 12:33 PM (IST)

    मुंबईत ईस्टर्न फ्री-वेवर प्रचंड वाहतूक कोंडी

    मुंबईत ईस्टर्न फ्री-वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. चेंबूर ते वडाळापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत.

  • 10 Jul 2025 12:25 PM (IST)

    10 Jul 2025 12:25 PM (IST)

    शहापूरमध्ये मुख्याध्यापिकेला अटक, सभागृहात माहिती

    शहापूरमध्ये मुख्याध्यापिकेने मुलींना विवस्त्र केल्याप्रकरणी सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी आवाज उठवला. त्यानंतर सदर मुख्याध्यापिकेला अटक केल्याची आणि पुढे कडक कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले.

  • 10 Jul 2025 12:20 PM (IST)

    10 Jul 2025 12:20 PM (IST)

    सिंदूर उड्डाणपुलाचे आज लोकार्पण

    मुंबई – दक्षिण मुंबईतील पूर्व – पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला पूर्वीचे कर्नाक ब्रिजचे नाव आता सिंदूर करण्यात आले आहे. या उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार.

  • 10 Jul 2025 12:17 PM (IST)

    10 Jul 2025 12:17 PM (IST)

    चांदवडच्या राहूड घाट परिसरात बिबट्या अखेर जेरबंद

    नाशिक च्या चांदवड तालुक्यातील राहूडगाव,कळंमधरी आणि घाट परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्याला जे्रबंद करण्यात वन विभागाला यश आले असून,एका पोल्ट्री फार्म जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या आज सकाळी अडकला. गेल्या आठवड्या या बिबटयाने एका महिलेवर हल्ला करून तीला गंभीर जखमी केले होते शिवाय काही जनावरांचा देखील बळी घेतला होता त्यामुळे ग्रामस्थ भयभीत होते, मात्र आज बिबट्याला पकडण्यात आल्याचे पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.

  • 10 Jul 2025 12:15 PM (IST)

    10 Jul 2025 12:15 PM (IST)

    माजी सैनिक चंदू चव्हाणला पालिका कर्मचाऱ्यांकडून मारहाण

    पाकिस्तानच्या कैदेत राहिलेले आणि सर्जिकल स्ट्राइकवेळी चर्चेत आलेले माजी सैनिक चंदू चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. धुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप करत त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 10 Jul 2025 11:27 AM (IST)

    10 Jul 2025 11:27 AM (IST)

    गायकवाडांना शिळं अन्न दिलेल्या कॅन्टीनचा परवाना रद्द

    शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना शिळं अन्न दिलेल्या कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यामुळे गायकवाड यांनी मारहाण केली अन् परवाना कॅन्टीनचा रद्द झाल्याचे उघडकीस आले आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports entertainment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • Breaking News
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
2

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात
3

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.