Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

Chhatrapati Sambhajinagar: "तुझ्यामुळे मला ५० लाखांची लॉटरी लागली..." असे सांगून खाऊ घातला विषारी पेढा! संभाजीनगरमधील या भयानक ब्लॅकमेलिंगच्या प्रकाराने हादरले शहर...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 16, 2026 | 09:10 AM
Chhatrapati Sambhajinagar: "लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्..." ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

Chhatrapati Sambhajinagar: "लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्..." ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

Follow Us
Follow Us:
  • ओळखीचा गैरफायदा घेत विवाहितेला पेढ्यातून गुंगीचे  दिले औषध
  • व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत त्याने वारंवार अत्याचार केला
  • पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar: शहरातील छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका ओळखीच्या नराधमाने विवाहितेला पेढ्यातून गुंगीचे औषध देत तिच्यावर अमानुष अत्याचार केला. तसेच बेशुद्ध अवस्थेतील कृत्याचे व्हिडिओ काढून त्याआधारे तब्बल दोन महिने महिलेला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. अखेर आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला, ज्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik Case: अशोक खरात प्रकरणाची पुनरावृत्ती? “पती दोन महिन्यांत मरेल! भोंदूबाबाने “प्रेमविवाह मोडण्यासाठी  रचला काळाकुट्ट कट!

काय आहे नेमकी घटना?

मयूर दिलीपचंद कासलीवाल (वय ३५, रा. सिडको एन-२, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या पती आणि दोन मुलांसह राहते. दोन-तीन वर्षांपूर्वी मुलांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी ती सिडको एन-२ येथील ‘प्रो. मयूर मल्टिसर्व्हिसेस’ येथे गेली होती, तिथेच मयूरसोबत तिची ओळख झाली होती.

२४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना मयूर तिच्या घरी आला. “तुझ्या पायगुणामुळे मला ५० लाखांची लॉटरी लागली आहे,” असे गोड बोलून त्याने तिला आनंदाने पेढा खाऊ घातला. हा पेढा खाल्ल्यानंतर अवघ्या ५ ते ७ मिनिटांतच महिला बेशुद्ध पडली. जेव्हा तिला होश आला, तेव्हा ती बेडवर होती आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचे तिच्या लक्षात आले.

हेही वाचा:  Abandoned Baby: आईने जगात येताच सोडलं, पण ‘देवदूत’ बनून आले डॉक्टर! रुग्णालयात नवजात बाळाची थरारक जगण्याची लढाई…

व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग आणि टीव्हीची नासधूस

नराधम मयूरने गुंगीकारक पदार्थ देऊन केलेल्या कृत्याचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि पतीसह मुलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याने २४ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर दरम्यान पीडितेवर वारंवार अत्याचार केला.

दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी आरोपी पुन्हा घरी आला असता पीडितेने त्याला घरに来ण्यास मज्जाव केला आणि पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. यावर संतापलेल्या नराधमाने घरातील टीव्ही फोडला आणि जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला.

पतीने दिला धीर, पोलिसांत गुन्हा दाखल

सततच्या या ब्लॅकमेलिंगला आणि त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला रडत-रडत सांगितला. तिच्या पतीने तिला धीर दिला आणि त्यानंतर तिने छावणी पोलीस ठाणे गाठून आरोपी मयूर कासलीवालविरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदवली. याप्रकरणी छावणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली?

    Ans: छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

  • Que: आरोपीने महिलेला कशाच्या माध्यमातून गुंगी आणली?

    Ans: आरोपीने "लॉटरी लागली" असे सांगून खाऊ घातलेल्या पेढ्यातून महिलेला गुंगीचे औषध दिले.

  • Que: आरोपीची महिलेसोबत कशी ओळख झाली होती?

    Ans: काही वर्षांपूर्वी मुलांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी महिला आरोपीच्या दुकानावर गेली होती, तेव्हा त्यांच्यात ओळख झाली होती

Web Title: Chhatrapati sambhaji nagar cantonment police station mayur kasliwal case sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • crime news
  • Marathi News

संबंधित बातम्या

घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले
1

घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले

High Paying Jobs: टेक जायंट्समध्ये काम करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! मोठ्या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना कसा मिळतो जॉब?
2

High Paying Jobs: टेक जायंट्समध्ये काम करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! मोठ्या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना कसा मिळतो जॉब?

Self vs Traditional Publishing: लेखक बनण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या भारतात पुस्तक पब्लिशिंगचा संपूर्ण खर्च
3

Self vs Traditional Publishing: लेखक बनण्याचे स्वप्न पाहत आहात? जाणून घ्या भारतात पुस्तक पब्लिशिंगचा संपूर्ण खर्च

First Woman CJI of India: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इतिहासाची सुवर्णपानं लिहायला सज्ज जस्टिस बीवी नागरत्ना; किती शिक्षित आहेत?
4

First Woman CJI of India: वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून इतिहासाची सुवर्णपानं लिहायला सज्ज जस्टिस बीवी नागरत्ना; किती शिक्षित आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.