Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today: आज ९ जुलै ‘भारत बंद’: कामगार आणि शेतकरी संघटनांचा एकत्रित संप

Marathi breaking live marathi

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 09, 2025 | 07:07 PM
Top Marathi News Today: आज ९ जुलै ‘भारत बंद’: कामगार आणि शेतकरी संघटनांचा एकत्रित संप
Follow Us
Close
Follow Us:

Marathi Breaking news live updates: केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त व्यासपीठाने  आज (९ जुलै)  ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. देशभरात ‘भारत बंद’ला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की सरकारची धोरणे कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिणी आहेत.या संपामध्ये बँकिंग, वाहतूक, टपाल सेवा, कोळसा खाण आणि बांधकाम क्षेत्रातील सुमारे २५ कोटी कर्मचारी व ग्रामीण कामगार सहभागी झाले आहेत. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.शाळा, महाविद्यालये व खाजगी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता आहे.मात्र वाहतूक, बँकिंग आणि टपाल सेवा या क्षेत्रांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे सामान्य जनजीवनावर परिणाम होऊ शकतो.

 

 

The liveblog has ended.
  • 09 Jul 2025 06:55 PM (IST)

    09 Jul 2025 06:55 PM (IST)

    निळ्या ड्रमनंतर आता पोत्यात सापडला मृतदेह

    पंजाबमधील लुधियानामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लुधियानामधील फिरोजपूर रोडवर, मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी एका मुलीचा मृतदेह पोत्यात फेकून दिला. भरदिवसा, निर्भयपणे, दोघेही मृतदेह दुचाकीवर पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकून देत होते. तेथील रस्त्यावरील विक्रेत्याने त्यांना पोत्यात काय आहे असे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की त्यात कुजलेले आंबे आहेत. मृताची ओळख पटवली जात आहे.

  • 09 Jul 2025 06:24 PM (IST)

    09 Jul 2025 06:24 PM (IST)

    सैन्याच्या शौर्याला अनोखी सलामी; आता मुंबईतील ‘या’ पुलाचे झाले ‘सिंदूर’ नामकरण

    मुंबई : भारतीय सैन्याने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्याची ताकद जगाला दाखवून दिली आहे. पहलगाम हल्ल्याचे उत्तर ऑपरेशन सिंदूर करुन नव्या भारताच्या हिंमतीची जाणीव करुन दिली. भारतीय सैन्याच्या या ऑपरेशनवरुन अनेकांनी त्या काळामध्ये जन्मलेल्या आपल्या मुलांची नावे देखील हटके ठेवली आहेत. आता भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून मुंबईतील एका पुलाला सिंदूर असे नाव देण्यात येणार आहे. या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

  • 09 Jul 2025 05:53 PM (IST)

    09 Jul 2025 05:53 PM (IST)

    राजकुमार- पत्रलेखा देणार लवकरच 'गोड बातमी'

    राजकुमार राव आणि पत्रलेखा या प्रसिद्ध कपलने नोव्हेंबर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा आई- बाबा होणार आहे. या कपलने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना 'गोड बातमी' दिली आहे. लवकरच या प्रसिद्ध कपलच्या घरी पाळणा हलणार आहे. पत्रलेखाने चाहत्यांना 'गुड न्यूज' दिल्यानंतर चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 05:36 PM (IST)

    09 Jul 2025 05:36 PM (IST)

    Hero Vida VX2 च्या किमतीत कपात, नवीन किंमत वाचाल तर आजच बुक कराल

    भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला देखील चांगली मागणी आहे. अशातच जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Hero मोटॉरकॉर्पने नुकतेच Vida VX2 च्या किमतीत कपात केली आहे. हिरो मोटोकॉर्पच्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड विडाने अलीकडेच VX2 लाँच केली आहे आणि त्याच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हिरो विडाच्या VX2 Plus स्कूटरची किंमत 7 ते 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. VX2 Go ची किंमतही 14500 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

     

  • 09 Jul 2025 05:13 PM (IST)

    09 Jul 2025 05:13 PM (IST)

    स्नेहलता वसईकरचा जबरदस्त कमबॅक, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत साकारणार दमदार भूमिका

    ‘सन मराठी’ वाहिनीवर १४ जुलैपासून ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना दिसणार आहे. मालिकेच्या प्रत्येक प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून उत्सुक होऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मालिकेत तेजा-वैदही यांच्यासह आणखी एक दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री स्नेहलता वसईकर या मालिकेत ‘माईसाहेब’ भूमिकेत नव्या पात्रासह प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

  • 09 Jul 2025 05:02 PM (IST)

    09 Jul 2025 05:02 PM (IST)

    ‘पाच वर्ष खासदार असूनही मराठीचा ‘म’ बोलता येत नाही…’, शिवसेना महिला आघाडीकडून चतुर्वेदींना बालभारती पाठ्यपुस्तकाची भेट

    मुंबईत शिक्षण घेतलेल्या मात्र मराठीचा म देखील बोलू न शकणाऱ्या उबाठा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेना महिला आघाडीने मराठी शिकण्यासाठी इयत्ता पहिलीचे मराठी बालभारती पाठ्यपुस्तक भेट म्हणून पाठवले आहे. आधी खासदारांना, आमदारांना आणि नेत्यांना मराठी शिकवावे आणि मग मराठीचा कैवार आलेला आहे हे दाखवावे, अशी घणाघाती टीका शिवेसना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उबाठावर केली. चतुर्वेदी यांनी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून मराठीचे धडे गिरवावेत आणि मराठी बोलायला शिकावे, असा टोला म्हात्रे यांनी यावेळी लगावला.

  • 09 Jul 2025 04:57 PM (IST)

    09 Jul 2025 04:57 PM (IST)

    'लाखो रुपयांसह आयफोन..', लैंगिक शोषणाच्या आरोपांवर यश दयालने सोडले मौन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आणि भारतीय खेळाडू यश दयालने त्याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांवर अखेर मौन सोडले. दयालकडून आता त्याच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर चोरीचा आरोप लावला आहे.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

  • 09 Jul 2025 04:50 PM (IST)

    09 Jul 2025 04:50 PM (IST)

    वेदांता ग्रुपवर आर्थिक हेराफेरी आणि दिवाळखोरीचा आरोप

    शॉर्ट-सेलर व्हाईसरॉय रिसर्चने बुधवारी यूकेस्थित वेदांता रिसोर्सेस लिमिटेड (व्हीआरएल) विरुद्ध एक स्फोटक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात कंपनीची आर्थिक स्थिती, कर्ज धोरण आणि कॉर्पोरेट प्रशासन याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हाईसरॉय म्हणाले की त्यांनी वेदांता रिसोर्सेसचे कर्ज कमी केले आहे आणि समूहाची संपूर्ण रचना “आर्थिकदृष्ट्या अस्थिर आणि ऑपरेशनलदृष्ट्या कमकुवत” असल्याचे वर्णन केले आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 04:45 PM (IST)

    09 Jul 2025 04:45 PM (IST)

    ‘लवकरच जेवणासाठी घरी येतो’ म्हणत जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या

    गेल्या काही दिवसांमध्ये अटल सेतूवर वारंवार होणाऱ्या आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहेत. अश्यातच आता अटल सेतूवरून एका डॉक्टरने उडी मारून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली असून अद्याप या डॉक्टरचा शोध लागलेला नसल्याची माहिती आहे. आत्महत्या करणारा डॉक्टर हा जे.जे. रुग्णालयात कार्यरत आहे.  डॉ. ओंकार भागवत कवितके (वय 32) असे असे अटल सेतूवरून खाडीमध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

  • 09 Jul 2025 04:40 PM (IST)

    09 Jul 2025 04:40 PM (IST)

    कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप

    कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या काही काळापासून कर्नाटकमध्ये नेतृत्त बदलाची मागणी होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू  लागली आहे. हा वाद शांत करण्यासाठी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी तातडीने कर्नाटक गाठले आणि डी.के शिवकुमार यांच्या शेजारी बसून माध्यमांशी संवाद साधला.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 04:35 PM (IST)

    09 Jul 2025 04:35 PM (IST)

    राज्यात पावसाचा हाहा:कार; कोकणाला धू-धू धुतलं; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

    महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट् भागात अति ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 04:30 PM (IST)

    09 Jul 2025 04:30 PM (IST)

    समलैंगिक संबंधाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी; प्रसिद्ध सीएने विष प्राशन करून संपवलं जीव

    मुंबईच्या वाकोला परिसरातून एका अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध सीएने विष प्रश्न करून टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. समलैंगिक संबंधाची अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत दोघांनी तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी उकळली. याच सततच्या त्रासाला कंटाळून एका चार्टर्ड अकाउंटंटने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या सीएचे नाव राज मोरे (वय ३२) आहे. या प्ररकरणी वाकोला पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

  • 09 Jul 2025 04:25 PM (IST)

    09 Jul 2025 04:25 PM (IST)

    लैंगिक शोषणाच्या आरोपांवर यश दयालने सोडले मौन

    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आणि भारतीय खेळाडू यश दयालच्या अडचणीत वाढ झाली आहे. गाझियाबादमधील एका महिलेकडून त्याच्यावर लग्नाचे आश्वासन दाखवून फसवणूक आणि शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेने यशविरुद्ध पोलिस तक्रार देखील दाखल केली आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 04:20 PM (IST)

    09 Jul 2025 04:20 PM (IST)

    ऐकावं ते नवलचं! मुलाने सावत्र आईसोबत पळून जाऊन केलं लग्न

    आई आणि मुलाचे नाते खूप पवित्र असतं. परंतु काही लोक या नात्यालाही कळिमा फासण्यास पुढेमागे पहात नाहीत. हरियाणातील नुह येथूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. या परिसरात एका माणसाच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला म्हणून त्याने दुसरे लग्न केलं. पण त्याचा मुलगा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत पळून गेल्याचे समजताच डोक्याला हात लावतो. या घटनेनंतर पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे, संपूर्ण गावात या प्रेमकथेची चर्चा सुरू आहे.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 04:15 PM (IST)

    09 Jul 2025 04:15 PM (IST)

    Akola Crime: अकोला हरदरलं ! गतिमंद अल्पवयीन मुलीचा चालत्या ट्रेनमध्ये बलात्कार

    अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात फिरण्यासाठी आलेल्या एका १६ वर्षीच्या अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला रेल्वेने अकोल्याला नेत असतांना नराधमाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर त्याने अकोला स्थानकात तिला सोडले आणि पसार झाला. यानंतर अकोला रेल्वे पोलिसांची नजर या मुलीवर पडली. त्यांनी पीडित मुलीची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला.

  • 09 Jul 2025 04:10 PM (IST)

    09 Jul 2025 04:10 PM (IST)

    RCFL मध्ये 74 पदांसाठी भरती; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज

    नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबईत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत ऑपरेटर (केमिकल ट्रेनी), ज्युनियर फायरमॅन ग्रेड-III, नर्स ग्रेड-II आदी पदांसाठी एकूण 74 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत संकेतस्थळ www.rcfltd.com वर जाऊन 25 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 04:05 PM (IST)

    09 Jul 2025 04:05 PM (IST)

    संजय गायकवाड यांना मारहाणीबद्दल ना दुःख ना पश्चात्ताप…

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आले आहेत. संजय गायकवाड हे यांनी त्यांना मिळालेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरुन आकाशवाणी आमदार निवासामध्ये जोरदार धुमाकूळ घातला. काल (दि.08) रात्री झालेल्या या प्रकारानंतर त्यांचा कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरुन त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. मात्र आमदार गायकवाड यांना त्यांच्या मारहाणीचा कोणताही पश्चत्ताप नसल्याचे दिसून आले आहे. मात्र या घटनेवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले आहेत.

    (सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा)

  • 09 Jul 2025 04:00 PM (IST)

    09 Jul 2025 04:00 PM (IST)

    Sangli Crime: मिरजेत नशेच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; सापळा रचत अल्पवयीनसह चौघांना अटक

    सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत अल्पवयीन संशयितासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाख 73 हजार रुपये किमतीचे 928 नशेच्या पोलिसांनी ही कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली आहे.

  • 09 Jul 2025 03:50 PM (IST)

    09 Jul 2025 03:50 PM (IST)

    गजबजलेल्या रस्त्यावर भरदुपारी तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

    अकोला : अकोला शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणानेच तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत २२ वर्षीय युनिट मॅनेजर म्हणून पीडिता कार्यरत आहे. याच कंपनीच्याच कर्मचाऱ्याने कारमध्ये ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी थेट आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारली.

  • 09 Jul 2025 03:42 PM (IST)

    09 Jul 2025 03:42 PM (IST)

    MLC 2025 मध्ये वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा अफलातून कारनामा; सामना न खेळताच मॅक्सवेलच्या टीमची अंतिम फेरीत धडक

    अमेरिकेत मेजर क्रिकेट लीग 2025 चा थरार सुरू आहे. जगभरातील क्रिकेटपटू या लीगमध्ये आपले कौशल्य दाखवत आहे. या स्पर्धेत एक अजब कारनामा बघायला मिळाला आहे. ग्लेन मॅक्सवेलची टीम वॉशिंग्टन फ्रीडम आणि फाफ डू प्लेसिसची टीम क्वालिफायर 1 मध्ये आमनेसामने येणार होती. परंतु पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. परिणामी  मॅक्सवेलची टीमने  एकही सामना न खेळता मेजर क्रिकेट लीग 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

  • 09 Jul 2025 03:40 PM (IST)

    09 Jul 2025 03:40 PM (IST)

    जिथे कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवली तिथूनच पोलिसांनी भाईंची ‘वरात’ काढली

    पुण्याच्या औंध भागात कोयत्याचा धाक दाखवत दहशहत माजविणाऱ्या सात जणांच्या टोळीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. केवळ इतकाच नाही केली तर ज्या ठिकाणाहून कोयत्याने हल्ला केला त्याच भागातून पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली.औंध भागात ७ जणांच्या टोळीने २८ जून रोजी 12.15 वाजता काही तरुणांवर कोयत्याने आणि काठ्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होत. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली आहे.

  • 09 Jul 2025 03:26 PM (IST)

    09 Jul 2025 03:26 PM (IST)

    बेळगावात एकाच कुटुंबाने एकत्रच प्यायलं विष; कारण अस्पष्ट

    बेळगाव शहरातून एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून एकाची स्थिती गंभीर आहे. मृतकांची नावे संतोष खुराडेकर (४४), सुवर्णा कुराडेकर आणि मंगला कुराडेकर अशी आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तीचे नाव सुनंदा कुराडेकर आहे. ही दुर्दैवी घटना बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात घडली आहे. या घटनेमुळे जोशीमाळा परिसरात खळबळ उडाली आहे.

  • 09 Jul 2025 03:05 PM (IST)

    09 Jul 2025 03:05 PM (IST)

    शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात, आकर्षक विद्युत रोषणाईने सजली साईनगरी

    शिर्डीत श्री गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असून आकर्षक विद्युत रोषणाईने साईनगरी सजली आहे. प्रथम दिवशी समाधी मंदिरात मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी वंदना गाडीलकर यांनी श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते. यावेळी सकाळी श्रींना विधिवत अभिषेक, महाआरती करण्यात आली. भाविकांनी देखील गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीत दर्शनासाठी येत आहे.

  • 09 Jul 2025 03:03 PM (IST)

    09 Jul 2025 03:03 PM (IST)

    नालेसफाई न झाल्याने मनसेची आक्रमक भूमिका;प्रभाग समिती समोर टाकला कचरा

    दिवा शहरातील गटारांची आणि नाल्यांची साफसफाई करण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेचा स्वच्छता विभाग डोळे बंद करून बसला आहे.नाल्यांची आणि गटारांची साफसफाई न झाल्यास प्रभाग समिती समोर कचरा आणून टाकू असा इशारा दिवा मनसे कडून देण्यात आला होता. त्यानुसार आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग समिती समोर कचरा आणून टाकला. आज पालिका अधिकारी प्रभाग समिती मध्ये उपस्थित नव्हते. जर उद्या पासून नाल्यांची आणि गटारांची सफाई सुरू झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये कचरा आणून टाकू असा इशारा मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दिला आहे.

  • 09 Jul 2025 02:43 PM (IST)

    09 Jul 2025 02:43 PM (IST)

    इंडियन एअरफोर्सचे Jaguar क्रॅश; पायलट शहीद

    चुरु: राजस्थानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राजस्थानच्या चुरु भागात भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. ही घटना राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील भानुदा हि घटना घडली आहे. वायू सेनेचे विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

  • 09 Jul 2025 02:43 PM (IST)

    09 Jul 2025 02:43 PM (IST)

    सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीच्या ‘धडक २’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

    सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या बहुप्रतिक्षित ‘धडक २’ या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी या चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट शाजिया इक्बाल दिग्दर्शित आहे. हा चित्रपट २०१८ मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाची पटकथा शाजिया इक्बाल यांनी राहुल बडवळेकर यांच्यासोबत लिहिली आहे. तसेच ‘धडक’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘धडक २’ चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

  • 09 Jul 2025 02:42 PM (IST)

    09 Jul 2025 02:42 PM (IST)

    भारताविरुद्धच्या ३ एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड महिला संघ जाहीर

    IND W vs ENG W : भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंड ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेनंतर, भारतीय महिला संघ १६ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना साउथहॅम्प्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून  आपला संघ जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान अनेक खेळाडू इंग्लिश संघात परतताना दिसून आले आहेत.

  • 09 Jul 2025 02:15 PM (IST)

    09 Jul 2025 02:15 PM (IST)

    पालघरमध्ये रास्तारोको; शेतकऱ्यांना 12 तास अखंडित विज पूरवठा देण्याची मागणी

    कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा , विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या , सर्व कामगारांना 26 हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये पेन्शन लागू करा , शेतकऱ्यांना 12 तास अखंडित विज पूरवठा द्या , विजेची नवीन स्मार्ट मीटर योजना रद्द करा , मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था यासह विविध मागण्यांसाठी सीपीएमच्या नेतृत्वाखाली पालघर मध्ये आज रास्ता रोको करण्यात आला . दुपारी बारा वाजल्यापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग चारोटी येथे कार्यकर्त्यांनी आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली रोखून धरला होता . यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक साधारणतः तासभर ठप्प झाली असून दोन्ही वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याच पाहायला मिळालं . सरकार दडपशाही पद्धतीने कायदे आणत असून सरकारकडून संविधानाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप यावेळी आंदोलन कर्त्यांकडून करण्यात आला . या रास्ता रोकोत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह आशा वर्कर आणि रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून देखील सहभाग दर्शवण्यात आला आहे.

     

  • 09 Jul 2025 02:12 PM (IST)

    09 Jul 2025 02:12 PM (IST)

    सानपाड्यातील MPCT हॉस्पीटलच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; मनसेचा आरोप

    शिवतेज मित्र मंडळ, नवी मुंबईचा कैवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता, सानपाडा सेक्टर ४ येथील कस्तुरी सोसायटीतील रहिवासी कै.अमित सदाशिव इथापे (वय ३७ वर्षे) याचे काल मंगळवार, दिनांक ८ जुलैला आजारपणामुळे दुःखद निधन झाले. हॉस्पीटल व्यवस्थापनाच्या निष्काळजी पणामुळे अमित इथापे याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी केला आहे.

  • 09 Jul 2025 02:00 PM (IST)

    09 Jul 2025 02:00 PM (IST)

    लेहमध्ये दरड कोसळल्याने महाडचे काही पर्यटक अडकले

    लेह-मनाली मार्गावर दरड कोसळल्याने अनेक प्रवासी रस्त्यात अडकले असून अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांची स्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. यामध्ये महाड शहरातील अमोल महामुणकर ,समीर सावंत व राजेंद्र दरेकर आणि त्यांचे परिवार सदस्य असे एकूण ९ जण गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प झाल्याने येथील रस्त्यावर प्रचंड कडाक्याच्या थंडीत अडकलेले आहेत.सध्या तापमान २ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली घसरले आहे. अन्न, पाणी आणि निवाऱ्याचा अभाव असून अनेक जण उपाशी अवस्थेत आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी सातत्याने नवीन दरडी कोसळत असल्यामुळे मार्ग मोकळा होण्याचा काही निश्चित अंदाज सांगू शकत नसल्याची माहिती समोर आली आहे.

  • 09 Jul 2025 01:58 PM (IST)

    09 Jul 2025 01:58 PM (IST)

    कल्याणमध्ये पसरली डेंग्यूची साथ

    कल्याणमध्ये डेंग्यू आणि मलेरियाची साथ पसरली आहे. याबाबत मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. शहरात डेंगूचे किती रुग्ण आहेत याचा आकडा केडीएमसी कडे नसल्याने एकच आश्चर्य व्यक्त केला गेला. तसेच केडीएमसीच्या हॉस्पिटलची दयनीय अवस्था आहे, केडीएमसी आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आरोग्य बाबत योग्य ते काळजी घ्यावी. एवढेच नाही तर रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात देखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजे याबाबत देखील चर्चा झाली आहे.

  • 09 Jul 2025 01:26 PM (IST)

    09 Jul 2025 01:26 PM (IST)

     नागरिकांचा जीव धोक्यात! गटाराच्या पाण्यामुळे रस्त्याला नाल्याचं स्वरुप, कल्याण डोंबिवली मनपाचा हलगर्जीपणा

    कल्याण पूर्व पावशे नगर परिसरातील मुख्यरस्ता पुनालिंक रोड यासाठी गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या दुकांनाना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत असल्याचं दिसून येत आहे. गेले तीन महिन्यापासून या परिसरातील नागरिक आणि दुकान मालक हैराण झाले असून वारंवार पालिकेकडे निवदेन देऊनही या समस्येवर पालिकेने ठोस उपाययोजना अजूनही केली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

  • 09 Jul 2025 12:59 PM (IST)

    09 Jul 2025 12:59 PM (IST)

    ७ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएफ खात्यात व्याजाचे पैसे आले

    ७ कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पीएफ व्याजाचे पैसे जमा केले आहेत. हे पैसे जवळजवळ सर्व ईपीएफ खात्यांमध्ये जमा झाले आहेत. अर्थ मंत्रालयाने व्याजदर जाहीर केल्यानंतर दोन महिन्यांत हे काम पूर्ण झाले आहे.

  • 09 Jul 2025 12:50 PM (IST)

    09 Jul 2025 12:50 PM (IST)

    औषध कंपन्यांवर 200 टक्के कर लादणार? फार्मा स्टॉक्स घसरले

    आज शेअर बाजारात औषध कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहेत. भारतातील औषध कंपन्यांचे शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून येत आहे. सन फार्मा लिमिटेडचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात २% पर्यंत घसरला आणि १६४९ रुपयांवर आला. याशिवाय, लुपिन लिमिटेडचे शेअर्स लाल चिन्हाने उघडले, तथापि, नंतर १% ने वाढले देखील.

    (सविस्तर बातमी) 

  • 09 Jul 2025 12:47 PM (IST)

    09 Jul 2025 12:47 PM (IST)

    पंतप्रधान मोदी अधिकृत दौऱ्यासाठी नामिबियात दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अधिकृत राज्य देशांच्या दौऱ्यावर आहे. सध्या ते शेवटच्या टप्प्यात नामिबियात पोहोचले आहे. हा दौरा भारत आणि नामिबियातील धोरणात्मक भागीदारीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान मोदी नामिबियात पोहचल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. गेल्या तीस वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नामिबियाचा दौरा आहे.

    (सविस्तर बातमी) 

  • 09 Jul 2025 12:42 PM (IST)

    09 Jul 2025 12:42 PM (IST)

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा, पणन संचालकांचे चौकशीचे आदेश

    पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. समितीच्या कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पणन संचालकानी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.  या चौकशीसाठी  विशेष चौकशी समिती नेमण्यात आली असून १ एप्रिल ते सात जुलै या कालावधी झालेल्या सर्व व्यवहारांची  आणि  कागदपत्रांच पडताळणी करण्यात येणार आहे. चौकशीसाठी एकूण 51 महत्त्वपूर्ण मुद्दे निश्‍चित करण्यात आले आहेत.

    (सविस्तर बातमी)

  • 09 Jul 2025 12:40 PM (IST)

    09 Jul 2025 12:40 PM (IST)

    ‘Squid Game 3’ ने दोन आठवड्यातच रचला इतिहास

    २७ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या लोकप्रिय वेब सिरीज ‘स्क्विड गेम सीझन ३’ ला रिलीज होऊन आता १० दिवस पूर्ण झाले आहेत. या सिरीजची क्रेझ अद्याप ओटीटी प्रेमींच्या डोक्यातून गेलेली नाही. आता या मालिकेने जबरदस्त विक्रम केला आहे. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात, स्क्विड गेमचा तिसरा सीझन ९३ देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. यासह, ही मालिका आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय इंग्रजी-नसलेल्या भाषिक मालिकांच्या यादीत समाविष्ट झाली आहे.

    (सविस्तर बातमी)

  • 09 Jul 2025 12:10 PM (IST)

    09 Jul 2025 12:10 PM (IST)

    आरोग्य विभागात नोकरीचे आमिष; ९० जणांची फसणूक

    धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात कंत्राटी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून नाशिक सह धुळ्यातील 90 जणांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करून पसारा झालेल्या संशयित वैभव पोळ याला कोकणातील श्रीवर्धनमधून गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मागील महिन्यात सरकार वाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या एक महिन्यापासून नाशिक पोलिसांकडून वैभव पोळ याचा शोध सुरू होता श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या रिसॉर्टवर शोध सुरू असताना त्याला काल पहाटे एका रिसॉर्ट मधून गुंडा विरोधी पथकाने ताब्यात घेतली आहे.

  • 09 Jul 2025 12:06 PM (IST)

    09 Jul 2025 12:06 PM (IST)

    तक्रार करण्यासाठी सनदशीर मार्ग - संजय राऊत

    आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर खासदार संजय राऊत म्हणाले की, "फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेत. ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे. टॉवेलवर जाऊन मारहाण करायची. मी आज सीएमना टि्वटरच्या माध्यमातून कळवलय. ही आपल्या राज्यातील कायदा-सुव्यस्था आहे. आमदाराने कोणाला मारहाण करायची, मग आपली बाजू मांडायची. मला असं वाटतं तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत," असा सल्ला खासदार राऊत यांनी दिला आहे.

  • 09 Jul 2025 12:02 PM (IST)

    09 Jul 2025 12:02 PM (IST)

    सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

    भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्याने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी चालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • 09 Jul 2025 11:29 AM (IST)

    09 Jul 2025 11:29 AM (IST)

    कॅन्टीन चालकाला संजय गायकवाड यांच्याकडून मारहाण

    शिंदे गटाचे नेते व आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईस्थित आमदार निवासमधील कॅन्टीन चालकाला मारहाण केली आहे. शिळं अन्न दिल्यामुळे संजय गायकवाड यांच्याकडून मारहाण केली आहे.

  • 09 Jul 2025 11:05 AM (IST)

    09 Jul 2025 11:05 AM (IST)

    मुंबईतील कर्नाक पूलाचे नाव होणार 'सिंदूर'

    मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक पुलाचे नाव अखेर ठरवण्यात आले आहे. या पुलाचे 'सिंदूर' असे नामकरण करण्याचे निश्चित झाले. याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.

  • 09 Jul 2025 10:56 AM (IST)

    09 Jul 2025 10:56 AM (IST)

    हरवलेल्या चिमुकल्या गजराजाची आईशी करून दिली भेट

    आई-मुलाच्या नात्याची नव्याने ओळख करून देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये वन-विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका हरवलेल्या हत्तीची त्याच्या आईशी भेट करून दिल्याचे दिसून येत आहे. आईला पाहताच हत्ती इतका आनंदित होतो की धावत पळत आईला जाऊन बिलगतो. हत्तीचे हे गोंडस रूप आणि आईवरची त्याची माया पाहून आता सर्वच सुखावून गेले आहेत.  वाचा सविस्तर. 

  • 09 Jul 2025 10:48 AM (IST)

    09 Jul 2025 10:48 AM (IST)

    J J Hospital चा ऑर्थोपेडिक विभाग वैद्यकीय विद्यार्थ्यांना देणार शस्त्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञान

    रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेशी संबंधित आधुनिक तंत्रांवर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत अमेरिकेतील डॉक्टर आधुनिक तंत्रांचा वापर करून थेट हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत.  केवळ जेजे हॉस्पिटलच नाही तर राज्यातील अन्य १५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्जन या थेट शस्त्रक्रियेच्या मदतीने शस्त्रक्रियेच्या आधुनिक तंत्रे शिकणार आहेत. पुढील पिढीतील डॉक्टरांना याचा अधिक फायदा मिळणार असल्याचे दिसून येत आहे.

  • 09 Jul 2025 10:47 AM (IST)

    09 Jul 2025 10:47 AM (IST)

    गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल कोसळला; 3 जणांचा मृत्यू

    गुजरातमधील महिसागर नदीवर बांधलेला पूल कोसळला आहे. पूल कोसळल्यानंतर आतापर्यंत ५ वाहने त्यात पडली आहेत. ३ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. हा पूल १९८५ मध्ये बांधण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक तज्ञांना घटनास्थळी पाठवले आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सोपवली आहे.

  • 09 Jul 2025 10:47 AM (IST)

    09 Jul 2025 10:47 AM (IST)

    बंदर क्षेत्रात रोजगार निर्मिती, ITI संस्थांचे आधुनिकीकरण

    महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील बंदर प्रकल्पांसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. वाचा सविस्तर.

  • 09 Jul 2025 10:33 AM (IST)

    09 Jul 2025 10:33 AM (IST)

    भारतात लाँच झाले OnePlus चे नवे ईयरबड्स

    तुम्ही नवीन क्लासी लूकवाले ईयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये OnePlus Nord 5 आणि Nord CE 5 सह नवे ईयरबड्स OnePlus Buds 4 देखील लाँच करण्यात आले आहेत. या ईयरबड्समध्ये डुअल ड्राइवर्स, डुअल DAC यूनिट्स आणि अडॅप्टिव एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) सपोर्ट देखील देण्यात आला आहे. याशिवाय ईयरबड्सची बॅटरी लाईफ अत्यंत पावरफुल आहे. Buds 4 हे OnePlus Buds 3 चे सक्सेसर आहेत, जे 2024 जानेवारीमध्ये लाँच करण्यात आले होते.

  • 09 Jul 2025 10:32 AM (IST)

    09 Jul 2025 10:32 AM (IST)

    50 वर्षांनंतर तयार होत आहे विपरित राजयोग

    ग्रहांची हालचाल वेळोवेळी बदलत असल्याने त्याचा संक्रमणाचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होत असतो. काहीवेळा हे परिणाम शुभ तर अशुभ राहील. तसेच काही लोकांना आव्हानात्मक राहू शकतो. अशा पद्धतीने एक विशेष योग 13 जुलै रोजी तयार होत आहे यावेळी शनि देव आपली वक्री करणार आहे. वाचा सविस्तर 

  • 09 Jul 2025 10:19 AM (IST)

    09 Jul 2025 10:19 AM (IST)

    घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ

    अनेकांना दुधीची भाजी खायला आवडत नाही अशात तुम्ही याचे खमंग आणि चवदार असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालिपीठ दुधामध्ये पीठ भिजवून तयार केले जाते, त्यामुळे याची चव मऊसूत, गोडसर आणि खवय्यांना विशेष भावणारी असते. विशेषतः लहान मुलांना हे थालिपीठ खूप आवडते. वाचा सविस्तर. 

  • 09 Jul 2025 10:17 AM (IST)

    09 Jul 2025 10:17 AM (IST)

    2008-2017 मध्ये जन्मलेल्या 1.5 कोटी लोकांना होऊ शकतो पोटाचा कॅन्सर

    एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की, २००८ ते २०१७ दरम्यान जन्मलेल्या १.५ कोटींहून अधिक मुलांना भविष्यात पोटाच्या कर्करोगाचा म्हणजेच पोटाच्या कर्करोगाचा त्रास होऊ शकतो. चीनमध्ये सर्वाधिक रुग्ण असतील आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर असेल. एका मीडिया रिपोर्टनुसार यापैकी सुमारे दोन तृतीयांश रुग्ण आशियामध्ये आढळू शकतात. त्यानंतर अमेरिका आणि आफ्रिकेत रुग्ण वाढू शकतात. हा अभ्यास WHO च्या कर्करोग एजन्सी IARC (इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर) ने केला आहे.

Web Title: Marathi breaking news today live updates political national crime sports entertainment social viral business breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 09:01 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today:  महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या घडामोडींच्या ब्रेकिंग बातम्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today:  राज्यातील महापालिका निवडणुकांचे latest Updates, वाचा सविस्तर
2

Maharashtra Breaking News Today: राज्यातील महापालिका निवडणुकांचे latest Updates, वाचा सविस्तर

Maharashtra Breaking News Today: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती नाहीच
3

Maharashtra Breaking News Today: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती नाहीच

Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ब्रेकिंग बातम्यांच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking LIVE News Today: महाराष्ट्रासह देशविदेशातील ब्रेकिंग बातम्यांच्या लाईव्ह अपडे्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.