फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांची हालचाल वेळोवेळी बदलत असल्याने त्याचा संक्रमणाचा परिणाम काही राशींच्या लोकांवर होत असतो. काहीवेळा हे परिणाम शुभ तर अशुभ राहील. तसेच काही लोकांना आव्हानात्मक राहू शकतो. अशा पद्धतीने एक विशेष योग 13 जुलै रोजी तयार होत आहे यावेळी शनि देव आपली वक्री करणार आहे.
शनिच्या वक्री गतीमुळे महाविप्रीत राज योग तयार होत आहे. ज्याचा परिणाम अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ मानला जातो. या योगाचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने होतो. मात्र अशा काही राशी आहेत त्यांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये वाढ आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी हा योग महत्त्वाचा ठरतो. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग अनेक संधीनी भरलेला राहील. तसेच या लोकांची काम आणि व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळेल. व्यावसायिकांना नवीन भागीदारीतून फायदा होऊ शकतो. या लोकांची आर्थिक सुधारलेली राहील. तुम्ही एखाद्या जुन्या योजनेत गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. व्यापारी त्यांचा व्यवसाय वाढवू शकतात. तुमची एखाद्या व्यक्तीची ओळख होईल त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
कर्क राशीच्या लोकांना विप्रीत राजयोगाचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहील. नातेसंबंधात असलेले मतभेद दूर होतील. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत आहे त्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती होऊ शकते तसेच या लोकांवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना या काळाचा फायदा होईल.
मकर राशीच्या लोकांना विप्रीत राजयोग फायदेशीर ठरणार आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना नवीन नोकरी मिळेल आणि अधिक फायदा देखील होईल. तसेच विविध संधी उपलब्ध होतील. यावेळी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल. समाजामध्ये या लोकांची प्रतिष्ठा वाढलेली राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ चांगला राहून विस्तारासाठी नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी नफा कमविण्यासाठी आणि नवीन योजना राबवण्याची हा काळ चांगला आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)