Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

भारतात 13 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,839 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,519 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,879 रुपये होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 14, 2026 | 11:50 AM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 14 Feb 2026 11:50 AM (IST)

    14 Feb 2026 11:50 AM (IST)

    चाकूचा धाक दाखवून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दप्तारातील 150 रूपये काढून घेतले अन्

    सिडको परिसरात कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये होणारी फ्री स्टाईल अधूनमधून होते. मात्र, भाईगिरी करण्याची जणू सवयच सध्याच्या तरुणांना लागली आहे. उत्तमनगर येथील शाळेत गेलेल्या लहान मुलास गेटबाहेर बोलावून चाकूचा धाक दाखवत त्याच्या दप्तरातील दीडशे रुपये जबरीने हिसकावण्यात आले. तसेच मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुद्धा झाली.

  • 14 Feb 2026 11:40 AM (IST)

    14 Feb 2026 11:40 AM (IST)

    कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ

    उत्तर नागपूरच्या प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणारे राजा शुद्धोधननगर, सम्राटनगर, समतानगर आणि मंगलमूर्ती ले-आऊट हे २० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. एकीकडे नागपूर शहर विकासाची गती पकडत असताना या भागांत आजतागायत पक्के रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था पोहोचलेली नाही. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की ते नियमितपणे महानगरपालिकेला पूर्ण कर भरतात. तरीही त्यांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. रस्ता ही मूलभूत गरजदेखील नागरिकांना स्वतःच्या खर्चान पूर्ण करावी लागली. परंतु तो रस्ताही तात्पुरताच ठरला आहे.

  • 14 Feb 2026 11:30 AM (IST)

    14 Feb 2026 11:30 AM (IST)

    आधार अपडेटचा फटका! Sarathi Portal वरील तांत्रिक बिघाडामुळे हजारो अर्ज अडकले

    आधार कार्डच्या फॉरमॅटमध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने केलेल्या बदलाचा थेट परिणाम आता वाहन चालक परवाना काढणाऱ्या नागरिकांवर होत असल्याचे समोर आले आहे. आधार कार्डावरील पत्त्याच्या रकान्यातून वडिलांचे नाव वगळण्यात आल्यामुळे परिवहन विभागाच्या ‘सारथी’ पोर्टलवर अर्ज सादर करताना मोठ्या अडचणी येत आहेत. परिणामी यामुळे हजारो अर्ज अर्ध्यावरच अडकले आहेत.

  • 14 Feb 2026 11:20 AM (IST)

    14 Feb 2026 11:20 AM (IST)

    गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक टँकमध्ये

    गोंदिया येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशच्या भोपाळला गेली. मात्र ती घरी परतलीच नाही. एका सेप्टिक टँकमध्ये थेट तिचा मृतदेह सापडला. अशरफी उर्फ सिया (३३ वर्षीय) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी या घटनेचा २४ तासात उलगडा केला आहे. मात्र तिच्या सोबत एवढं भयंकर का घडलं? तिची हत्या का करण्यात आली? कोणी केली तिची हत्या? काय घडलं नेमकं? जाणून घ्या सविस्तर.

  • 14 Feb 2026 11:10 AM (IST)

    14 Feb 2026 11:10 AM (IST)

    पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी ‘प्रेमाची गोष्ट’

    नाटक आणि सिनेमा तसा जिव्हाळ्याचा विषय हा तितका वेळ काढता येत नाही तो भाग वेगळा. तसे हलके फुलके किंवा कॉमेडी जॉनर आवडीचे आहेत पण कधीही आणि कितीही वेळा पाहावं वाटणाऱ्या सिनेमांमध्ये टॉपची दोन नावं म्हणजे मुंबई पुणे मुंबई आणि प्रेमाची गोष्ट. योगायोग म्हणजे दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शक एकच सतीश राजवाडे.

  • 14 Feb 2026 10:59 AM (IST)

    14 Feb 2026 10:59 AM (IST)

    Instagram ची व्हॅलेंटाईन ट्रीट, स्टोरी-रील्ससाठी आले रोमँटिक फीचर्स!

    व्हॅलेंटाईन डे निमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम देखील प्रेमाचा दिवस साजरा करत आहे. इंस्टाग्रामने त्यांच्या यूजर्सना एक खास सरप्राईज दिलं आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त इंस्टाग्रामने खास लिमिटेड-एडिशन फीचर्स लाँच केले आहेत. प्लॅटफॉर्मवर नवीन नए फॉन्ट्स, लव-थीम स्टिकर्स, सीक्रेट फ्रेज, चॅट थीम्स आणि कई क्रिएटिव टूल्स जोडण्यात आले आहेत. यूजर्स त्यांच्या स्टोरीज, रील्स आणि डायरेक्ट मेसेज (DMs) जास्त पर्सनल आणि खास बनवू शकतील याच उद्देशाने कंपनी नवीन फीचर्स घेऊन आली आहे.

  • 14 Feb 2026 10:51 AM (IST)

    14 Feb 2026 10:51 AM (IST)

    फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (14 फेब्रुवारी) पुन्हा एकदा राजधानी दिल्लीच्या दोऱ्यावर गेले आहेत. एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नवनिर्वाचित भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • 14 Feb 2026 10:42 AM (IST)

    14 Feb 2026 10:42 AM (IST)

    खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड

    खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्ये प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात भारतीय नागरिका निखिल गुप्ताला संशयाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान निखिल गुप्ताने पन्नूच्या हत्येचा कट रचला असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या या कबुलीनंतर निखिल गुप्ताला २४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा अमेरिकन कोर्टाने सुनावली आहे. २९ मे रोजी औपचारिकपणे त्याची शिक्षा जाहीर केली जाणार आहे.

  • 14 Feb 2026 10:34 AM (IST)

    14 Feb 2026 10:34 AM (IST)

    कोणाच्या फिरकीत फसणार फलंदाज

    कोलंबोच्या खेळपट्टीवर चक्रवर्ती, अहमद आणि तारिक हे “गूढ” फिरकीपटू कसे काम करतील याची कल्पना करणे कठीण आहे. गेल्या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चक्रवर्तीचा साइडस्पिनऐवजी ओव्हरस्पिनकडे बदल सुधारला. कोनात थोडासा फरक असल्याने, चक्रवर्ती इतर अनेक फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजी करतो (सरासरी ९५ किमी प्रतितास). तथापि, या ट्रॅकमुळे त्याला गती कमी करावी लागू शकते.

  • 14 Feb 2026 10:25 AM (IST)

    14 Feb 2026 10:25 AM (IST)

    तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर

    तासगावच्या सांस्कृतिक परंपरेत भर घालणारा रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच ‘आर. आर. (आबा) पाटील स्मृती करंडक २०२६’ हा राज्यस्तरीय एकांकिका महोत्सव आजपासून १४ पासू सुरू होत आहे. हा महोत्सव १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी रंगणार असून, संपूर्ण महाराष्ट्रातील २० दर्जेदार नाट्यसंघ अभिनयाची पराकाष्ठा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

    ‘आर्यरुप नाट्यनिर्मिती थिएटर्स’ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्वर्गीय आबांच्या स्मृतींना कलेच्या माध्यमातून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • 14 Feb 2026 10:17 AM (IST)

    14 Feb 2026 10:17 AM (IST)

    Hardik Pandya दिसला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत

    १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मोठी लढत होणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील हा सर्वात मोठा सामना असेल. दोन्ही संघ कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. या सामन्यापूर्वी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल झाली आहे. त्यांच्या स्वागताचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. भारतीय संघाचे श्रीलंकेत पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान, हार्दिक पंड्या त्याच्या मैत्रिणीसोबत दिसला.

  • 14 Feb 2026 10:09 AM (IST)

    14 Feb 2026 10:09 AM (IST)

    रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट

    14 फेब्रुवारी म्हणजेच आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे चा उत्सव साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदार एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आणि आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचे वचन देतात. व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाचा उत्सव देखील म्हटलं जातं. हाच प्रेमाचा उत्सव आता सर्च इंजिन गुगलने आणखी खास केला आहे. गुगलने त्यांच्या यूजर्ससाठी होमपेजवर एक खास डूडल सादर केलं आहे. गुगलने व्हॅलेंटाईन डे आणखी खास व्हावा यासाठी एक नवीन आणि सुंदर डूडल सादर केले आहे. या वर्षीचे डूडल प्रेमाच्या त्या अनोख्या पद्धतीला सलाम करते ज्यामध्ये लोक हाताने बनवलेल्या भेटवस्तू, वैयक्तिक नोट्स आणि स्वादिष्ट मिठाई देऊन त्यांचे नाते अधिक घट्ट करतात.

  • 14 Feb 2026 10:01 AM (IST)

    14 Feb 2026 10:01 AM (IST)

    हंगेरीत भीषण अग्नितांडव!

    हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. शुक्रवारी(१३ फेब्रुवारी) पहाटे कामगरांच्या दोन मजली इमारतीला भीषण आग (Fire Accident) लागली होती. या आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक महिला आणि दोन पुरुषाचा समावेश आहे.

  • 14 Feb 2026 09:35 AM (IST)

    14 Feb 2026 09:35 AM (IST)

    Mumbai Crime: १९ वर्षीय तरूणीकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

    मुंबई: मुंबईच्या मानखुर्द येथून एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणींकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. एव्हडेच नाही तर, तरुणी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती, मात्र तरुणाने या सगळ्याला नकार देताच तिने त्याला धमकी दिली. या घटनेने पीडित घाबरला होता. त्याने धाडस करून आपल्या कुटुंबियांना घडलेली घटना सांगितली. तेव्हा संपूर्ण प्रक्रर उघडकीस आला.

  • 14 Feb 2026 09:30 AM (IST)

    14 Feb 2026 09:30 AM (IST)

    भोसरी भूखंड प्रकरण: एकनाथ खडसे यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

    पुण्यातील भोसरी भूखंड व्यवहाराशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी दोघेही मुंबईतील विशेष न्यायालयात हजर झाले, त्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट (NBW) रद्द केले.

    खासदार आणि आमदारांच्या प्रकरणांसाठी नियुक्त विशेष न्यायाधीश महेश जाधव यांनी गेल्या आठवड्यात हे वॉरंट जारी केले होते. आरोप निश्चितीच्या सुनावणीसाठी खडसे दाम्पत्य न्यायालयात उपस्थित न राहिल्याने ही कारवाई करण्यात आली होती.  शुक्रवारी दोघेही प्रत्यक्ष न्यायालयात हजर झाल्याने हे वॉरंट मागे घेण्यात आले.

  • 14 Feb 2026 09:25 AM (IST)

    14 Feb 2026 09:25 AM (IST)

    बसथांबे ते महापालिका इमारती… सौर ऊर्जेतून पुणे होणार हरित शहर

    राज्यातील सर्वात मोठ्या ‘मास्मा रिन्युएबल एनर्जी एक्स्पो २०२६’ या सौर ऊर्जा प्रदर्शनाचे उद्घाटन आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. शिवाजीनगर येथील न्यू अ‍ॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड येथे सुरू असलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

    उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना महापौर नागपुरे यांनी पुण्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय असल्याचे सांगितले. बदलत्या हवामान परिस्थिती आणि वाढत्या ऊर्जा गरजांच्या पार्श्वभूमीवर शहरात व्यावहारिक व अंमलात आणता येण्याजोगे सौर प्रकल्प राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

  • 14 Feb 2026 09:20 AM (IST)

    14 Feb 2026 09:20 AM (IST)

    Mafia Queens of Mumbai: कोण होती ‘सपना दीदी’? जिने दाऊद इब्राहिमला मारण्यासाठी थेट दुबईत रचला होता सापळा

    Mafia Queens of Mumbai: हिंदी चित्रपटसृष्टीचा वास्तविक जगातील गुन्हेगारी कथांशी नेहमीच जवळचा संबंध राहिला आहे. मुंबईच्या डोंगरी भागापासून ते दुबईपर्यंत विस्तारलेल्या अंडरवर्ल्डने सिनेमाला अशी अनेक पात्रे आणि कथानके दिली आहेत, ज्यांनी प्रेक्षकांवर खोल छाप सोडली आहे. सध्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित “ओ रोमियो” या चित्रपटामुळे हुसेन उस्तारा हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर ‘उस्तारा’ नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी हा चित्रपट पूर्णपणे ‘बायोपिक’ नसल्याचे स्पष्ट केले असले तरी, त्यातील व्यक्तिरेखा आणि पार्श्वभूमी हुसेन उस्तारा यांच्या जीवनाशी मिळतीजुळती आहे. त्यामुळेच जुन्या अंडरवर्ल्डमधील हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

  • 14 Feb 2026 09:17 AM (IST)

    14 Feb 2026 09:17 AM (IST)

    अन्न व औषधी प्रशासन (FDA) वादाच्या भोवऱ्यात

    राज्यभरातील सुपारीचा व्यापार, वाहतूक आणि त्यादरम्यान होणारे अन्न व औषधी प्रशासनाचे (FDA) छापे सध्या वादाचा विषय ठरत आहेत. या प्रशासकीय कारवाईच्या आड अनेक संशयास्पद व्यवहार होत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला छापे टाकून सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याचे घोषित करायचे आणि त्यानंतर 'अर्थपूर्ण' तडजोडीनंतर तीच सुपारी चांगल्या दर्जाची असल्याचे प्रमाणित करायचे, असा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. औषध दुकानांच्या परवान्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी राजरोसपणे आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप होत आहेत.

  • 14 Feb 2026 09:13 AM (IST)

    14 Feb 2026 09:13 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांच्याकडे पदभार आणि वित्तविभागाची चर्चा

    अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्याकडील उपमुख्यमंत्रिपद आणि उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच औकाफ ही महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. मात्र, राज्याचे वित्तखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या स्वतःकडे ठेवले आहे. यामुळे भाजपने राष्ट्रवादीकडून हे खाते काढून घेतल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण येत्या तीन ते चार महिन्यांत हे अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादीकडे सोपवले जाणार असल्याचे समजते.

  • 14 Feb 2026 09:07 AM (IST)

    14 Feb 2026 09:07 AM (IST)

    भारत-पाकिस्तान सामन्यावर  पावसाचे सावट

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गेल्या काही वर्षांतील विश्वचषकातील सामन्यांच्या तुलनेत, उद्या होणाऱ्या टी-२० विश्वचषकातील सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. या उत्कंठेचे मुख्य कारण सामन्यापूर्वी झालेला मोठा वाद हे आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यावर आता निसर्गाची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्याबाबत हवामान विभागाने इशाराही दिला आहे. जर पाऊस झाला, तर चाहत्यांच्या उत्सवावर विरजण पडण्याची दाट शक्यता आहे.

  • 14 Feb 2026 09:03 AM (IST)

    14 Feb 2026 09:03 AM (IST)

    ‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

    मुंबई : राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषय चर्चेत आला आहे. मात्र, या दोन्ही पक्षाचे विलिनीकरण लांबण्याची शक्यता आहे. असे असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. ‘जर आज अजित पवार जिवंत असते तर पक्षातील दोन्ही गट विलीन झाले असते. अजित पवारांनी १७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत १२ फेब्रुवारी ही दोन्ही गटांच्या विलीनकरणाची तारीख निश्चित केली होती’, असे खासदार सुळे म्हणाल्या.

  • 14 Feb 2026 08:55 AM (IST)

    14 Feb 2026 08:55 AM (IST)

    आतड्यांच्या कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

    जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक कायमच जंक फूडचे सेवन करतात. याशिवाय अपुरी झोप, कामाचा वाढलेला ताण, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा थेट परिणाम शरीरावर होतो. तसेच तरुणांमध्ये आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पूर्वीच्या काळी कॅन्सर किंवा हृद्यासंबंधित गंभीर आजार वयाच्या ५० व्या वर्षानंतर व्हायचे. पण हल्ली तरुण वयातील मुलांमुलींना सुद्धा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होते. शरीराच्या अंतर्गत अवयवांना कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. मात्र कालांतराने लक्षणे वाढतात आणि शरीराला हानी पोहचते.

Maharashtra to World Breaking News:

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्या – चांदीचे दर नरमले, काय आहेत आजच्या किंमती?

Gold Rate Today:  भारतात 14 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,577 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,279 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,683 रुपये आहे. भारतात 14 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,790 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,55,770 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,16,830 रुपये आहे. भारतात 14 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 279.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,79,900 रुपये आहे.

 

 

Web Title: Maharashtra breaking news todays live marathi 14th february maharashtra national international politics war sports crime entertainment share market gold sliver rates breaking updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’
1

वैजापूरच्या दोन गट, एका गणात आमदार बोरनारेंच्या पाठिंब्याने विजय; ठाकरे गट ठरला खरा ‘धुरंधर’

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी
2

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का
3

खेडमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भगवा लाटेचा धडाका; सत्तासमीकरणे बदलली, ठाकरे गटाला धक्का

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.