Maharashtra Political News update
Marathi Breaking news live updates- महायुतीमध्ये कोणताही वाद निर्माण होईल, अशी विधाने करू नका, तसेच वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांना आयते कोलीत मिळेल, अशी चूक टाळा, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील आमदारांना दिला आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी उपस्थित आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
03 Jul 2025 06:02 PM (IST)
तुम्ही Xiaomi कंपनीचे नाव नक्कीच ऐकले असेल. या कंपनीने भारतात कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स असणारे फोन ऑफर केले आहे. स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, ही चिनी कंपनी शाओमी इलेक्ट्रिक कार देखील ऑफर करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच चीनच्या बाहेरही त्यांच्या कार ऑफर करू शकते. अशाच शाओमी भारतातही त्यांच्या कार विक्रीसाठी उपलब्ध करून देऊ शकते का?
03 Jul 2025 05:33 PM (IST)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे.नुकतेच, इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Matter ने भारतीय बाजारात Matter Aera ही एक नवीन बाईक म्हणून लाँच केली आहे. मॅटर एरा बाईक राजधानी दिल्लीमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही बाईक कंपनीने अनेक उत्तम फीचर्स आणि मजबूत रेंजसह ऑफर केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.94 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकची बुकिंग ऑनलाइन आणि शोरूममध्ये करता येणार आहे. कंपनी बाईकसोबत तीन वर्षे किंवा एक लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे.
03 Jul 2025 05:13 PM (IST)
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल (Airtel) ने मुंबईतील वाढत्या ऑनलाइन फसवणुकीविरोधात उल्लेखनीय प्रगतीची घोषणा केली आहे. देशभरात एआयवर आधारित फ्रॉड डिटेक्शन सिस्टीम लाँच अंतर्गत एअरटेलने मुंबईत अवघ्या 50 दिवसांत 21 लाखांहून अधिक युजर्सना सफलतेने ऑनलाइन फसवणुकीपासून वाचविले आहे.
03 Jul 2025 05:01 PM (IST)
रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगारात खड्याचं साम्राज्य झालं असून, प्रशासनाच दुर्लक्ष होत असल्याची बातमी समोर आली आहे्. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ठाणे जिल्हा रेल्वे व वाहतूक प्रवासी सामाजिक सेवा संस्थेने प्रशासनाला निवेदन दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील अतिशय जुनं असं रेल्वेस्टेशन जवळील एसटी आगाराकडे प्रशासनाच दुर्लक्ष असून रोजच्या हजारो प्रवासी अनेक समस्यांना सामोरं जात आहेत. ठाणे जिल्हा आणी इतर प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाच असलेल हे आगार अक्षरशः समस्येंनी ग्रासलं आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा प्रवासी आणी वाहतूक संस्थेकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या, नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागूनही समस्येच निराकारण न झाल्याने नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे धाव घेतली आहे.
03 Jul 2025 04:33 PM (IST)
एका दिवशी रायगड जिल्ह्यात सहा बलात्कार झाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची काय अवस्था असेल हे सांगण्याची गरज नाही. कळत नाही महिलांवरील अत्याचार वाढत असताना तुम्ही शक्ती कायदा का लागू करत नाही. शक्ती कायदा लागू करा आणि या अधिवेशनात लागू करा अशी मागणी मी करणार आहे. महिला या राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आम्ही सरकारला विचारू,” असेही वडेट्टीवार म्हणाले.
03 Jul 2025 04:29 PM (IST)
गुरुवारी भारतीय शेअर बाजार थोड्याशा वाढीसह उघडला. परंतु व्यवहाराच्या शेवटच्या काही तासांत, बँकिंग, धातू आणि रिअॅल्टी समभागांमध्ये विक्रीचा दबाव असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी-५० दोन्ही बेंचमार्क निर्देशांक लाल रंगात बंद झाले. गुंतवणूकदार अमेरिका आणि भारत यांच्यात लवकरच व्यापार करार होऊ शकतो या वृत्ताचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
03 Jul 2025 04:11 PM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरामध्ये घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे. कागल नगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक मारुती व्हरकट यांनी विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
03 Jul 2025 03:53 PM (IST)
राज्यातील १८ हजार सरकारी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी आहे आणि विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे एकही शाळा बंद केली जाणार नाही. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद लक्षद्वीपमध्ये भाषण करताना ही माहिती दिली. लक्षवेधी दरम्यान, आमदार विक्रम काळे यांनी सरकारी आणि जिल्हा परिषदेची कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद असल्याने शिक्षकांच्या समायोजनाबाबत लक्षवेधी माहिती मंडळाचे आयोजन केले.
03 Jul 2025 03:44 PM (IST)
पुढचा दलाई लामा कोण असेल? याबद्दल तिबेटी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये वादप्रतिवाद सुरू आहेत. चीनने दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी नेमण्यास नकार दिला आहे आणि जर नियुक्ती केली तर त्याला चीनची परवानगी घ्यावी लागेल, असं म्हटलं आहे. मात्र भारताने त्यावर प्रतिक्रिया दिली असून दलाई लामांची नियुक्ती करण्याचा अधिकार दुसऱ्या कोणाला नसल्याचं म्हटलं आहे.
03 Jul 2025 03:17 PM (IST)
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नितीन दिनकर यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
03 Jul 2025 02:55 PM (IST)
आयपीएल 2025 झाल्यानंतर भारतामध्ये त्याचबरोबर परदेशात देखील अनेक लीग सुरु झाले आहेत. आयपीएल 2025 नंतर लगेचच मुंबई प्रिमीयर लीग सुरु झाले होते आता सध्या तामिळनाडू प्रीमियर लीग सुरु आहे. आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याला जवळजवळ एक वर्ष झाले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेदरम्यान त्याने अचानक निवृत्ती घेऊन जगाला आश्चर्यचकित केले. आता हा खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आहे. निवृत्तीनंतर, अश्विन चेंडू आणि बॅट दोन्हीने कहर करत आहे.
03 Jul 2025 02:55 PM (IST)
भारतीय नौदलात भरतीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चार्जमन, ड्राफ्ट्समन तसेच ट्रेड्समन पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन रूपात करायचे आहे. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करण्यात यावे. अर्ज सुरु करण्याची तारीख ५ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात आयोजित परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही.
03 Jul 2025 02:54 PM (IST)
पुणे : कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. बुधवारी (२ जुलै) रात्री हा प्रकार उघडकीस आला. कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे. यामुळे पुण्यासह राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न देखील यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेवरुन भाजप आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
03 Jul 2025 02:54 PM (IST)
Paetongtarn Shinawatra suspension : थायलंडच्या राजकारणात नाट्यमय वळण घेत, निलंबित पंतप्रधान पतोंगटोर्न शिनावात्रा यांनी सत्ता हातातून जाऊ न देता नव्या रूपात सरकारमध्ये पुनरागमन केले आहे. नैतिकतेच्या आरोपांमुळे सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानपदावरून तात्काळ निलंबित केलेल्या शिनावात्रा यांनी गुरुवारी संस्कृती मंत्री म्हणून शपथ घेतली. या पावलामुळे थायलंडच्या राजकारणात एक नवाच रंग भरला आहे.
03 Jul 2025 02:53 PM (IST)
India US Trade Deal Marathi News: भारत आणि अमेरिका यांच्यात एक अंतरिम व्यापार करार होणार आहे आणि येत्या ४८ तासांत त्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते. भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या परस्पर शुल्कावरील बंदी घालण्याची अंतिम मुदत ९ जुलै रोजी संपत आहे आणि त्यापूर्वी दोन्ही देशांमधील हा व्यापार करार शिक्कामोर्तब होणार आहे. तथापि, सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की भारत कृषी क्षेत्रातील आपल्या अटींवर ठाम आहे.
03 Jul 2025 02:37 PM (IST)
२०१७ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता तिचे नाव हॉलिवूड वॉक ऑफ फेमसाठी निवडले गेले आहे. दीपिका हा सन्मान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. यासह तिने एक नवा इतिहास रचला आहे. चाहते यावर खूप आनंदी आहेत आणि आता दीपिका पादुकोणनेही प्रतिक्रिया दिली आहे. मनोरंजक गोष्ट म्हणजे अभिनेत्रीने या आनंदाबाबत आता स्वतःचे मन व्यक्त केले आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
03 Jul 2025 02:36 PM (IST)
Bageshwar Dham News Marathi : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम संकुलात गुरुवारी (3 जुलै) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी सकाळी आरती दरम्यान अचानक एक मंडप कोसळला आणि गोंधळ उडाला. या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे १० जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक आरतीला उपस्थित असताना हा अपघात झाला. त्याच वेळी जोरदार वारा किंवा बांधकामातील दोषामुळे अचानक एक जड मंडप कोसळला. काही लोक मंडपाखाली गाडले गेले आणि गोंधळ उडाला.
03 Jul 2025 02:36 PM (IST)
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका विमानाचा भीषण अपघात झाला आहे. हजारो फूट उंचीवर अचानक विमानाचे पंख तुटले आणि खाली पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विमानचा सुरक्षितपणे लॅंडिग झाले, त्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे आढळून आले.
याच वेळी न्यू जर्सीमध्ये देखील एक भीषण दुर्घटना घडली आहे. न्यू जर्सीमध्ये बुधवारी (2 जुलै) संध्याकाळी एक स्कायडायव्हिंग विमान धावपट्टीवरुन घसरले. या अपघातात किमान 15 प्रवासी जखमी झाले आहे. फिलाडेल्फियाच्या आग्नेयेला 33.8 किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रॉस कीज विमानतळावर ही भीषण दुर्घटना घडली. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन दिलेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेले विमान सेस्ना 208B मॉडेलचे होते. हे विमान खास करुन स्कायडाव्हिंगसाठी वापरले जाते.
03 Jul 2025 02:27 PM (IST)
मीरारोडच्या शांतीपार्क परिसरात असलेल्या ‘जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन’ या दुकानाच्या मालकास केवळ भाषेच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिकांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला निषेध नोंदवला आहे.
03 Jul 2025 02:24 PM (IST)
अंबरनाथ पालिकेच्या शाळा क्रमांक ९ मध्ये विद्यार्थ्यांना ओल आलेल्या भिंती, शाळेचा आवारात असलेला चिखल आणि कोंदट वातावरणात अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या शाळेत शिकणारे हे विद्यार्थी दर पावसाळ्यात याच वातावरणात शिक्षण घेतात. पालिका प्रशासन दरवर्षी तात्पुरती डागडुजी करून ठेकेदाराचे उखळ पांढरं करते. मात्र पुन्हा विद्यार्थ्यांना त्याच कोंदट वातावरणात शिकण्याची वेळ येते. या शाळेच्या परिसरात चिखलाचं साम्राज्य असल्याने चिखल तुडवत विद्यार्थ्यांना शाळेत यावं लागतंय. शाळेच्या स्वच्छतागृहाची तर खूपच बिकट अवस्था आहे .
03 Jul 2025 02:21 PM (IST)
उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 124 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. 19 जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील 18 इमारती पाडण्याचा देखील समावेश आहे.
03 Jul 2025 01:55 PM (IST)
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ऑगस्टपर्यंत ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. मालिकेतील एक सामना खेळला गेला आहे, ज्यामध्ये टीम इंडिया हरली, तर आता दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये टीम इंडिया उत्तम लयीत दिसत आहे. दरम्यान, द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शोच्या नवीनतम भागाचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे.
03 Jul 2025 01:49 PM (IST)
जर तुम्ही आयफोन युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आयफोनमध्ये एक असा फिचर आहे जे तुम्हाला नकळत तुमचे लोकेशन आणि नेटवर्क अॅक्टिव्हिटीज ट्रक करत आहे. ते आतादेखील तुमच्या फोन मध्ये चालू असू शकते. या फीचेर्चा नाव WiFi ट्रैकिंग आहे. तुमच्या डिजिटल प्रायव्हसीसाठी ते ताबडतोब बंद करणे खूप महत्वाचे आहे.
03 Jul 2025 01:45 PM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेचा बालेकिल्ला राखण्यासाठी तसेच राज्यातील महापालिका अन् जिल्हापरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी नाशिकमध्ये देखील ठाकरे गटाने रणनीती आखण्याचा प्रयत्न केला. मात्र नाशकात ठाकरे गटाला गळती लागली आहे. नेते आणि पदाधिकारी महायुतीची कास धरत आहेत. अवघ्या आठवड्याभरापूर्वी पदभार स्वीकारलेले मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.
03 Jul 2025 01:35 PM (IST)
जगातील अनेक अर्थव्यवस्था तेलाच्या आधारावर चालत आहेत, जे जगातील सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनांपैकी एक आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते विमान इंधनापर्यंतचा व्यवसाय कच्च्या तेलाच्या माध्यमातून केला जातो आणि त्याच्या किमतीतील चढ-उतार देखील अनेक देशांमध्ये महागाई वाढविण्यात किंवा कमी करण्यात मोठी भूमिका बजावतात.सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ज्या देशांमध्ये तेलाचे मोठे साठे आहेत आणि जर तेथे कोणत्याही प्रकारची वाईट परिस्थिती उद्भवली तर अनेक देशांमध्ये चिंता वाढते. इस्रायल आणि इराणमधील अलिकडच्या युद्धादरम्यान जगाला हे लक्षात आले.
03 Jul 2025 01:26 PM (IST)
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. निर्माते नमित मल्होत्राने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये रणबीर कपूर रामाच्या अवतारात दिसत आहे. अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहे. ३ मिनिटे ३ सेकंदांच्या या पहिल्या झलकात चित्रपटातील पात्रांची पहिली झलक पाहायला मिळाली. ही झलक पाहून चाहते आता खूप खुश झाले आहेत. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत.
03 Jul 2025 12:56 PM (IST)
नाशिकमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गणेश गीते, सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, कमलेश बोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा पक्ष प्रवेश झाला.
03 Jul 2025 12:50 PM (IST)
शेअर बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी ऑटो इंडेक्स १.०५ टक्क्यांनी वाढला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ करणारा आहे. निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स देखील हिरव्या रंगात आहेत. सेन्सेक्स अजूनही ३०० च्या वर वाढ कायम ठेवत आहे आणि ३२२ अंकांच्या वाढीसह ८३७३२ वर व्यवहार करत आहे. सेन्सेक्सच्या टॉप गेनरमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, मारुती, अल्ट्राटेक सिमेंट सारखे शेअर्स समाविष्ट आहेत. तर, बजाज फायनान्स, कोटक बँक, बजाज फिनसर्व्ह, ट्रेंट, एनटीपीसी, एसबीआय हे टॉप गेनरच्या यादीत आहेत.
03 Jul 2025 12:45 PM (IST)
सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. पण या व्हॅन दुप्पट तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे , याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृह समोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
03 Jul 2025 12:34 PM (IST)
नाशिकमध्ये राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे माजी सभापती गणेश गीते, नाशिक महापालिकेतील नगरसेवक प्रशांत भाऊ दिवे, माजी नगरसेवक कान्नू ताजमी, तसेच ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विकासकामांसाठी आणि निधीच्या अडचणीमुळे हा पक्षप्रवेश होत असल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांनीही ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आणखी अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत.
03 Jul 2025 12:33 PM (IST)
भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा शहरात नागपंचमीला जिवंत सापांची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. इतर अनेक आमदारांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला.
03 Jul 2025 11:58 AM (IST)
येत्या 5 जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्रितपणे विजयी सभा घेणार आहेत. यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांची शिवतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे.
03 Jul 2025 11:39 AM (IST)
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी पावसाचे आगमन झाले आहे. मात्र पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. दिल्लीत उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर देशात अन्य राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तरखंड, बिहार, हरियाणा, पंजाब राज्यांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
03 Jul 2025 11:22 AM (IST)
खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे की, भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे. नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकारायांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले.हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले. पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले… क्लायमॅक्स असा की:: हे सगळे फरार ( भाजपा साठी गुन्हेगार) आज भाजपात प्रवेश करत आहेत! जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे, सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही! असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
03 Jul 2025 11:18 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाना देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत. घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. यावेळी महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला. द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ पाना असं या पुरस्काराचं नाव आहे.
03 Jul 2025 10:48 AM (IST)
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या सहभागाबद्दल मोठी बातमी समोर आली होती. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी सालियन आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले की दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहिती नाही.
03 Jul 2025 10:41 AM (IST)
डोनोवन फरेरा यांनी स्फोटक फलंदाजी करताना फक्त ९ चेंडूत ३७ धावा केल्या, त्यादरम्यान त्यांच्या बॅटमधून ५ षटकार निघाले. फरेरा यांचा जबरदस्त फॉर्म डावाच्या शेवटच्या षटकात दिसून आला, ज्यामध्ये त्यांनी ४ षटकार मारत २८ धावा केल्या. वॉशिंग्टनकडून मिचेल ओवेनने डावातील शेवटचे षटक टाकले. त्याच्या शानदार कामगिरीमुळे डोनोव्हन फरेराला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.
03 Jul 2025 10:35 AM (IST)
महायुतीत वाद होतील, असे कोणतेही वक्तव्य करू नका, एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका अशी, सक्त ताकीद मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बुधवारी (02 जुलै) महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आली होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सर्व आमदारांचे कानही टोचले.
03 Jul 2025 10:32 AM (IST)
भारताचा शेजारी देश चीन तिसऱ्या महायुद्धाची तयारी करत असल्याची शक्यता पुन्हा एकदा जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे. बीजिंगपासून २० मैल नैऋत्येकडे चीनने एक विशाल आणि गुप्त लष्करी शहर उभारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण प्रकल्प अणुहल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने डिझाइन केले गेले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यम संस्था ‘फायनान्शियल टाईम्स’ आणि ‘द सन’ यांनी याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला असून, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनीही या प्रकल्पाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
03 Jul 2025 09:44 AM (IST)
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश सामन्यादरम्यान असे काही घडले ज्यामुळे सामना मध्येच थांबवावा लागला आणि काही काळ मैदानावर गोंधळ उडाला. सामना थांबवण्याचे कारणही समोर आले आहे. सामन्यादरम्यान, बांगलादेश फलंदाजी करत असताना, डावाच्या तिसऱ्या षटकात एक साप मैदानात घुसला. साप आत शिरल्याने मैदानात गोंधळ उडाला. मैदानावर साप पाहून खेळाडूही घाबरले, ज्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. तथापि, काही वेळाने साप मैदानाबाहेर गेला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला.
03 Jul 2025 09:06 AM (IST)
नागपूर : यलो अलर्ट असतानाही बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. ढगाळ वातावरण कायम असले तरी पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी उशिरा आणि बुधवारी पहाटे काही भागांत थोडकाच पाऊस झाला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ३.६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र त्यानंतर दिवसभरात पाऊस पडलेला नाही.
सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ० मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा अभाव असल्याने तापमानातही थोडी वाढ झाली असून, बुधवारी कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी कमी असले तरी उकाडा जाणवणारा ठरला.
03 Jul 2025 08:46 AM (IST)
हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भातील निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतला आहे. त्रिभाषा सूत्राच्या पुनरावलोकनासाठी सरकारने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. मात्र या समितीच्या स्थापनेला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी विरोध दर्शवला आहे.डॉ. नरेंद्र जाधव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असल्याचा आरोप करत डॉ. पवार यांनी या समितीच्या गरजेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही समिती अनावश्यक आणि वेळकाढूपणाची असून तिचा आम्ही ठाम विरोध करतो, असे डॉ. दीपक पवार यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.