Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
11 Apr 2025 05:57 PM (IST)
आमदार संजय केळकर यांच्या ‘जनसंवाद’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
Thane : आमदार संजय केळकर यांच्या ‘जनसंवाद’ उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद | Navarashtra#Thane #SanjayKelkar #Jansamvad #MarathiNews pic.twitter.com/NvLg4sQWLW
— Navarashtra (@navarashtra) April 11, 2025
11 Apr 2025 05:31 PM (IST)
एसटीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार मिळाल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असे आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
11 Apr 2025 05:20 PM (IST)
जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्यामध्ये 'एकता मिसळ'चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शेकडो किलोची मिसळ तयार करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच खासदार मुरलीधर मोहोळ यांनी 'एकता मिसळ'चा स्वाद घेतला.
📍महात्मा फुले वाडा, पुणे ⏭️ 11-04-2025 ➡️ महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन - लाईव्ह https://t.co/rX3QXdTLWo
— Supriya Sule (@supriya_sule) April 11, 2025
11 Apr 2025 04:54 PM (IST)
बुलढाण्यामध्ये वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शेगावमधील 12 वर्षीय मुलाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. संस्कार सोनटक्के असे या मुलाचे नाव आहे.
11 Apr 2025 04:51 PM (IST)
“तहव्वुर राणा हा 26 /11 चा आरोपी असून त्याला आता अटक झालेली आहे. तहव्वुर राणावर लवकरात लवकर कडक शासन व्हावं, अशी जनतेची भावना आहे. पाकिस्तानची भूमिका पहिल्या पासून अशीच राहिलेली आहे. दाऊद इब्राहिम जरी पाकिस्तानमध्ये असला तरी ते कबूल करायला तयार नसतात, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
11 Apr 2025 03:57 PM (IST)
महाराष्ट्र बेरोजगार परिषदेमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याच्या नावाखाली 39 लोकांकडून शुल्क म्हणून 15 लाख 78 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक केलेला शोधन भावे हा मुंबईत असल्याचे समजल्यावर या कर्ज मंजूरीसाठी पैसे दिलेल्या लोकांनी त्याला पकडून येरवडा पोलिसांकडे आणले. पोलिसांनी भावाचे अपहरण करुन मारहाण केल्याचा गुन्हा या लोकांवर दाखल केला.
11 Apr 2025 02:21 PM (IST)
प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकर जामिनावर बाहेर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबाबत कोरटकरने वादग्रस्त विधान केले होते. सात दिवसाच्या कोठडीनंतर प्रशांत कोरटकर जामिनावर सुटला आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत पोलीस बंदोबस्तात कोरटकरची सुटका करण्यात आली. कोरटकरच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर कळंबा कारागृहासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात त्याला जिल्ह्याच्या वेशीवर सोडण्यात आले. माध्यम प्रतिनिधींच्या गाड्या अडवून ठेवल्यामुळे पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली.
11 Apr 2025 01:26 PM (IST)
महाराष्ट्रासाठी अनेक रेल्वे प्रकल्पाची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांन जाहीर केले. महाराष्ट्रासाठी १ लाख ७३ हजार कोटींचे प्रकल्प देण्यात आले आहेत. राज्यात वेगानं रेल्वेचा विस्तार होत आहे, असे वैष्णवी यांनी सांगितले. 132 रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
11 Apr 2025 01:17 PM (IST)
राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
11 Apr 2025 01:05 PM (IST)
जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. मात्र हे उदयनराजे भोसले यांनी अमान्य करत वादग्रस्त विधान केले आहे. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केआणि त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले.
11 Apr 2025 01:01 PM (IST)
11 Apr 2025 12:51 PM (IST)
पुरंदर तालुक्यात तब्बल एक दशकाहून अधिक कालावधीपासून गावोगावी वृक्ष संपदा निर्माण करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील हजारो वृक्षांची लागवड करून वृक्षलागवड आणि संवर्धन करण्याचा संदेश दिला जात आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात वनविभागाकडून त्यांना संरक्षण मिळण्याऐवजी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळेच हजारो वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत. तर एका प्रकरणात वन कर्मचाऱ्याला तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत.
11 Apr 2025 12:47 PM (IST)
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्यामुळे एसटी महामंडळावर चारही बाजूंनी टीका केली जत आहे. मात्र, अर्थखात्याकडून निधी मिळत नसल्यानेच एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे. आम्ही परिवहन खात्याकडे पाठवलेली फाईल अर्थमंत्रालयाकडून परत पाठवण्यात आली. आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही आमचा अधिकार मागत आहोत. अशा शब्दांत एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
11 Apr 2025 12:47 PM (IST)
मुंबईसह देशभराला हदवणारा 26/11 दहशदवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. यामध्ये मुंबईच्या रस्त्यावर भीषण शांतता आणि विधंवत्सक पहायला मिळाला होता. या प्रकरणामध्ये तहव्वुर राणा हा मास्टरमाईंड म्हणून आरोपी आहे. मुंबईमध्ये दहशदवादी हल्ला करण्यामध्ये रेकी करणारा तहव्वुर राणा याच्या मुसक्या आवळून त्याला भारतामध्ये आणण्यात आले आहे. तहव्वुर राणाला भारतात येताच मिळाली 18 दिवसांची कोठडी देण्यात आली असून NIA मुख्यालयात आणले जाणार आहे
11 Apr 2025 12:21 PM (IST)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच तहव्वुर राणा याच्या फाशीबाबत देखील मोठे विधान केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला तात्काळ फाशी देण्यात यावी आणि बिहार निवडणुकीदरम्यान सरकार असे करेल असा दावा त्यांनी केला. वाचा सविस्तर
11 Apr 2025 12:09 PM (IST)
तलावांचे शहर असलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिव्यातील दातीवली तलावाचा काही भाग आज पहाटे ५ वाजता कोसळल्याची घटना घडली आहे. गेली दोन अडीच वर्षापासून शुशोभिकरणाचे रखडलेले काम असून सदर दातीवली तलावाचे काम पूर्णतःवास येत नव्हते. अतिशय कासव गतीने काम सुरु असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
11 Apr 2025 10:15 AM (IST)
तहव्वुर राणाची एनआयए चौकशी सुरू
तहव्वुर राणाची एनआयए चौकशी सकाळी १० वाजता सुरू होईल. एनआयएचे एसपी आणि डीएसपी दर्जाचे अधिकारी राणाची चौकशी करतील. ही चौकशी एनआयए चौकशी कक्षात सीसीटीव्हीसमोर होईल, ज्याचे संपूर्ण रेकॉर्डिंग केले जाईल.
11 Apr 2025 08:47 AM (IST)
देशाच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाला व्हिसाच्या विलंबामुळे अमेरिकेत झालेल्या हंगामातील पहिल्या विश्वचषक स्टेज १ स्पर्धेत खेळता आले नाही, ज्यामुळे संघाला पदकांपासून वंचित राहावे लागले असे मत भारतीय प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांनी वर्तविले. २०२४ मध्ये जगातील अव्वल क्रमांकाच्या भारतीय महिला कंपाउंड संघाने तिन्ही सुवर्णपदके जिंकली होती. त्यांच्या तीन सदस्यांना-विश्वविजेती अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर आणि तनिपार्थी चिकिथा यांना वेळेवर अमेरिकेचे व्हिसा मिळाले नाहीत.
11 Apr 2025 08:45 AM (IST)
क्रिकेटप्रेमीसाठी एक आनंदांची बातमी समोर आली आहे. तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ मध्ये क्रिकेटचा थरार बघायला मिळणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी सहा संघ सुवर्णपदकासाठी लढताना दिसून येणार आहेत. आयोजकांकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. १९०० च्या पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक खेळांमध्ये क्रिकेटचा प्रथम समावेश करण्यात आला. त्यावेळी केवळ फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हेच संघ क्रिकेटमध्ये भाग घेताना दिसून येत होते. या दोन्ही संघांमध्ये दोन दिवसांचा सामना खेळवण्यात आला होता.
11 Apr 2025 08:44 AM (IST)
मुंबईतील समष्टी कला आणि साहित्य महोत्सवात जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ११ आणि १२ एप्रिल रोजी मध्य मुंबईतील भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडणार आहे. जावेद अख्तर हे देशातील प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथालेखक आहेत. ज्याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.






